भाग ७ : भारत सद्यस्थिती

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 11:35

८ डिसेम्बर २०२५ ला इराणच्या IRGC फोर्सेसनी UAE च्या दिब्बा बंदराजवळून निघालेले MT Valiant Roar ताब्यात घेतले. या जहाजावर बेकायदेशीररीत्या डिझेल वाहतूक करण्याचा आरोप लावला होता. त्यावरील १६ भारतीय कर्मचाऱ्यांना अटक करून बंदर अब्बास येथील तुरुंगात ठेवले गेले. भारतीय वकिलातीच्या मदतीस ८ खलाशांची सुटका करण्यात आली. परंतु अजूनही ८ भारतीय इराणमधील तुरुंगात आहेत. मोदींनी आम्ही इस्राएलबरोबर आहोत हा इशारा या पार्शवभूमीवर विचारात घेतला पाहिजे.

भारताने खामेनींच्या निधनानंतर लगेच शोक प्रकट केला नाही. परंतु इराणी वकिलातीने शोकसंदेश स्वीकारणे सुरु केल्यावर
परराष्ट्र सचिवांनी भारतातर्फे शोकसंदेश व्यक्त केला. हे इराण बरोबर बोलणी करण्यासाठी उघडलेले बॅक चॅनेल आहे.

अमेरिकेने ४ मार्चला हिंदी महासागरात इराणी नौसेनेच्या जहाजाला बुडवल्यावर भारतात प्रचंड गहजब मजला होता की भारताने नौदल कवायतीसाठी बोलावलेल्या जहाजाला सुरक्षा पुरवली नाही. परंतु परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केले की भारताने १ मार्चलाच
इराणच्या विनंतीनुसार ३ इराणी नौदलाच्या जहाजांना भारतात सुरक्षित आश्रय ऑफर केला होता. त्यापैकी Iris Lavan ४ मार्चला कोची बंदरात दाखल झाले व आजमितीला तिथेच आहे.

Iris Bushahr श्रीलंकेच्या कँडी बंदरात दाखल झाले तर Iris DENA भारतात पोहोचू शकले नाही.

भूराजकीय गणितं सोप्या बेरीज वजाबाकीसारखी चालत नाहीत. ती पत्त्यांसारखी असतात. तुमच्या वाट्याला जी कार्ड्स येतात ती खेळावी लागतात. कारण खेळ सोडून जाण्यासाठीही जबर दंड भरावा लागतो. तुमच्याकडे चांगली कार्ड्स असली तरी समोरच्याचा जोकर तुमचा खेळ बिघडवू शकतो.

भारताचे इराण आणि इस्राएल बरोबर वेगवेगळ्या गोष्टींसाठी चांगले संबंध आहेत. जे युद्ध भारताने सुरु केलं नाही आणि ज्या
युद्धात भारत कुणाचंच नुकसान करत नाही त्या युद्धात नैतिक जबाबदारी म्हणून/भावनेच्या आहारी जाऊन भारताने एका देशाची पाठराखण करावी आणि दुसऱ्या देशाला वाऱ्यावर सोडावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण भारताची नैतिक जबाबदारी
नेहमीच भारतीय नागरिकांचे हित पाहणे आहे.

युद्ध संपलेले नाही. यातले काही पदर हळू हळू उघडकीस येतील. काही गृहीतकं खरी ठरतील तर काही साफ कोलमडून पडतील.
भारताला तारेवरची कसरत करत परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. सध्या एवढेच....

अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<समोरच्याचा जोकर तुमचा खेळ बिघडवू शकतो.???
असाच एक जोकर सध्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आहे, आणि तो सगळ्या जगाचा विध्वंस करायला निघाला आहे.

