निःस्वार्थ भाव ठेवून दुसऱ्याला मदत करता आली तर माणसाच्या मनाला बरं वाटतं. फक्त ती मदत योग्य व्यक्तीला मिळायला हवी हा माझा अट्टाहास. कारण नवीनच नोकरीला लागल्यानंतर मी भांडुप स्टेशनजवळ गावाहून आलेल्या, सामान चोरीला गेलेल्या कुटुंबाला शंभर रुपये आणि चार वडापाव घेऊन दिले होते. आणि आपण किती किती छान काम केलं या आनंदात दोन दिवस होते. मग तिसऱ्या दिवशी कळलं की अशी सामान, पैसे चोरीला गेलेली कुटुंबं संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या एका गावातल्या लोकांचा हाच व्यवसाय आहे. काही वर्षांनी त्यांचेच एक दुसरे भाऊबंद मला गुवाहाटीलाही भेटले. असो.
कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या राज्यात फिरायचा योग येतो. असाच एका बिझनेस ट्रीप वर असताना मी ओला कॅब मधून एअरपोर्ट टू हॉटेल असा प्रवास करत होतो. मी विशाखापट्टणम या शहरात होतो रात्रीच्या सुमारे दोन वाजता माझं विमान लँड झालं. इथली लोकल भाषा येत नाही म्हणून मी ठरवलं की ऑनलाईन ओला किंवा उबेर बुक करायचे आणि निवांत हॉटेलला पोहोचायचं. एअरपोर्ट पासून हॉटेल जवळजवळ 20 किलोमीटर होते. माझे विशाखापट्टणम मध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ होती. बाहेर पडलो आणि पहिल्यांदा उबेर ट्राय केले, कोणीच बुकिंग एक्सेप्ट करत नव्हता सगळे लोकल ड्रायवर्स ऑफलाइन भाडे करण्यासाठी बुकिंग एक्सेप्ट करत नव्हते.
"त्या नोटा बाद झाल्यात आता!".. अद्वैतनं, माझ्या भाचीच्या नवर्यानं, मी माझ्या पाकीटातले पैसे मोजताना पाहून सुनावलं. कोव्हिडमुळे यावेळी तब्बल 4 वर्षानंतर भारत भेटीला आलो होतो. खूप पूर्वीपासून, जेव्हा एटीम नव्हते तेव्हापासून, भारतातून परत जाताना थोडे फार भारतीय चलन घेऊन जायची सवय लागली होती. कारण, परत भारतात आल्यावर विमानतळावरून घरी जाण्यासाठी ते कामाला यायचं. त्या सवयीचा दणका असा अचानक बसला.
"कुठल्या नोटा बाद झाल्या?".. नोटा पण आता फलंदाजांसारख्या बाद व्हायला लागल्या की काय या शंकेला प्रयत्नपूर्वक बाद करून मी संभ्रमित चेहर्यानं पृच्छा केली.
"ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,
इथे जुन्या हिंदी गीत संगीतावर अनेक सुरेख लेख , चर्चा झाल्या आहेत .. त्यातलं थोडंफार वाचलं आहे ..
दुर्दैवाने असं म्हणण्याचं फारसं कारण नाही पण आमच्या घरात हिंदी संगीताची आवड कुणाला नव्हती त्यामुळे ते लहान वयात किंवा टीनेज मध्ये कानावर पडलं नाही .. टीव्हीवर जुने हिंदी सिनेमे लागत नव्हते असं नाही पण प्रमाण कमी असावं आणि फास्ट रंगीत सिनेमांच्या ऐवजी ते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे बघावेत , गाणी ऐकावीत अशी काही आवड नाही उपजली त्यावेळी ...
माझा मित्र अनिल. दापोलीला महाविद्यालयीन शिक्षणावेळचा माझा वर्गमित्र. तेंव्हा पासूनच तो काहीसा अबोल आणि अतीसंवेदनशील वगैरे. चार मित्रांच्या घोळक्यात फार न बोलता कडेला उभा राहून विनोदांची मजा घेणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला ठाण्याला एका स्थानिक वृत्तपत्रात नोकरी मिळाली.
हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं...
हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झिरो पॉइंट
आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.

शेवटचा ग्रुप फोटो

हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली
आज चौथा दिवस, आम्ही जास्तच उत्साहात होतो करण आज फुकरिया अर्थात बेस कॅम्पला पोचणार होतो. साधारण पाचच किमी चा रस्ता आणि जायला ३-३:३० तास लागणार होते. गरम चहा आणि नाश्ता करून आम्ही फुकरियाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस आमच्या ट्रेकमधील सर्वात नयनरम्य भागांपैकी एक होता.