Submitted by अजिंक्यराव पाटील on 9 April, 2026 - 16:43
गेल्या काही वर्षांत अनेक अशा गोष्टी घडल्यात, ज्यामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत याची लाज वाटावी, जेव्हा आपण सर्वच लोक भारतातील न्यायव्यवस्था, राजकारणी, प्रशासन मूर्खात काढले गेलोय, फसवले गेलो आहोत. इथं फक्त अश्या घटना लिहिणं अपेक्षित आहे. कुणालाही धरून झोडपणे हा उद्देश नाही, फक्त हतबलता व्यक्त करण्यासाठी हा धागा आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वडोदरा केस: तरुणाने जेव्हा
वडोदरा केस: तरुणाने जेव्हा लोकांना चिरडले तेव्हा तो drugs च्या नशेत असल्याने त्याचा नाईलाज झाला. bail granted.
पुणे पोर्ष कार खटला: 17 वर्ष 8 महिन्याच्या च्या मुलाने 2 लोकांना नशेत कारखाली चिरडून मारलं, रात्री 3 वाजता पुण्याचा आमदार त्याच्यासाठी पिझ्झा घेऊन पोलिसात गेला (carb खाल्ल्याने शरीरातले अल्कोहोल कमी होते म्हणून), नंतर या केसमध्ये रक्त बदलणे, मृत झालेल्या victimsनाच चूक ठरवणं वगैरे सगळं झालं. सर्व आरोपी जामिनावर सुखात जगत आहेत.
पूजा चव्हाण: संजय राठोड, 2021
पूजा चव्हाण: संजय राठोड, 2021: राठोडने या एका खूप लहान मुलीला प्रेग्नन्ट केलं, त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे, सगळं स्वच्छ आहे, कॉल चालू असतानाच त्या मुलीचा पडून/ पाडून मृत्यू झाला. राठोड उजळ माथ्याने फिरतोय.
अशोक खरात: महिलांवर अत्याचार
अशोक खरात: महिलांवर अत्याचार करणाऱ्या खरातला खुद्द महिला आयोगाचे संरक्षण होते. प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, पण अगदी थोडक्यात हे उघड झालं
सर्वच क्षेत्रात आज भ्रष्टाचार
सर्वच क्षेत्रात आज भ्रष्टाचार कधी नव्हता इतका टोकाला पोचला आहे. कुठल्याही ठिकाणी आज हातात पैसा असेल
तर सर्व काही विकत मिळते, न्यायासकट. विकत घेणारे गरजु आहेत. पिझ्झा घेऊन जाणारा तो आमदार श्रीमंताच्या ओझ्याखाली दबला असेल पण जे विकले गेले त्यांचे काय?
समाजात आज जसे विकत घेणारे आहेत तसे बिकले जाणारेही आहेत. मी विकला गेलो नाही तर विकत घेणारा दुसर्याकडे जाणार आणि स्वतःचा उद्देश्य साध्य करुन घेणार, त्या दुसर्याला पैसा मिळणार, मग मीच का नको तो पैसा मिळवु हा विचार करुन प्रत्येकजण आपापल्या परीने भ्रढ्टाचार वाढवतोय आणि तो वाढतोय हा आक्रोशही करतोय
एकुणच नितीमत्ता धुळीत मिळालेली आहे. आपल्यावर वेळ आली तर आपण काय करु हा विचार प्रत्येकाने करावा आणि आपली नितिमत्ता सुधारावी.
बाकी भ्रष्टाचारविरोधी कायदे ढिगाने आहेत ज्यातुन मार्ग कसा काढायचा हे सगळ्यांनाच माहित असते.
काय केले तर ही सामाजिक किड नष्ट होईल ??
राहुल गांधींचा आदर्श ठेवायचा.
राहुल गांधींचा आदर्श ठेवायचा. ना चौकशीची ना जिवाची भीती बाळगत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=26__tsmioig
@आग्या चौकशीची.
साधना पण वर दिलेल्या खरात सोडुन (त्यात असल्या अंधश्रद्धांना बळी पडणे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करणाऱ्यांना जाओ पहले उस आदमी की साइन लेके आओ करणे, काहीतरी लोकांना मिळतं म्हणुन जातात करणे सोडुन द्या म्हणता येईल) इतर घटनात सामान्यांचा काय रोल आहे?