संपूर्ण लेखमालेचे संदर्भ

https://www.fdd.org/analysis/op_eds/2023/09/12/biden-has-a-secret-illega...
https://www.wisconsinproject.org/iran-nuclear-milestones/
https://www.iranwatch.org/our-publications/weapon-program-background-rep...
https://www.theguardian.com/world/2002/oct/19/pakistan.northkorea
Goodbye Shahzadi: A Political Biography of Benazir Bhutto. By Shyam Bhatia (He was Benzir’s contemporary in Oxford)
https://history.state.gov/milestones/1969-1976/oil-embargo
https://nsarchive2.gwu.edu/NSAEBB/NSAEBB435/
https://archive.nytimes.com/www.nytimes.com/library/world/mideast/041600...
https://www.declassifieduk.org/iran-1953-mi6-plots-with-islamists-to-ove...
https://www.theguardian.com/world/2016/jun/10/ayatollah-khomeini-jimmy-c...
https://www.britannica.com/event/Iran-hostage-crisis
https://www.ndtv.com/india-news/india-stopped-purchasing-iranian-oil-aft...
https://www.orfonline.org/research/india-iran-the-parting-of-ways-50807
https://www.europeanfiles.eu/environment/the-eastern-mediterranean-corri...
https://goachronicle.com/israeli-gas-imec-and-the-new-energy-chessboard-...
https://restofworld.org/2026/gulf-overland-data-cables-europe-war/
https://en.wikipedia.org/wiki/Chabahar_Port
https://www.drishtiias.com/daily-updates/daily-news-analysis/chabahar-po...
https://www.reuters.com/world/india/india-sign-10-year-pact-with-iran-ch...
https://infra.economictimes.indiatimes.com/news/ports-shipping/indias-st...
https://www.britannica.com/topic/Bene-Israel
https://timesofindia.indiatimes.com/blogs/voices/the-kolhapur-connection...
https://www.aljazeera.com/news/2026/2/22/modis-israel-visit-timeline-of-...
https://www.timesofisrael.com/india-used-israeli-arms-for-strike-inside-...
https://theprint.in/defence/inside-story-of-attack-on-balakot-from-iaf-o...
https://www.businesstoday.in/india/story/operation-sindoor-how-these-isr...
https://www.aljazeera.com/news/2005/9/28/indias-iaea-vote-upsets-iran
https://www.indiatoday.in/latest-headlines/story/india-votes-against-ira...
https://timesofindia.indiatimes.com/india/from-caa-criticism-to-kashmir-...
thehindu.com/news/national/iaea-abstention-on-iran-in-line-with-indias-russia-non-alignment-policy/article65517236.ece
https://www.imec.international/
https://goachronicle.com/israeli-gas-imec-and-the-new-energy-chessboard-...
https://syriacpress.com/blog/2026/03/15/the-global-stakes-of-the-war-in-...
https://www.indiatoday.in/world/story/pakistan-news-sentae-condemns-isra...
https://www.indiatoday.in/history-of-it/story/india-israel-relations-mod...
https://edition.cnn.com/world/middleeast/iran-hostage-crisis-fast-facts

https://timesofindia.indiatimes.com/city/noida/war-deepens-worries-for-i...
https://www.bbc.com/news/articles/c2e4yxj0pd3o
https://www.nytimes.com/2026/03/12/world/asia/iran-ships-sri-lanka.html
https://en.wikipedia.org/wiki/Oil_smuggling_in_Iran
https://x.com/OmarAyubKhan/status/2030087737563324840
https://newsarenaindia.com/international/leaked-intelligence-report-expo...
https://www.arabnews.com/node/2612217/pakistan
https://www.nytimes.com/2026/03/11/us/politics/iran-school-missile-strik...
https://www.ndtv.com/india-news/kulbhushan-jadhav-kidnapped-from-iran-no...
https://www.business-standard.com/article/current-affairs/kulbhushan-jad...
https://www.gulftoday.ae/News/2019/07/18/Pakistanis-hail-army-captain-wh...
https://policenama.com/english/mullah-omar-irani-terrorist-who-kidnapped...
https://youtube.com/shorts/rSc6giod50w?si=lLCEurO2t1ap8Rg1

<< भारताचे इराण आणि इस्राएल बरोबर वेगवेगळ्या गोष्टींसाठी चांगले संबंध आहेत. जे युद्ध भारताने सुरु केलं नाही आणि ज्या
युद्धात भारत कुणाचंच नुकसान करत नाही त्या युद्धात नैतिक जबाबदारी म्हणून/भावनेच्या आहारी जाऊन भारताने एका देशाची पाठराखण करावी आणि दुसऱ्या देशाला वाऱ्यावर सोडावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण भारताची नैतिक जबाबदारी
नेहमीच भारतीय नागरिकांचे हित पाहणे आहे.
>>

------ नैतिक जबाबदारी? भारतीय नागरिकांचे हित पहाणे ( यांत जिव तसेच आर्थिक) हे भारत सरकारचे परम कर्तव्य ( duty) आहे.

मुलींच्या शाळेवर हल्ला झाला, दोनशे निरपराध लाहानग्या मारल्या गेल्या. मारल्या गेलेले निरपराधी जीव भारताचे नागरिक नसले तरी या व अशा मानवतेला लाजविणार्‍या घटनांविरुद्ध एक नैतिकता म्हणून बोलायला हवे.

काल हा लेख लिहून झाला आणि आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये साधारण सारखं मत व्यक्त करणारा हा शशी थरूर यांचा लेख प्रसिद्ध झाला. जरूर वाचा.

https://indianexpress.com/article/opinion/columns/shashi-tharoor-writes-...

@उदय >>> हो. नैतिक जबाबदारीपेक्षा कर्तव्य शब्द जास्त योग्य आहे.
मुलींच्या शाळेवरील हल्ल्याचा निषेध करायलाच हवा होता.

