झिरवळांचे काय चुकले?

Submitted by प्रेमाच्या_पन्न... on 26 March, 2026 - 05:43

जरा खरात बाबाचे व्हिडिओ social media वरून हटवायचे आदेश आले नाही तोवर अन्न आणि औषध खात्याचा भार सांभाळणारे मंत्री आणि NCP चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ सोशल मीडिया वर फिरू लागले आहेत.
यात झिरवळ आणि एक व्यक्ती (ब्लर केली आहे) जेवतात, पलंगावर बसून मद्यपान करतात, शेवटी झिरवळ झोपले आहेत आणि ती व्यक्ती कपडे ठीक करत आहे असे दिसते.
व्हिडिओ लपून काढला आहे ,किंवा spy cam plant करून काढला आहे असे वाटते.
हा व्हिडिओ 7 महिने जुना आहे.

विरोधकांनी नेहमीप्रमाणे राजीनामा मागितला आहे.
पण यात नक्की कायदा कुठे मोडला गेला आहे?

1) लग्नबाह्य संबंध - पण विवाहबाह्य संबंध ठेवणे हा पत्नीने तक्रार केली तर गुन्हा होतो. 2 कॉन्सेंटिंग adult व्यक्तींनी , परस्पर सहमतीने संबंध ठेवले तर तो गुन्हा नाही आहे. इकडे पत्नीने किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीने काहीही तक्रार नोंदवली नाहीये.

2) ती व्यक्ती ट्रान्सजेंडर होती असे म्हंटले जातेय -
ट्रान्सजेंडर बरोबर सहमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही.
फारतर तुम्ही त्यांना डेव्हिएंट sexual liking म्हणू शकता, पण तो गुन्हा नाही.

3) शासकीय निवासस्थानी त्यांनी मद्यपान आणि अय्याशी केली :-
ते त्यांचे निवासस्थान आहे, माणूस within permissible लिमिट ज्या ज्या गोष्टी आपल्या घरी करतो त्या सगळ्या त्यांना तिथे करायला मुभा आहे.
कंपनी ने फ्लॅट दिला, म्हणून टॉयलेटला जाताना सुद्धा कंपनीच्या फायद्याचा विचार करा असे कोणी म्हणत नाही.

4) पोझिशन चा गैरफायदा.
हा गंभीर आरोप आहे. जर त्यांनी दबाव टाकून त्या व्यक्तीची सहमती मिळवली असेल, किंवा त्या व्यक्तीला या संबंधाच्या बदल्यात काहीतरी देऊ केले असेल ( जे नॉर्मली तिला मिळाले नसते एखादी परवानगी, पद, खूप जास्त पैसे) तर तो पोझिशन चा गैरफायदा म्हणू शकतो. सरकारने या दृष्टीने जरूर तपास करावा. दोषीं दिसल्यास शिक्षा द्यावी

कॉर्पोरेट मध्ये सुद्धा 2 डिपार्टमेंट मधील 2 जणांचे संबंध असतील तर लोक शक्यतोवर त्यांचा प्रश्न आहे म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र या संबंधांमुळे दुसऱ्या लायक व्यक्तीवर अन्याय होतो आहे, हे सिद्ध झाल्यास किंवा ते दोघे त्यांचे संबंध वाढवण्यासाठी कंपनी रिसोर्सेस वापरत आहेत ( गरज नसताना travel, एकत्र राहणे) असे दिसले तर लगेच कारवाई होते. हा अँगल इकडे तपासून पहायला हवा.

झिरवलांनी केलेले आपल्याला नक्की काय खटकते आहे?हे तपासून पाहण्याची गरज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोंदू बाबा प्रकरणात ज्या पक्षाचा प्रवक्ता वारेमाप तोंडसुख घेतोय, त्याच पक्षाच्या प्रमुखाचा फोटो लागलीच भोंदूबाबा बरोबर येतो.

जवळपास सर्वच पक्षाचे नेते अडकल्यानंतर नवीन प्रकरण बाहेर आले. मागचे विसरले जाईल आणि आता नव्या नेत्यांचे फोटो आर्थिक व्यवहार बाहेर येतील.

ठरवून केल्याशिवाय होत नाही. या प्रकरणांमुळे सरकारच्या कामगिरी कडे लक्ष जात नाही. अशीच प्रकरणे बाहेर येत राहिली तर लोक असेच चघळत बसतात. बरंच आहे सरकारला.

सोशल मीडिया आल्यावर लोकांचा मीडिया होण्याऐवजी हाडूक चघळायला देणारा मीडिया झाला आहे. मग नॉशिया येतो.

मायबोलीवर अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाते.

खरात प्रकरणावरून लक्ष हटवण्याकरता तर ७-८ महिने जुनी झिरवळ कथा तर बाहेर आणली नाही ना?

एका पक्षातील कार्यक्षम व्यक्ती अस्तंगत झाल्यानंतर त्याच पक्षाचे एकामागोमाग एक नेते अडचणीत येत असतील वा आणले जात असतील, ते ही नवीन प्रकरणाऐवजी जुन्या साठवून ठेवलेल्या प्रकरणामधून; तर यामागे निश्चितपणे काही राजकीय उद्दिष्ट असले पाहिजे..