यात आपल्याला चार पैसे जास्त मिळतात म्हणुन तुम्ही म्हणाल तसं करायला तयार झाले असे नव्हे. केलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यामुळे भीती पण आहे. भलत्या ठिकाणी बदल्या ते तुम्हालाच काहीतरी आरोप करून आत, मग न्यायालयात वेळ काढुपणा.
हे एक झाले.
सामान्यांनी किती शूर (प्रत्यक्षात, सोमीवर नव्हे) व्हावं याला मर्यादा आहेत.
लाच देऊ नका, घेऊ नका हे प्रबोधन सोपं आहे. या भीतीवर मात करून लढा दे, बलिदान गेले तरी आपल्या समाजाला फायदाच आहे, हो निडर आणि लढ असे म्हटल्यास कितीसे लोक खरेच तयार होतील?
मी विचार करेन या विरुध्द लढणारी काही मोठी नावे त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, मोठे वकील आहेत. माझे काय? जो वकील नेमेन तो पक्षपात न करता काम करेल की नाही?
कुणी विचार करेल कोण बघेल माझ्या वृद्ध आजारी वडिलांकडे, आईकडे?
कुणाचे मतिमंद मुल, कुणाकडील मनोरुग्ण, इत्यादि. कुणाला स्वतःवर अत्याचार होण्याची भीती. कुणाला मी साक्ष द्यायला कोर्टात जिवंत पोहोचेन की नाही याची भीती. ज्यांची ही कायदा व्यवस्था सांभाळण्याची, ती यंत्रणा चालवण्याची सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच खात्री नाही.
लोक यासाठी नेत्यांकडे बघतात, स्थानिक ते वरचे अशा चढत्या क्रमाने. आपण आपल्या ज्यूरिसडिक्शन मध्ये आपण सुरक्षित आहोत ना एवढं पहातात. आणि दुसरे टोक - आदर्श राज्य, रामराज्य वगैरे कवि कल्पना आहेत. कुणी अवतार येणार नाहीये नि कसला उद्धार करणार नाहीये, आणि जनताही आदर्श बनणार नाहीये.
आपण नेत्यांचे समर्थन करणे, उदोउदो करणे सोडले, आसपास काय घडतंय याबद्दल जागरूक राहुन योग्य तिथे निषेध, तक्रारी करणे, जाब विचारणे, पाठपुरावा करणे एवढे सुरू केले तरी फरक पडायला सुरुवात होईल. कायदा-सुव्यवस्था यंत्रणेला लोकांना असं गृहीत धरता येणार नाही हा संदेश मिळेल.
सोसायटीत आपण सेक्रेटरी निवडून देत असु तर त्याला डोक्यावर घेत नाही, आपल्या कामासाठी निवडून दिलंय आणि तो ते करतोय की नाही याचे भान ठेवतो नेहमी तसेच आपले लोकप्रतिनिधी निवडल्यावर आणि त्यांनी पुढे वरचे नेते निवडल्यावर आपण भान ठेवावे.
माणसा तू आदर्श हो, निडर हो, वेळ पडल्यास बलिदान द्यायला तयार हो (यात काही चूक नाही, तरी) अशा प्रबोधनापेक्षा असा ऍप्रोच अधिक प्रॅक्टिकल वाटतो मला.
@मानव: सर्वात शेवटची
@मानव: सर्वात शेवटची कडीसुद्धा वेगळी झाली तर पूर्ण साखळीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. याच गोष्टीचं एक दिलासादायक उदाहरण म्हणजे, तामिळनाडूत साथणकुलम इथं पोलिसांनी एका पिता पुत्राची, दुकान उशिरा उघडे ठेवले म्हणून कोठडीत डांबून हत्या केली, अधिकाऱ्यांसमवेत 9 पोलिसांना या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.. यातली शेवटची कडी म्हणजे त्याच ठाण्यातली एक निडर महिला कॉन्स्टेबल.. तिच्या साक्षीमुळं प्रकरण फिरलं आणि या नराधमांना शिक्षा झाली.
हं. बरोबर आहे. काही केसेस अशा
हं. बरोबर आहे. काही केसेस अशा काही निडर लोकांमुळे पूर्णत्वास जाऊन न्याय मिळाला आहे.