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 21:24>>>> हे सगळे रेफेरेंस असे एकगठ्ठा टाकण्या ऐवजी लेखांतील मुद्द्यांच्या/ पॅराग्राफ्सच्या खाली in-text citation च्या स्वरूपात टाकले असते तर क्रॉस व्हेरिफाय करणे सोपे गेले असते.

बहुतांश लिंकच्या अड्रेसमध्ये साधारण काय विषय आहे ते समजतं आहे. पण वेळ मिळाला तर प्रत्येक लेखाखाली टाकीन नेमक्या लिंक्स.

यांच्या चॅनेलवरचा कुठल्याही व्हिडियोला प्रायमर म्हणून घेऊन त्यावर पुढे डिग इन केल्यास जटील विषय समजत येतात.

https://www.youtube.com/watch?v=R-NJcY-uFAc&t

नन्द्या४३, माबो वाचक, srd, फार्स विथ द डिफरंस, उदय, अमितव >>> थँक यू

फार्स विथ द डिफरंस >>> तुम्ही दिलेला व्हिडीओ हळू हळू पाहते आहे. त्यात होर्मूझच्या सामुद्रधुनीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे युद्ध सुरु झाले हे पटते आहे. इतरही काही पॉडकास्टमधून अशीच मांडणी केली आहे. साधारण असेच उल्लेख बाब अल मंदेबच्या सामुद्रधुनीविषयी येत आहेत. पण इतर कुठे याचे फारसे संदर्भ मिळत नाहीत म्हणून लिहायचे टाळले.

अर्थात हे युद्धाचा पूर्ण निकाल लागून कोणतीही एक बाजू जिंकल्याशिवाय हे पूर्ण उलगडणार नाही.

सात विविध लेख झाल्याने मत कुठे व्यक्त करायचे हा प्रश्न आहे. सध्याच्या घडामोडी पाहता कुणीही या सर्व घटना एकजिनसीपणे पाहून मत व्यक्त करेल. ते असे टप्प्याटप्प्याने देता येत नाही.

भारतात आलेले जहाज परत जाताना बुडवले असे मी वाचले, क्रॉस व्हेरिफाय केले आहे. ते भारतात पोहोचलेच नाही ही माहिती नवीन आहे. भारतात आलेले जहाज हिंदी महासागरात बुडवले. इथे भारत क्लेम करतो कि हे आमचे क्षेत्र आहे. यावरून चीन आणि भारत यांच्यात वाद आहे. चीनने जर इंडीयन ओशन या नावाने भारताला संपूर्ण महासागरावर आपली मालकी आहे असे वाटत असेल तर आम्ही त्याचे नाव बदलू असे म्हटलेले आहे. चीन या भागात इन्फ्रास्ट्रक्चर उभे करत आहे. श्रीलंकेला त्याने कर्ज देऊन एक बेट घेतलेले आहे. तसेच इंडोनेशिया जवळ बेट घेतले आहे. मध्यंतरी मालदीवशी चीनची बोलणी चालू होती. त्या वेळी तिथेही डावे सरकार होते. मालदीवच्या पंतप्रधानांनी भारताच्या इंटरेस्टला छेद देणारी वक्तव्येही केली होती. यानंतर त्यांना जेव्हां गरज पडली तेव्हां भारताने आधी त्यांना झुकायला लावून नंतर मदत केली. हे सर्व आंतरराष्ट्रीय राजकारण इथे देण्याचे कारण म्हणजे जर भारत चीनला सुनावत असेल तर भारतापासून इतक्या जवळ, भारताच्या निमंत्रणावरून आलेले आणि ज्याला पीस ऑपरेशन म्हणतात अशा कामासाठी आलेले जहाज परस्पा तिसर्‍या देशाने ते ही चीन पेक्षाही दूर असलेल्या देशाने बुडवल्यावर साधी प्रतिक्रिया देऊ नये ?

अमेरिकन पाणबुड्या हिंदी महासागरात मुक्त संचार करतात, आपण चीनच्या पाणबुड्यांसाठी एक बेट भाड्याने घ्यायची तयारी चालवली आहे. मग अमेरिकन पाणबुड्यांच्या या संचाराला आपला आक्षेप नाही का ?

हे प्रश्न आहेत. या घटना कधीही सुट्या सुट्या बघता येत नाही. किमान पाच वर्षे सलग या घटना इंटरेस्ट असल्याने बघतोय म्हणून इथे नोंदवले. ज्याने माहिती दिली तो उजवा, डावा कि मध्यममार्गी याने फरक पडत नाही. त्यात कोणताही बायस असेल पण ट्रिगर तर होते माहिती. मग खंगाळून घेता येते. त्यामुळे माहिती देणार्‍यांचे स्वागतच.

