निसर्ग

शब्द जमवुनि

Submitted by पुरंदरे शशांक on 22 July, 2025 - 00:57

शब्द जमवुनि

शब्द जमवुनि दोन चार ते
अर्थालागी शोधत राही
काय करावे कधी जमेना
काव्य त्यामधे उतरत नाही

निसर्ग सारा नभा मिसळुनि
द्विजगण तेथे देतो सोडून
इंद्रधनुचे उसने तोरण
जराजरासे देतो घुसडून

तरी जमेना काय करावे
ह्रदयस्पर्शी शब्दी योजून
भाव भावना शुष्क तरीही
एकामागून एक समर्पून

नैसर्गिक ते काव्य उमटते
एक कळी ती येता उमलून
स्तब्ध जरासा चकीत होउन
काव्य देखणे घेतो निरखून

---------------------------------------
नभा.... नभ, आकाश
द्विजगण.... पक्षीगण

पाऊस पडतोय (It's Raining)

Submitted by ब्लू कोलंबसे on 3 July, 2025 - 03:00

पाऊस पडतोय,

समुद्राच्याच वागणुकीने बनलेले ढग , त्याच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या वाऱ्यांनी

भारतभूच्या उत्तुंग कड्यांवर नेऊन आदळले,

आणि सुरु झाला नवा खेळ, - मॉन्सून !

पाऊस पडतोय,

पश्चिमेचे भन्नाट वारे, अरबी,बंगालच्या जलधीकडून दोहो बाजूंनी तुफान वर्षाव

काळ्याकभिन्न सह्याद्रीवर करतायत,

साऱ्या भारतभरातल्या नद्या, कडेकपारीच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत,

कधी झरा तर कधी जलप्रपात होऊन

आजूबाजूच्या माणसाला,त्याच्या व्यस्त जीवनाला,

आपल्या कवेत घेत

अनेक आयुष्ये,शहरे ठप्प करत

शब्दखुणा: 

वारी !!!

Submitted by किल्लेदार on 27 May, 2025 - 00:54

में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

कृष्णविवर

Submitted by अनन्त्_यात्री on 4 May, 2025 - 09:32

शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे

क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे

विज्ञानाचे नियम तोकडे-
ठरूनी, विपरित घडते आहे
अंतरिक्ष कक्षेत कवळुनि
कृष्णविवर हे हिंडत आहे

"नार नवेली वसुंधरा का
लट्टू विझत्या सूर्यावरती?"
कृष्णविवर वैफल्य ग्रस्तसे
उगा स्वतःला कोसत आहे

विषय: 

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

Submitted by मार्गी on 29 April, 2025 - 11:14

नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 

शब्दावाचून कळले सारे.. बंध मायेचे !

Submitted by रानभुली on 29 March, 2025 - 00:32

एमिली मेसन आणि झारा
ही गोष्ट नाही, तर एक हृद्य सत्यकथा आहे.
माझ्या इतर कथाही घडलेल्या घटनांवर, वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरच आधारीत असतात. कारण अनेकदा सत्य हे कल्पनेहून अद्भुत असते. पण ही ऐकीव कथा होती. या कथेचे किंवा घटनेचे किंवा बातमीचे म्हणा कुठेच पडसाद मिळत नव्हते . त्यामुळं खरंच घडलेली कथा आहे कि कसे हे कळत नव्हते. जे काही ऐकलेलं होतं ते ही थोडक्यात असंच ऐकलेलं. पण जिथून ऐकलं त्याने नावं सांगितलेली ती चांगली लक्षात राहिली होती. या नावांवरून अनेकदा सर्च देऊन झाला, पण काहीही हाती लागत नव्हतं.

शब्दखुणा: 

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

Submitted by मार्गी on 12 March, 2025 - 08:52

नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ - निसर्गायण - निसर्ग जेव्हा गंमत दाखवतो.. - adm

Submitted by Adm on 3 March, 2025 - 17:27

२०२४चं वर्ष आमच्यासाठी भटकंतीच्या दृष्टीने फार चांगलं गेलं. नवीन देश पाहिले, नवीन शहरं पाहिली, काही आधी पाहिलेली शहरं, ठिकाणं, पुन्हा पाहिली, नवे अनुभव घेतले. घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याबरोबर भटकंती केली. आणि ह्या भटकंतीदरम्यान निसर्गाने काहीश्या अनपेक्षितपणे भरपूर गमती-जमती दाखवल्या.

शब्दखुणा: 

म भा गौ दि २०२५ - निसर्गायण - तो माझा सांगाती! - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 1 March, 2025 - 23:14

तो माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी आईचं बोट पकडून चालायचे तेव्हापासून आहे.
ऊन्ह कलायला लागली की आम्ही, आजूबाजूची मुलं, आया मंडळी, सगळं गावचं तिकडे लोटायचं म्हणा ना!
जाताना भातुकलीची खेळणी घेऊन जायचं, त्या काळी सँड किट नव्हते ना! ओल्या वाळूत खड्डे खणायचे, विहिरी खोदायच्या, डोंगर बनवायचे, कपात थोड पाणी आणून विहीर भरण्याचा निष्फळ प्रयत्न करायचा, काडीने त्या ओल्या वाळूवर नावे लिहायची, चित्र काढायची, ओल्या वाळूचे मस्त लाडू वळायचे, कधी ते एकमेकांच्या अंगावर फोडले जायचे, तर कधी ते एकमेकांवर रचून त्यांचं कासव बनवायचं..
मैलोन मैल भटकत शंख शिंपले गोळा करायचे.. अगदी पिशवी भरभरून…

Pages

Subscribe to RSS - निसर्ग