शेती

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ४

Submitted by साधना on 25 April, 2024 - 09:51

मागचा भाग : https://www.maayboli.com/node/84992

गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ३

Submitted by साधना on 17 April, 2024 - 13:58

मागचा भागः https://www.maayboli.com/node/84965

शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्‍या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्‍या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास भाग १

Submitted by साधना on 9 April, 2024 - 08:45

बागकाम अमेरिका २०२४

Submitted by मेधा on 18 March, 2024 - 12:53

जगप्रसिद्ध फ्लावर शो संपला, वाटाणे आणि बटाटे यांची पेरणी करण्याचा मुहूर्त देखील टळला ( सेंट पॅट्रिक्स डे ) , तरी भाजीपाला लावण्याची काहीच तयारी नाहीये यंदा.

एका परिचितांकडून २० - २२ व्हाइट पाइनची रोपटी आणि काही हॉलीची रोपटी आणून लावली आहेत. मागच्या फॉलमधे लावलेले हिरवे जॅपनीझ मेपल चे झाड तगले आहे आणि त्यावर आता बारकी पाने दिसू लागली आहेत.

या वीकेंडला भाजीचा वाफा तयार करून वाटाणे तरी पेरावे असा विचार आहे. मग कार्ली ,दोडकी, भेंडी यांच्या बिया घरातच रुजत घालायला हव्यात .

यंदा झुकिनी लावणार नाही असा दरवर्षीप्रमाणे पण केला आहे .... पण ...

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६

Submitted by अनया on 14 February, 2024 - 10:28

काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शेतावर फारशी येत नसे. घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची गणितं, शिकणारा मुलगा आणि वृद्ध सासू-सासरे एवढ्या धावपळीत तेवढी फुरसत नसायची. पण नंतर महेश कामाच्या निमित्ताने दीर्घ वास्तव्यासाठी परदेशी गेला. मग अधूनमधून तरी आपण शेतावर चक्कर मारायला हवी, असं वाटायला लागलं. शेताच्या रस्त्यात एक भलीमोठी दगडाची खाण आहे. त्यामुळे त्या भागात डंपरची वाहतूक अहोरात्र चालू असते. त्या काळजीने एकटीने चारचाकी चालवत जायला नको वाटायचं. मग माझा भाचा आणि मी असे एखाद्या महिन्याने शेत-फेरी करायचो. त्याआधी कधी गेलेच तरी महेशबरोबर जाऊन त्याच्याबरोबर घरी येत असे. त्यामुळे रस्ताही धड माहिती नव्हता.

विषय: 

*शेतकरी*

Submitted by sanketdeshmukh on 22 April, 2023 - 04:33

चटके लागणारे ऊन असो ,या वारा असो शीतलहर शेत कामे करून होतो बेहाल ||
आंधी तुफान असो की असो ,दुष्काळ दुष्काळावरती करुनी मात पिकवतो रान ||
बी पेरून करतो, मोठे पीक,
घाम गाळूनी ,पिक बहरतो , खातो कष्टाची भाकर
महान पुरुष आहे शेतकरी ||
मातीचा कण-कण आहे ज्याच्या श्वासात ,
महान पुरुष आहे तो शेतकरी||

प्राचार्य
संकेत सुरेंद्र देशमुख

विषय: 

स्मरणरंजन : पिरसा

Submitted by Mandar Katre on 3 August, 2022 - 01:12
कोकण

पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं...

शब्दखुणा: 

भात शेती

Submitted by स_सा on 11 June, 2022 - 01:06

भात शेती बद्दल माहीती हवी आहे.
आपल्यापैकी कोणी भातशेती करत असेल तर काही माहीती हवी आहे.
जिल्हा -
भातशेती ची पद्दत -
भाताचे कोणते वाण -
बिजप्रक्रिया -
एकरी उत्पादन (कि.लो) धान -
एकरी उत्पादन (कि.लो) पेंडी -
खतांचा वापर -
तणनाशकांचा वापर-
पिक कालावधी -

अनर्थ !

Submitted by Dr. Satilal Patil on 22 May, 2022 - 05:16

आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.

जीवनदृश्यं

Submitted by पाचपाटील on 1 May, 2022 - 02:22

{{ लाईट्स..! कॅमेरा..! साउंड..! "रोलिंग..!"
सीन नंबर १, शॉट-५, टेक-२
"ॲक्शन" }}

नवरा : आगं ते जरा बोगद्याकडच्या मळ्यातली
हीर जरा बांदून घ्यायचीय.. त्येज्यासाटी सोसायटी
काडावी लागंल..! सही कर की जरा हितं..!

बायको : ओ जावा तिकडं. कितींदा सोसायट्या काडायच्या? कोन फेडत बसनार ते पुना ??
मी नाय करत सही..!

नवरा : अगं एवढ्या बारीला कर..! पुना नाय मागत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शेती