ते ते भारतात पोहोचलेच नाही ही माहिती नवीन आहे.
>>> नाही. हे जहाज भारतिय नौदलासोबत कवायतींसाठी भारतात पोहोचले. त्या कवायती २५ फेब्रुवारीला संपल्या व जहाज परत इराणकडे निघाले.
२८ फेबु ला युद्ध सुरू झाल्यावर इराणने हिंद महासागरात असलेल्या आयरीस देनासहीत एकुण ३ जहाजांना भारतिय बंदरात आश्रय देण्याची विनंती केली. ती भारताने दुसऱ्या दिवशी मान्य केली. पण २५ फेबु ते १ मार्चच्या दरम्यान आयरीस देना श्रीलंकेच्याही पलीकडे पोहोचले होते. ४ मार्चला जवळचे बंदर म्हणून त्यांनी कॅंडी बंदरात आश्रय मागितला होता. श्रीलंकेत त्यावर चर्चा सुरू असताना अमेरीकेने ते जहाज बुडवले.

जहाज भारताच्या (आणि श्रीलंकेच्याही) मेरीटाईम किंवा एक्सक्लुजिव इकॉनॉमिक झोनमध्ये नव्हते, दोन देशांत युद्ध होत असेल तर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असलेले त्या देशांच्या नौसेनेचे कुठलेही जहाज वैध लक्ष्य असते. भारत युद्धात सामिल असता आणि याप्रकारे भारतिय नौदलाचे जहाज जरी बुडवले असते तरी याबद्दल भारत तक्रार करू शकला नसता.

जर भारताने सागरी कवायतीसाठी बोलवलेल्या इराणी जहाजाला आश्रय नाकारला असता तर भारत दोषी ठरला असता.

जर भारताच्या सागरी हद्दीत जहाज असताना अमेरीकेने जहाजावर हल्ला केला असता तर अमेरीका दोषी असती.

आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत इराणी जहाज त्यांचा झेंडा उतरवून व पांढरा झेंडा फडकवून मार्गक्रमण करत असताना अमेरीकेने जहाजावर हल्ला केला असता तर अमेरीका दोषी असती.

या हल्ल्याच्या बाबतीत कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम मोडला नाही किंवा संकेतभंग झाला नाही. त्यामुळे भारताच्या प्रतिक्रियेपेक्षा भारताने जहाजांना अभय देण्याचे मान्य करणे हे राजनैतिकदृष्ट्या जास्त मोलाचे आहे.

व्हाईस ॲडमिरल अरुण प्रकाश यांनी यासंदर्भात विचारलेला एक प्रश्न इथे महत्वाचा आहे की अमेरीकन अणुपाणबुड्यांचे या भागातील अस्तित्व व संचार भारताला माहित आहे की नाही. या प्रश्नाच्या उत्तरात भारतिय नौसेना व गुप्तचर विभागाचे यशापयश ठरेल. परंतु या प्रश्नाचे जाहिर उत्तर कोणतेही राष्ट्र देणार नाही.

चीनच्या पाणबुड्यांवरही भारत सरसकट आक्षेप घेतो याबद्दल मला माहिती नाही. फक्त हंबनटोटा बंदरात चीनने पाणबुडी आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा भारताने जोरदार आक्षेप घेतला होता.

<<या हल्ल्याच्या बाबतीत कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम मोडला नाही किंवा संकेतभंग झाला नाही.>>
भारताच्या हद्दीत नव्हते. पण हे जहाज आक्रमण करण्यास युद्ध सामुग्रीने भरले नव्हते, जहाजमध्ये कॅडेट्स होते आणि ते प्रदर्शनात भाग घेण्यास आले होते. युद्ध सुरू आहे त्या क्षेत्रापासून कितीतरी लांब होते. तरीही त्यावर हल्ला करण्यात आंतरराष्ट्रीय सीमा नियमभंग झाला नसला तरी काही संकेतभंग झाला नाही का? आपल्या निमंत्रणावरून आले होते आणि अंगणात नाही तरी अंगणासमोर बुडवण्यात आले. त्याबद्दल नाराजी व्यक्त करता आली असती असे वाटते.

<<या हल्ल्याच्या बाबतीत कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम मोडला नाही किंवा संकेतभंग झाला नाही.>> या बद्दल तुम्ही ठाम आहात की कोणताच संकेतभंग झाला नाही??

अंतराचा प्रश्न नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरीका उतरली नसताना जर्मन यु पाणबुड्या अटलांटिकमध्ये धुमाकूळ घालत होत्या. जेव्हा त्यांनी सिव्हिलिअन शिप्सवर सर्च ॲंड रेझिस्ट ऑपरेशन करण्याऐवजी वॉर्निंग न देता हल्ले केले तेव्हाच त्यांना वॉर क्राईम म्हटले गेले.