माझ्यासाठी सर्वात मोठी
माझ्यासाठी सर्वात मोठी धक्कादायक घटना (अ) बिल्किस बानू वर सामुहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या ( या मधे ३ वर्षा ची चिमुरडी पण होती :अरेरे:) या अपराधाबद्दल शिक्षा भोगत असणार्या ११ गुन्हेगारांची गुजरात सरकारच्या शिफारशीवरुन सुटका करण्यात आली होती.
https://www.esakal.com/desh/bilkis-bano-case-explained-under-which-law-g...
सुटका करण्याचा प्रकार बनवाबनवी होती. पण पीडितेला कळविण्याचे , सतर्क रहाण्याचे सौजन्य तरी दाखवायचे ?
गुन्हेगारांचे बाहेर आल्यावर सार्वजनिक स्वागत ( ओवाळणे, पेढे, हार तुरे ) होणे हा सुटके एव्हढाच गंभिर आणि चिड आणणारा प्रकार होता.
सर्वोच्च न्यायालयाने या सुटकेच्या निर्णयाला रद्द ठरविले आणि गुन्हेगारांची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली. गुन्हेगारांच्या सुटके संबंधातला निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याला होता, कारण मुंबई हाय कोर्टाने शिक्षा दिली होती.
किमान ते परत तुरुंगात गेलेत
किमान ते परत तुरुंगात गेलेत ह्यात आपण आनंद मानायचा फक्त
सर्वच क्षेत्रात आज भ्रष्टाचार
सर्वच क्षेत्रात आज भ्रष्टाचार कधी नव्हता इतका टोकाला पोचला आहे. कुठल्याही ठिकाणी आज हातात पैसा असेल
तर सर्व काही विकत मिळते, न्यायासकट.>>>> भुजबळांना जेंव्हा क्लिनचीट मिळाली महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तेव्हा मी एक मेसेज टाकलेला युट्यूब व्हिडिओ सोबत आमच्या फॅमिली ग्रूप मधे, एकाने ही हूं की चू केले नाही...मी फारसा कधी तिथे मेसेज टाकत नाही.
Congress *institutionalized* corruption & BJP *institutionalized* how to to come out clean.
यशवंत सिन्हा ह्यांनी शेवटी आज
.
Sorry.
माझा गैरसमज झाला नावामुळे.
कोणत्या पदाचा?
कोणत्या पदाचा?
सामान्य माणसे कोर्टात जाणे
सामान्य माणसे कोर्टात जाणे शक्यतो टाळतातच.
शिवसेना , शरद पवार काँग्रेस गट अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
शोधलं मी. न्या. यशवंत
शोधलं मी. न्या. यशवंत वर्मा. यांच्या घराच्या आउटहाउसमध्ये पैसाच पैसा, नोटाच नोटा सापडल्या होत्या.
यशवंत सिन्हांची २००२ सालची एक आठवण उगाच जागी झाली.
त्या न्यायधीशाने आजच राजीनामा
त्या न्यायधीशाने आजच राजीनामा दिला. महाभियोगातून वाचेल आता
idiosyncratic take on the
Idiosyncratic take on the Second Law of Thermodynamics
Kipple is useless objects. When nobody’s around, kipple reproduces itself. It always gets more and more. No one can win against kipple, except temporarily and maybe in one spot, like in my apartment. But eventually I’ll die or go away, and then the kipple will again take over. It’s a universal principle operating throughout the universe; the entire universe is moving...toward a final state of total, absolute kipple-ization.
त्या न्यायधीशाने आजच राजीनामा
त्या न्यायधीशाने आजच राजीनामा दिला. महाभियोगातून वाचेल आता
पण आता त्याच न्यायधीशां विरुद्ध आर्थिक आणि अफरातफ़रीचा गुन्हा नोंदवून खटोला भरता येईल आणि त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करता येईल
कारण आता न्यायाधीश म्हणून मिळणारे संरक्षण त्यांना मिळणार नाही
आर्थिक आणि अफरातफ़रीचा गुन्हा
आर्थिक आणि अफरातफ़रीचा गुन्हा नोंदवून खटोला भरता येईल >> एकंदरीत न्यायव्यवस्थेचे आकलन असल्याने त्यांनीच राजीनामा दिला असेल. कारण खटला निकाली लागायला किती काल जाईल हे त्यांना पक्के ठाऊक आहे
त्यांनी राजीनामा दिला याचे
त्यांनी राजीनामा दिला याचे कारण महाभियोग चालवून त्यांना काढून टाकलं जाईल हे निश्चित झालं आहे.