मोठ्या हिरीरीने 'हाइ प्रोफाइल ' प्रकरणं चघळणे यात मिडियाला( पेपर आणि चानेल्स) यांचा फायदा होत असतो. पण प्रत्यक्ष खटला किंवा दावा फुसका निघतो.

ह्या लोकांना कोण कशाला अडचणीत आणेल? स्वतःच अडकलेत.
दिसायलाच fraud असणाऱ्या आणि चमत्कार करणाऱ्या बाबाच्या सानिध्यात राहणार तर कधी ना कधी तरी फसणारच.
शासकीय निवास स्थानमध्ये लडफी करणार आणि त्यावेळी तिऱ्हाईताला प्रवेश देणार तर हे लपून कसं राहील.? आणि हेच झिरवाळाच चुकलं.
बाकी झिरवाळाला ह्यातून काहीही धोका होईल असं वाटतं नाही

कर्नाटकात काँग्रेस पक्ष फोडून भाजपने ऑपरेशन लोटस केलं होतं. त्यात फुटणार्‍या काँग्रेस आमदारांचं नेतृत्व Ramesh Jarkiholi यांनी केलं. म्हणजे ते काँग्रेसचे एकनाथ शिंदे झाले. पुढे २०२१ मध्ये त्यांची सेक्स टेप बाहेर आली आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

आता भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांच्याच अशा टेप्स का येत आहेत? कोणाच्या घरात कॅश , कोणाचा सचिव कॅश घेतोय कोणाची सेक्स टेप, इ. गौहाटीतल्या टेप्सबद्दलही बोललं जातं.

आता यामागे कोणती महाशक्ती असेल ते सांगायला नको.

या पकडल्या गेलेल्या नेत्यांबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. शंभुराजे देसाईंचाही वेगळाच व्हिडियो आलाय. मंत्र्याला पोलिसांनी फरफटत नेलं.

किरिट सोमैयांचं काय झालं? उजळ माथ्याने = निर्लज्जपणे वावरताहेत. मुलगा नगरसेवक झाला ना?

तिकडे गोव्यात भाजप नगर सेवकाच्या मुलाचं प्रज्ज्वल रेवण्णा टाइप प्रकरण बाहेर आलंय.

>>
किरिट सोमैयांचं काय झालं? उजळ माथ्याने = निर्लज्जपणे वावरताहेत. मुलगा नगरसेवक झाला ना?
<<
किरीट सोमैयांचे नक्की काय चुकले? त्यांनी कुठल्या कायद्याचा भंग केला? त्यांनी कुठल्या सरकारी सोयींचा गैरवापर केला? त्यांनी अनैतिक कृत्य केले का? त्यांनी कुठल्या स्त्रीवर अत्याचार केले का?

इतक्यात वर आलेले धागे बघितले तर एकाच व्यक्तीचे प्रतिसाद.
मला या व्यक्तीच्या कमेण्ट्स पाहून मज्जा येते. पण या व्यक्तीला असे धागे पाहून मज्जा येते कि संताप येतो कि नेमके काय होते हे एकदा कळाले तर बरे होईल.

>>>>>
किरीट सोमैयांचे नक्की काय चुकले? त्यांनी कुठल्या कायद्याचा भंग केला? त्यांनी कुठल्या सरकारी सोयींचा गैरवापर केला? त्यांनी अनैतिक कृत्य केले का? त्यांनी कुठल्या स्त्रीवर अत्याचार केले का?>>>>>
Exactly my point.

रात्रीचे चांदणे..
>>>>>शासकीय निवास स्थानमध्ये लडफी करणार आणि >>>
तेच विचारतोय यात बेकायदेशीर काही केले आहे का?
नैतिक /अनैतिक , अश्लिल/श्लील च्या प्रत्येकाच्या लिमिट्स वेगळ्या असतात. त्यामुळे इकडे फक्त कायद्याच्या दृष्टीने विचार करू.

आणि शासकीय निवासस्थानी परस्पर सहमतीने कुणी शरीरसंबंध ठेऊ नयेत असा GR आहे का?
सहमती नसेल तर सगळेच बदलते

योगायोगाने, हे लिहिले आणि लगेचच मधू किश्वर/सुब्रमण्यमबस्वामी यांची ट्विट वाचनात आली.

>>>>>>पोझिशन चा गैरफायदा.
हा गंभीर आरोप आहे. जर त्यांनी दबाव टाकून त्या व्यक्तीची सहमती मिळवली असेल, किंवा त्या व्यक्तीला या संबंधाच्या बदल्यात काहीतरी देऊ केले असेल ( जे नॉर्मली तिला मिळाले नसते एखादी परवानगी, पद, खूप जास्त पैसे) तर तो पोझिशन चा गैरफायदा म्हणू शकतो. सरकारने या दृष्टीने जरूर तपास करावा. दोषीं दिसल्यास शिक्षा द्यावी>>>>
मी हे आधी लिहिलेले, पण या दोघांच्या दाव्यानंतर वरील विधानाला fit बसतील अश्या केसेस दिसायला लागल्या.