इथे युद्धनौकेवर हल्ला चढवण्यापूर्वी अमेरीकेने नौकेवरील इराणी नौसैनिकांना जहाज सोडण्याची दोनदा वॉर्निंग दिली होती अशी माहिती नौकेवरील खलाशाने त्याच्या कुटुंबियांना दिली होती. जहाजाच्या कमांडरने जहाज सोडायला नकार दिला. त्यामुळे संकेतभंग नाही.

https://www.iranintl.com/en/202603071125

दुसरी गोष्ट म्हणजे या सागरी कवायतींमध्ये live fire, under water fire इ. समाविष्ट होते ज्यात खऱ्या दारूगोळ्याचा वापर होतो. त्यामुळे आयरीस देना पूर्णतः निशस्त्र होते हा इराणचा दावा १००% खरा मानता येणार नाही.

याबाबत काही नवीन माहिती उजेडात आली तर गोष्ट वेगळी.

<< भारताच्या निमंत्रणावरून आलेले आणि ज्याला पीस ऑपरेशन म्हणतात अशा कामासाठी आलेले जहाज परस्पा तिसर्‍या देशाने ते ही चीन पेक्षाही दूर असलेल्या देशाने बुडवल्यावर साधी प्रतिक्रिया देऊ नये ? >>

------ युद्धनौका कुठल्या पाण्यांत होती याला तेव्हढेही महत्व नाही. अफाट ताकद आहे, महासत्तेला आपल्या महाशक्तीचा महामाज आहे म्हणून कुठलाही धोका नसलेल्या इराणची नौका हिंद महासागरांत बुडविली. नियम/ नैतिकता गेली उडत, निशस्त्र लोक मरतांना पाहून एक विकृत आनंद होतो.

सागरी क्षेत्राची विभागणी बेसलाईन, internal waters (पूर्ण अधिकार) , territorial sea ( १२ nautical mile nm), contiguous zone ( २४ nm), Exclusive Economic Zone ( EEZ २०० nm) विविध भागांत होते . या प्रत्येक क्षेत्राची व्याख्या UN च्या करारांत आहे,
https://www.un.org/depts/los/convention_agreements/texts/unclos/unclos_e...

भारत आणि श्रीलंका यांच्या सिमा अगदी जवळ आहेत. काही ठिकाणी ९ - १४ nm अंतर आहे. युद्धनौका भारतीय सागरी हद्दीपासून दूर गेली असली तरी भारतीय नौदलाच्या आमंत्रणा वरुनच भारतात आली होती. घरी आलेला पाहुणा त्याच्या घरी सुखरुप पोहोचत नाही तो पर्यंत त्याची जबाबदारी आपली असते हा झाला नैतिकतेचा भाग.

युद्ध नौका आंतरराष्ट्रिय पाण्यांत असली तरी तिला बुडविण्याचा मुक्त परवाना अमेरिकेला मिळत नाही हे सांगण्याचे धाडस मोदी यांच्याकडे नाही. हिंदमहासागरावर आपले नियंत्रण या समजूतीला छेद मिळाला.

माझे मन,

मी जास्त लिहीत नाही याचे कारण लगेच संदर्भ शोधत बसावे लागेल. पण विश्वास ठेवा, मला या घडामोडींची माहिती आहे. भारताने चीनच्या जहाजांना हिंदी महासगारत प्रवेश केल्यावरून तक्रार नोंदवली आहे. तसेच श्रीलंकेशी चीनला बेट न देण्याबाबत चर्चा केली आहे. मालदीवची कोंडी याच कारणावरून केली होती. फिलिपिन्सशी चीनला रोखण्याबाबत करार झालेला आहे. चीनच्या सबमरीन्सच्या हिंदी महासागरातल्या वावराबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे.

मग अमेरिकन सबमरीनच्या या हल्ल्याबाबत भारताचे धोरण हे असंबद्ध आणि शंकास्पद नाही का ? अलिप्त असेल तर ते समान असायला हवे. अमेरिकेला अनुकूल राहण्याचे कारण काय ? त्याबाबत मी नंतर लिहीनच. अमेरिका दिवसेंदिवस मस्तवाल होत चालल्यानेच या वेळी अमेरिकेच्या बाजूने कुणी नाही. याचा थोडक्यात आढावा घेणारी पोस्ट मी लिहीली होती. तिथे चर्चा होऊ शकते, कारण ती या सर्वच गोष्टींचा आवश्यक तेव्हढा आढावा घेते. वेगवेगळ्या धाग्यांवर हे शक्य नाही.

<< या हल्ल्याच्या बाबतीत कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम मोडला नाही किंवा संकेतभंग झाला नाही.>>

------ नियम मोडला नाही Sad

युद्धनौका अमेरिकेच्या सांगरी हद्दीत नव्हती तर आंतरराष्ट्रिय पाण्यांत किंवा श्रीलंकेच्या EEZ मधे होती म्हणून मारण्याचा मुक्त परवाना मिळत नाही. अमेरिकन दादागिरीच आहे - माना अथवा मानू नका.

