हे विसाव्या शतकातील प्रसिद्ध कवयित्री विसलावा शिम्बोर्स्का यांच्या 'Hate' (नफरत) या कवितेचे मराठी भाषांतर:
बघा, ती अजूनही किती चपळ आणि प्रभावी आहे
आपल्या शतकातील ही 'द्वेष' नावाची भावना,
किती सहजपणे चक्काचूर करते ती
मोठ्यातल्या मोठ्या अडथळ्यांचा!
किती वेगाने झडप घालून
आपल्याला विळख्यात घेते!
इतर भावनांपेक्षा ती किती वेगळी आहे --
एकाच वेळी वृद्ध आणि तरुण सुद्धा.
ज्या कारणांमुळे तिचा जन्म झाला,
त्या कारणांना ती स्वतःच पुन्हा जन्म देते.
जर ती कधी झोपलीच, तरी ती झोप कायमची नसते,
गेले चारपाच दिवस महिला आरक्षण विधेयकाची चर्चा यत्र तत्र सर्वत्र सुरू आहे. अगदी ज्यांना राजकारणात काही रस नाही किंवा आम्हांला यातलं काही कळत नाही, असं म्हणणारेही याबद्दल बोलताना दिसताहेत.
पायरीपायरीने जाऊ.
महिलांसाठी लोकसभा व विधानसभांत आरक्षण
१९९२ च्या ७३ घटनादुरुस्ती कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक रूप मिळाले व स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी १/३ जागा राखीव झाल्या. काही राज्यांनी पुढे या जागा ५०% केल्या.
काल माननीय प्रधान सेवकांनी डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्याबद्दल विरोधी पक्षांना, विशेषत: कॉंग्रेसला खूप शिव्या घालून आग पाखडली.
मी ते बिल योग्य की अयोग्य या बद्दल चर्चा करू इच्छित नाही.
दूरदर्शन वाहिनी या कारणासाठी आहे का? व स्वत: प्रधान सेवक याचा दुरुपयोग करतात व स्वत:ला प्रधान हुकुमशहा सिध्द करतात. हे कितपत बरोबर आहे?
ती एक स्वायत्त संस्था आहे..... हे काय चाललंय??
पाहूया, काय वाढून ठेवलंय ते...
गेल्या काही वर्षांत अनेक अशा गोष्टी घडल्यात, ज्यामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत याची लाज वाटावी, जेव्हा आपण सर्वच लोक भारतातील न्यायव्यवस्था, राजकारणी, प्रशासन मूर्खात काढले गेलोय, फसवले गेलो आहोत. इथं फक्त अश्या घटना लिहिणं अपेक्षित आहे. कुणालाही धरून झोडपणे हा उद्देश नाही, फक्त हतबलता व्यक्त करण्यासाठी हा धागा आहे.
इस्रायलबद्दलची वाचनात आलेली आणि लक्षात राहिलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्याला पकडून आणून शिक्षा देणं. रीडर्स डायजेस्टमध्ये शेवटचं सदर एखाद्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती हे असतं. त्यात हे वाचलं होतं.
जरा खरात बाबाचे व्हिडिओ social media वरून हटवायचे आदेश आले नाही तोवर अन्न आणि औषध खात्याचा भार सांभाळणारे मंत्री आणि NCP चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ सोशल मीडिया वर फिरू लागले आहेत.
यात झिरवळ आणि एक व्यक्ती (ब्लर केली आहे) जेवतात, पलंगावर बसून मद्यपान करतात, शेवटी झिरवळ झोपले आहेत आणि ती व्यक्ती कपडे ठीक करत आहे असे दिसते.
व्हिडिओ लपून काढला आहे ,किंवा spy cam plant करून काढला आहे असे वाटते.
हा व्हिडिओ 7 महिने जुना आहे.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे राजीनामा मागितला आहे.
पण यात नक्की कायदा कुठे मोडला गेला आहे?
८ डिसेम्बर २०२५ ला इराणच्या IRGC फोर्सेसनी UAE च्या दिब्बा बंदराजवळून निघालेले MT Valiant Roar ताब्यात घेतले. या जहाजावर बेकायदेशीररीत्या डिझेल वाहतूक करण्याचा आरोप लावला होता. त्यावरील १६ भारतीय कर्मचाऱ्यांना अटक करून बंदर अब्बास येथील तुरुंगात ठेवले गेले. भारतीय वकिलातीच्या मदतीस ८ खलाशांची सुटका करण्यात आली. परंतु अजूनही ८ भारतीय इराणमधील तुरुंगात आहेत. मोदींनी आम्ही इस्राएलबरोबर आहोत हा इशारा या पार्शवभूमीवर विचारात घेतला पाहिजे.
IMEC हा भारताचा दळणवळण आणि व्यापारासाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी, जॉर्डन, इस्राएल, इटली, फ्रान्स मार्गे युरोपला व तिथून पुढे अमेरिकेला जोडू इच्छितो. या प्रोजेक्टच्या उभारणीत वरील सर्व देश तसेच ग्रीसचाही समावेश असेल.
या प्रोजेक्टमध्ये होर्मूझच्या सामुद्रधुनीतून व भूमध्य सागरातून जलवाहतूक, मध्य पूर्व आशियातून रस्ते व रेल्वे वाहतूक यांचा
समावेश असेल. हैफा हे इस्रायली बंदर हा भूमध्य सागरातील या प्रोजेक्टचा एक महत्वाचा भाग असेल.