त्यामुळे इकडे फक्त कायद्याच्या दृष्टीने विचार करू.>>>>>
तुम्ही लिहिलं तस कायदेशीर दृष्ट्या काही चुकलंय असं वाटतं नाही.

नरहरी झिरवळ आदिवासी आहेत , म्हणून आदर्णीय रात्रीचे चांदणे यांनी झिरवळांचा उल्लेख एकेरी केला आहे का? यापूर्वी त्यांनी कोणाचा असा एकेरी उल्लेख केल्याचे आठवत नाही.

यासंदर्भात सकृतदर्शनी कायद्यानुसार गुन्हा कोणीही केलेला नाही, ना झिरवळांनी ना किरीट सोमय्यांनी, अशा घटनांच्या माध्यमातून अपेक्षित असलेले राजकीय फायदे कालांतराने उघड होतातच. पण राजकारणात परिस्थितीजन्य पुराव्यावरून केलेले आरोप हे निश्चितच दखलपात्र असतात. कूणास ठावूक न जाणो दोन्ही व्हिडिओज मधील समोरील व्यक्ती या कोणत्या तरी दबावाला बळी पडून त्या प्रकारासाठी तयार झाल्या असाव्यात? परिस्थितीजन्य पुरावा आहे तर वरील प्रश्नाची शहानिशा होणे गरजेचे आहे. या शिवाय ज्यांच्यावर आरोप होतात ते नेते तरी इतरांसोबत असे काय वेगळे करतात? किरीट सोमय्या यांच्या हाती तर त्या प्रकरणाच्या आधी सर्वांना कॅरॅक्टर सर्टिफिकेट वाटण्याची जणू एकाधिकारशाही होती.. कंपनी मुव्ही मधे त्या पोलिस कमिशनर श्रिनीवासन च्या तोडीं इथे फिट्ट होईल असे एक चपखल वाक्य आहे. "बस इतना समझ लो, ये जो भी हो रहा है, वो तुम्हारे धंदे की जात है."

संजय जोशीचे नक्की काय चुकले? त्यांनी कुठल्या कायद्याचा भंग केला? त्यांनी कुठल्या सरकारी सोयींचा गैरवापर केला? त्यांनी अनैतिक कृत्य केले का? त्यांनी कुठल्या स्त्रीवर अत्याचार केले का? हा देखील प्रश्न पडला.

नरहरी झिरवळ आदिवासी आहेत , म्हणून आदर्णीय रात्रीचे चांदणे यांनी झिरवळांचा उल्लेख एकेरी केला आहे का?>>>>>
भरत, हे झिरवळ काही वर्षा पूर्वी विधानसभा का परिषदेचे अध्यक्ष होते आणि राकॉ चे आहेत हे सोडून त्यांच्याबद्दल बाकी काही माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या वेळी बातम्यात दिसलेले त्या नंतर आत्ताच रील्स मध्ये दिसलें. त्यामुळे मुद्दाम त्यांचा उल्लेख एकेरी केला असं काही नाही.

आणि इतर मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला नसेल तर लिहायच्या सवयीमूळ असणार. मी कांय एवढा कोणत्या राजकारणी लोकांचा फॅन नाही. पण त्यांच्या पदाचा मात्र थोडाफार तरी मान ठेवायलाच पाहिजे.

>>> कॉर्पोरेट मध्ये सुद्धा 2 डिपार्टमेंट मधील 2 जणांचे संबंध असतील तर लोक शक्यतोवर त्यांचा प्रश्न आहे म्हणून दुर्लक्ष करतात.>>> बहुतेक कॉर्पोरेट मॅन्युअल्स मध्ये अशा प्रकारच्या संबंधांवर मज्जाव आहे.... कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अंतर्गत..... सापडले तर दोघांचीही हकालपट्टी होते.... अर्थात हे नोकरीच्या अटी तसेच कॉर्पोरेट मॅन्युअल मध्ये स्पष्ट असते... ज्यावर जॉइनिंगच्या वेळी सही घेतली जाते... स्वानुभवावरून लिहित आहे... न सापडलेल्या/पकडलेल्या उल्लंघनांबद्दल नाही

रेव्यु,
प्रत्येक कॉर्पोरेट ची पॉलिसी वेगळं असते..
काही ठिकाणी अशा संबंधांना पूर्ण मज्जाव असू शकतो
काही ठिकाणी हे डायरेक्ट रिपोर्टी नकोत इतकंच म्हणणं असते
पण सगळ्यांचं ठिकाणी हे संबंध HR la डिस्क्लोज करणे अपेक्षित असते (जे सीरियस असतील तर)
संबंध ' लफडे" स्वरूपाचे असतील तर लोक don't ask dont tell स्टँड घेतात.डायरेक्ट ऍक्शन होत नाही, पण वर सांगितले आहे तशी स्क्रुटिनी होत रहाते