एखाद्या शांततेच्या कामगिरीवर असलेल्या जहाजावर हल्ला करता येत नाही असा नियम आहे. भारताने तुर्कस्तानच्या समुद्रात ग्रीस देशासोबत लष्करी सराव केला होता तेव्हां तुर्कीने भारताच्या जहाजावर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. तेव्हां भारताने याच संकेतांचा हवाला दिला होता. तुर्की नाटो देश असल्याने तुर्कीला आपण करू ते चालेल असे वाटले होते. पण भारताने मग रेग्युलर तीन फ्रिगेटस पाठवल्या. यालाही आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार मान्यता आहे आणि नाटोने या वेळी तुर्कीचे कुठलेच समर्थन केले नव्हते.

संकेत किंवा कायदे एकतर्फी नसतात. युद्धात भाग घेण्यासाठी जहाजाने येणं आणि पीस मिशन साठी येणं यात फरक आहे. संयुक्त लष्करी सराव हे युद्ध नाही. त्यात भाग घेणार्‍या जहाजावर हल्ला करता येत नाही, जरी त्या जहाजाचा मालक देश युद्धात असेल तरीही.

भारताचे धोरण अलिप्त नाही आहे. ते अमेरिकेला अनुकूल आहे असेही दिसत नाही.
बळी ( अमेरिका) तो कान पिळी. आपण उघड्या डोळ्याने सहन करत आहोत.

गैरमार्गाने अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांच्या हातापायांत, गळ्यांत साखळ दंड घालून, त्यांना लष्करी विमानाने भारतात धाडले. या आधी भारतीयांना भारतात परत पाठविण्याच्या घटना घडल्या आहेत पण असा प्रकार पहिल्यांदाच झालेला आहे. पहिले लष्करी विमान आले. भारताने काय केले ? काही नाही म्हणून मग दुसरेही विमान अशाच पद्धतीने पाठविले.
बळी ( अमेरिका) तो कान पिळी.

गैरमार्गाने अमेरिकेत प्रवेश करणार्‍यां भारतीय नागरिकांमधे बहुतेक लोक गुजरात आणि पंजाब राज्याचे होते.

मारण्याचा मुक्त परवाना मिळत नाही >>> आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आहे म्हणून नाही, युद्ध आहे म्हणून मारू शकतात एवढंच मी म्हटलं आहे कारण युद्धातल्या विरोधी देशाच्या नौसेनेचं जहाज आहे.

मुळात या युद्धाचं कारणच मला मान्य नाही त्यामुळे अमेरीकेला पाठिंबा नाही. फक्त ही विशिष्ट घटना युद्ध गुन्हा म्हणून (सॅन रेमो मॅन्युअलप्रमाणे) नोंद होईल असं मला वाटत नाही.

@एक लेखक>>> तुम्ही चीनविषयी जरूर लिहा. मालदिवची केस वरवर माहिती आहे. पण एकंदरीत चीन आणि भारताचे संबंध याविषयी फारसं काही वाचलेलं नाही.

गैरमार्गाने अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांच्या हातापायांत, गळ्यांत साखळ दंड घालून, त्यांना लष्करी विमानाने भारतात धाडले.
>>>
या धाग्यावर आत्ता चाललेल्या युद्धासंबंधीच लिहूया. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक टॉपिकची चर्चा नको.

थोडी शोधाशोध करून सविस्तर उत्तर पुन्हा देतो. आंतरराष्ट्रीय संकेत / कायदे :

१. Laws of Armed Conflict (LOAC) / Geneva Conventions:

युद्धकाळातही काही गोष्टी बेकायदेशीर आहेत. जहाज exercise संपवून परतत असेल तर ते शांततेच्या ( non-combatant status - to be more precise ) मध्ये असते. त्यावर हल्ला करणे युद्ध अपराध ( war crime) च्या व्याख्येत येऊ शकते.

२. UNCLOS (UN Convention on Law of the Sea):

युद्धपोत ( Warship) ला सार्वभौम उन्मुक्तता / सार्वभौम प्रतिरक्षा / सार्वभौम संरक्षण / sovereign immunity* असते. त्यावर हल्ला म्हणजे त्या देशावर म्हणजे इराणवर थेट लष्करी हल्ला . हे आधीच चालू युद्धाचा भाग म्हणता येईल पण न्युट्रल वॉटर्स मध्ये हल्ला करणे हे समानुपातिकतेचे तत्त्व / proportionality principle चे उल्लंघन आहे.

३. UN Charter Article 51

स्व- संरक्षण Self-defense फक्त लष्करी हल्ला झाल्यावरच समर्थनीय ( व्हॅलीड) आहे. संयुक्त सराव संपवून परतणारे जहाज म्हणजे हल्लेखोर समजता येत नाही , त्यामुळे स्व- संरक्षणाचा self-defense चा दावा इथे valid नाही.

