Submitted by अनन्त्_यात्री on 4 May, 2025 - 09:32
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे
विज्ञानाचे नियम तोकडे-
ठरूनी, विपरित घडते आहे
अंतरिक्ष कक्षेत कवळुनि
कृष्णविवर हे हिंडत आहे
"नार नवेली वसुंधरा का
लट्टू विझत्या सूर्यावरती?"
कृष्णविवर वैफल्य ग्रस्तसे
उगा स्वतःला कोसत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
>>>>>"नार नवेली वसुंधरा का
>>>>>"नार नवेली वसुंधरा का
लट्टू विझत्या सूर्यावरती?"
कृष्णविवर वैफल्य ग्रस्तसे
उगा स्वतःला कोसत आहे
अरेच्या नवे कडवे वाढवले का? छान आहे हे ही. सूर्याचे आणि वसुंधरेचे प्रेम जगद्विख्यात आहेच मुळी