No high court judge or Supreme Court judge has been successfully impeached and removed from office in India since independence. While several judges have faced impeachment proceedings for misbehavior or corruption, they have historically resigned before the process could be completed
त्यामुळे आता यादीत आपलं नाव पहिलं येऊ नये यासाठी राजीनामा दिला आहे.
बाकी संपत्ति जप्त होईल इ गोष्टी चालू राहतील.
कारण जेवढी संपत्ती हिशेबात येईल तेवढीच जप्त करता येते. जी जिरवली आहे तिचं काय करणार?.
खटले तर चालू राहतील आणि बहुधा मरेपर्यंत त्यांना काही तुरुंगात जावे लागणार नाही.
लालू प्रसाद यादव पाच खटल्यात दोषी जाहीर होऊनही वैद्यकीय कारणासाठी जामीन घेऊन तुरुंगाच्या बाहेर आहे.
: Due to these multiple convictions, he was awarded sentences amounting to over 13 years in total.
Bail Status: As of early 2022, Lalu Prasad Yadav has been granted bail in all five cases by the Jharkhand High Court.
मुलाच्या राजकीय कारकिर्दीत भागही घेतो आहे.
हा का ना का
लालू प्रसाद यादव भाजपमध्ये
लालू प्रसाद यादव भाजपमध्ये गेले असते तर खटले मागे घेतले गेले असते. ईडीक डून फाइल हरवली असती किंवा आपण कशासाठी केस फाइल केली हेच त्यांना माहीत नाही, असं म्हणाले असते. भुजबळांना विचारा हवं तर.
माणसाचं नाव वर्मा असलं की त्याचा आदरार्थी बहुवचनी उल्लेख करावा आणि यादव असलं की एकेरी ही भारताची महान समाजव्यवस्था.
लालू प्रसाद हा नेता म्हणून
लालू प्रसाद हा नेता म्हणून एकेरीत उल्लेख गेला त्या बद्दल क्षमस्व.
दोघं तितकेच गुन्हेगार आहेत एकाचा गुन्हा सिद्ध झालाय दुसऱ्याचा काही काळाने होईल
पण त्यात माझ्या मनात येथे दोघांच्या जातीबद्दल कोणताही विचार नव्हता.
तो केवळ तुमच्या मनात आहे.
चालायचंच!
तो केवळ तुमच्या मनात आहे. <<<
तो केवळ तुमच्या मनात आहे. <<<
मराठीत अशा गोष्टींवर छान म्हणी आहेत.. उलट्या बोंबा वगैरे..
तरीच म्हटलं , तीस एक प्रतिसाद
तरीच म्हटलं , तीस एक प्रतिसाद झाले तरी अजून "हरिदासाची कथा मूळ पदावर" कशी आली नाही?
पाषाण तलावात हजारो मासे
पाषाण तलावात हजारो मासे अनिर्बंध प्रदूषणामुळे मरून पडलेत, आता तिथं घाण वास सुटलाय.
नाशिकला कुंभमेळ्याच्या
नाशिकला कुंभमेळ्याच्या नावाखाली वृक्षतोड झाली आहे म्हणे. गेल्या तीन चार किंवा दहा वर्षांत उगवलेलीच झाडे कापणार, परदेशी मूळ असलेली वाईट्ट झाडे कापणार म्हणताना वटवृक्ष कापले म्हणे?
मला तर वाटतं अख्खा भारत लवकरात लवकर निर्वृक्ष व्हावा आणि याची सुरुवात महाराष्ट्रापासून व्हावी.
गेल्या तीन चार किंवा दहा
गेल्या तीन चार किंवा दहा वर्षांत उगवलेलीच झाडे कापणार>> फडणविस हा मोदींना तोडीस तोड असा खोटारडा माणूस आहे, पण त्याहीपेक्षा अधिक भयंकर म्हणजे व्हाईट कॉलर कपटनितीने बुद्धीभेद करणारा आहे.
त्यातल्या एका वडाचा फोटो
त्यातल्या एका वडाचा फोटो पाहिला होता, त्या झाडाला हात पसरून कवेत घ्यायला किमान 8 लोक लागले असते, झाड एवढं मोठं व्हायला कित्येक दशके लागली असावीत
साधू संत येती घरा ... तोची
साधू संत येती घरा ... तोची दिवाळी दसरा
हजारभर झाडे तोडली तर काय ?
Pages