४. Hague Conventions

युद्धकाळात सुद्धा आंतरराष्ट्रीय तटस्थ / neutral किंवा धोकादायक नसलेल्या ( non-threatening ) वाहनांवर हल्ला करणे बेकायदेशीर आहे.

थोडक्यात आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा हल्ला बेकायदेशीर आहे . मग अमेरिका-इराण युद्ध चालू असले तरी. Exercise संपवून परतणाऱ्या जहाजावर हल्ला हे proportionality आणि distinction principle दोन्हींचे उल्लंघन आहे.

पण वास्तव काय ?
आंतरराष्ट्रीय कायदा लागू करणारी कोणतीही यंत्रणा नाही, युनायटेड नेशन्स च्या सुरक्ष परीषदेत ( UN Security Council ) मध्ये अमेरिकेचा चा व्हेटो आहे. त्यामुळे कायदेशीर बेकायदेशीरपणा ठरवणे याबाबतीत अमेरिकेची दादागिरी आहे. ही एक गोष्ट, आणि त्याचे परिणाम होणे वेगळी गोष्ट. म्हणजे अमेरिका कोणतेच संकेत, कायदे पाळत नाही. आपंण त्याचे लंगडे समर्थन करतो.

* सरकारी / अधिकृत मराठी शब्द दिले असले तरी त्याने घोटाळा होऊ नये यासाठी इंग्रजी शब्द दिले आहेत. शंका असेल तर इंग्रजी शब्द प्रमाण मानावेत.

<<गैरमार्गाने अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांच्या हातापायांत, गळ्यांत साखळ दंड घालून, त्यांना लष्करी विमानाने भारतात धाडले.
>>>
या धाग्यावर आत्ता चाललेल्या युद्धासंबंधीच लिहूया. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक टॉपिकची चर्चा नको. >>

------ धाग्याचे नाव " भारत सद्यस्थिती " आहे. केवळ आत्ता चाललेल्या इराण युद्धासंदर्भात आहे हे माहित नव्हते.

मी उल्लेख केलेली घटना अगदी मागच्या वर्षीची आहे. आपल्याच नागरिकांच्या मानवी हक्कांबाबत तेव्हा कच खाणारे नेतृत्व बोलले नव्हते तर आज इराणसाठी काही बोलतील अशी अपेक्षा का करावी ?

या पोस्टमधे वेगळा अँगल मांडतो.

USS Charlotte ने हल्ल्यानंतर वाचलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. जिनिव्हा ठरावानुसार ( Second Geneva Convention) या कायद्याच्या Article 18 नुसार survivors ना शक्य तितकी मदत करणे बंधनकारक आहे. यावरून युद्ध अपराध- war crime चा प्रश्न उपस्थित होतो.
भारताबद्दल:
भारताचे माजी नौदल प्रमुख अरूण प्रकाश म्हणाले, भारताने आपल्या आमंत्रणावर आलेल्या जहाजाचे संरक्षण करणे अपेक्षित होते. अमेरिकेने भारताच्या माहितीशिवाय भारताच्या backyard मध्ये समुद्री युद्धजन्य परिस्थिती maritime warfare आणली.

महत्त्वाच्या links:

Wikipedia: https://en.wikipedia.org/wiki/Sinking_of_IRIS_Dena
Just Security (legal analysis): https://www.justsecurity.org/133397/sinking-iran-frigate-dena-law-naval-...
Responsible Statecraft (war crime प्रश्न): https://responsiblestatecraft.org/sinking-iran-ship-war-crime/
NRI Affairs (India angle): https://www.nriaffairs.com/the-sinking-of-iris-dena-a-quiet-death-of-the...

एक लेखक बरोबर आहे.
कुठे व कोणत्या जहाजांवर हल्ला करता येतो व करता येत नाही याची नियमावली सॅन रेमो मॅन्युअल १९९४ मध्ये आहे आणि त्यातच यावर किंतु परंतु सुद्धा आहेत. अगदी हॉस्पिटलशिपवर हल्ला करू नये पण त्याच्या आड काही चालले असेल तर (आणि तशी शक्यता नाकारताही येत नाही)? अशा परिस्थितीत करू शकता वगैरे.
हल्ला करून जहाज बुडवले तर त्यातून बुडणाऱ्यांना हल्ला केलेल्या जहाजाने/पक्षाने वाचवावे हा सुद्धा नियम आहे. पण असे बचाव कार्य करण्यात हल्ला करणारे जहाज स्वतःच धोक्यात येत असेल तर? (प्रतिहल्ला होईल वगैरे) तर सूट आहे. अमेरिकन सबमरीन हल्ला करून निघून गेली. वर आणली तर आम्हीच टार्गेट झालो असतो असे म्हणु शकतात.
तेव्हा नियमांमधून पळवाट काढुन हल्ला करण्याचे, बचाव कार्याची जबाबदारी झटकण्याचे कारण शोधणे कठीण नाही. तेच अमेरिकेने इथे केलेले दिसतेय.
(Dan Caine ने हे जहाज बुडवल्याचे सांगताना आपण कुठेही कसे शत्रुचे जहाज उडवु शकतो वगैरे अभिमानाने सांगितले. वॉर्निंग दिली असल्याचा त्यात उल्लेख नाही. ट्रम्प नंतर "जनरल्स म्हणाले बुडवण्यात मजा येते, पकडण्यात नाही" म्हणाला.)

----
तुमची दुसरी पोस्ट मी ही पोस्ट लिहीत असताना आली, तुम्ही त्यात बचाव कार्य जबाबदारी मुद्दा सुद्धा मांडला आहेच.

या सगळ्या घडामोडी या सुट्या कशा बघता येतील ?

जर उद्या अमेरिका युद्ध हरली ( शक्यता कमी आहे) तर अमेरिकेवर या कायद्यांन्वये खटले भरण्यात येतील. जर्मनीने पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात अशीच मनमानी केली, त्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्याच्यासाठीच तर संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली आहे ना ? पण त्याला अमेरिकेने बाहुला बनवून ठेवला आहे. रशिया आर्थिक दृष्टीने कमजोर झाल्याने जग एकध्रुवीय झाल्याने अमेरिका उन्मत्त झाली आहे याबद्दलची नाराजी आहे.

अशा वेळी भारताने काय करायला हवे हे सांगण्याइतकी माझी हैसियत नाही.
पण लांबचा विचार करता घडामोडींचा अदमास घेऊन आपली पावले पडायला हवीत ही एक नागरीक म्हणून अपेक्षा आहे. अमेरिका युद्ध हरणार नाही याचीच शक्यता जास्त, पण सुपरपावर म्हणून तिची पत आज पणाला लागलेली आहे. या युद्धात दोन अदृश्य देश आहेत. रशियाने भारताला स्वस्त तेल दिले नाही पण पाकिस्तानला दिले यावरून आक्रंदन चालू असले तरी त्यामागे रशियन डिप्लोमसी आहे.

पाकिस्तानचे भूराजकीय स्थान हे महत्वपूर्ण आहे. पाक याचा फायदा उठवत असतो. तो चीन आणि अमेरिका दोघांनाही झुलवतो. मात्र पाक लष्कर हे अमेरिकेच्या तंत्राने चालते. यामुळे रशियाला इथे हस्तक्षेप करायची संधी मिळालेली नाही. आज पाकिस्तानची अवस्था तेल विकत घ्यायची नाही, त्यातच तेलाचा तुटवडा आहे. अशा वेळी रशियाने जर स्वस्तात तेल दिले तर पाकिस्तान नाही म्हणू शकत नाही. पण त्या बदल्यात रशिया अटी घालणार हे उघड आहे. भारताला रशियाने स्वस्तात भरपूर तेल दिले पण त्याचा भारताने व्यापार केला. आज रशिया स्वत:च व्यापार करू शकतो. भारताकडून युरोपला तेल जाण्याऐवजी रशियाने युरोपलाच वेठीस धरले आहे.

२०२७ पासून रशियन तेलावर बंदी असा ठराव येण्याआधीच ( अशा बैठका चालू आहेत) रशियाने जाहीर केले कि उद्या बंदी आहे तर आजच आम्ही सवय का करू नये ?

हे समजून घ्यावे लागते.
म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेपासून रशिया तोडत आहे. इराणचे सर्व हल्ले हे डावपेचात्मक असल्याने अरब भूमीतून अमेरिकेची पीछेहाट झाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही असे अंदाज आहेत. अमेरिकन डॉलरचे महत्व अरबच्या पेट्रोल मुळे असल्याने पेट्रोडॉलर हे स्टेटस गेले तर डॉलरवरचे अवलंबित्व कमी होईल.

म्हणजे वेगाने जगाची आर्थिक समीकरणे बदलतील.
ब्रिटन एकेकाळी जागतिक सत्ता होती, ती अमेरिकेची चमचेगिरी करण्य़ाइतपत घसरेल हे कुणी सांगितले नव्हते. दुसरे महायुद्ध ब्रिटन जिंकले पण महासत्ता हे स्टेटस गमावून बसले.

फ्रान्स ही सुद्धा महासत्ता होती. तिनेही स्टेटस गमावले.
रशियाने आपले स्टेटस गमावले.

त्यामुळे अमेरिका महासत्ताच राहील असे मानणे कितपत योग्य आहे ?
आज आपण जी भूमिका घेत आहोत त्यामुळे पुढच्या भविष्यात आपले संबंध उद्याच्या शक्तींशी कसे राहतील ?
हा विषय आहे.

Pages