इस्रायल

Submitted by भरत. on 5 April, 2026 - 08:05

इस्रायलबद्दलची वाचनात आलेली आणि लक्षात राहिलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्‍याला पकडून आणून शिक्षा देणं. रीडर्स डायजेस्टमध्ये शेवटचं सदर एखाद्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती हे असतं. त्यात हे वाचलं होतं.
मग एका पाठ्यपुस्तकात एका मराठी व्यक्तीने लिहिलेल्या इस्रायलच्या प्रवासवर्णनाचा भाग वाचला. त्यात येशूशी संबंधित जागांचा उल्लेख होता. यात सेंट पीटरचं घर , The Mount of Beatitudes , caesarea इथे उत्खननात सापडलेले अँफीथिएटर , जुने बंदर, जलवाहतुकीची व्यवस्था , राजवाड्याचे अवशेष यांचा उल्लेख होता. तिथल्या सिनियर केअरबद्दल माहिती होती.

इस्रायलच्या एकमेव महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांच्याबद्दल वाचलेलं आठवतं.

गेल्या दोनअडीच वर्षांत इस्रायलबद्दलची नवीजुनी माहिती डोळ्यांवर आदळते आहे.
ती काही सूत्रात वा कालानुक्रमे लिहिणं कठीण आहे.
रोज काही माहिती इथे लिहावी असा प्रयत्न असेल.
यातून इस्रायल अधिक समजून घेता येईल कदाचित.
इतरांकडून माहिती आल्यास स्वागत.

यात नजीकच्या भूतकाळातल्या आणि वर्तमानकाळातल्या बातम्याही येतीलच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यिट्झॅक राबिन Yitzhak Rabin हे १९७४-७७ आणि १९९२-९५ असे दोनदा इस्रायलचे पंतप्रधान होते. पॅलेस्टाइनमध्ये जन्मलेले ( १९२२ ) असे ते इस्रायलचे पहिलेच पंतप्रधान होते. ते एक सैनिक होते आणि १९६४ साली इस्रायलच्या संरक्षणदलाचे मुख्य झाले. पुढे त्यांनी अमेरिकेत राजदूत म्हणून काम पाहिले. १९९२ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पॅलेस्टाइनसोबत शांततेसाठी प्रयत्न केले. अनेक करार घडवून आणले. यासाठी त्यांना त्यांचे राजकीय विरोधक Shimon Peres आणि पी एल ओ चे यासेर अराफत यांच्यासह १९९४ चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला.
पुढल्याच वर्षी या शांतीप्रयत्नांना विरोध असणार्‍या व्यक्तीकडून त्यांची हत्या झाली.
Itamar Ben-Gvir यांनी त्या काळात राबिन यांच्या विरोधात तीव्र आंदोलन / निदर्शने केली होती. We got to his car, and we'll get to him too असे सांगत त्यांच्या कारवरचे एम्ब्लेम पळवले. राबिन यांची हत्या करणार्‍यांशी त्यांचे जुने संबंध आढळून आले. त्या खुन्याला तुरुंगात भेटायचा त्यांनी प्रयत्न केला. आज हेच Itamar Ben-Gvir इस्रायलचे Minister of National Security संरक्षणमंत्री आहेत.

धनंजय माने ह्यांचा मित्र परशुराम हा ७० रुपयांचे डायबेटीसचे रामबान औशध घ्यायला इस्राईललाच जाणार होता पण दुर्दैवाने तो वारला. Sad
हाहा जोक्स अपार्ट, मुस्लिम देशांनी घेरलेला नी भांडून टिकूबी राहिलेला देश म्हणून इस्रायल ची ओळख आहे!

नुकतंच "mossad : the greatest missions of Israeli secret service" हे पुस्तक वाचलं.
इस्राएल च्या स्थापनेपासून जवळपास २०१२ पर्यंत मोसाद ने केलेल्या महत्त्वाच्या ऑपरेशन वर हे पुस्तक आहे.
बरीच माहिती मिळाली त्यातून.
त्यावरच्या काही ऑपरेशनस वर आधारित चित्रपट आणि डॉक्युमेंटरी शोधून बघितल्या.

सध्याच्या पंतप्रधाना चा भाऊ योनी हा ऑपरेशन thunderstorm ह्यात मारला गेला. तेव्हा नेत्यान्याहू विरोधी पक्षनेते होते.

प्रशासनाने जर त्यांना गैरसोयीच्या विषयांची यादी प्रसिद्ध केली तर ते वगळून लिहीण्यासारखे काही उरत असेल तर लिहीता येईल. अन्यथा नंतर मेहनत वाया जाईल.

ज्यू लोकांचा इतिहास आणि संघर्ष
मातृभूमीची ओढ: ज्यू लोकांचा जेरुसलेमशी असलेला संबंध ३,००० वर्षांहून जुना आहे. राजा डेव्हिडने हे शहर ज्यूंची राजधानी म्हणून वसवले होते. सुमारे २,००० वर्षांच्या वनवासानंतर (Diaspora) पुन्हा आपल्या पवित्र भूमीत परतण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
दुसऱ्या महायुद्धानंतर आणि होलोकॉस्टच्या (ज्यूंचा नरसंहार) भीषण अनुभवानंतर, ज्यूंसाठी स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असणे ही केवळ गरज नसून जगण्याचा प्रश्न होता.
१९४८ चे युद्ध: इस्रायलच्या स्थापनेची घोषणा होताच शेजारील सात अरब देशांनी त्यावर आक्रमण केले. ज्यूंनी अत्यंत तुटपुंज्या शस्त्रास्त्रांनिशी, पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जेरुसलेमचे संरक्षण केले.
डेव्हिड बेन-गुरियन आणि नेतृत्व: इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन आणि गोल्डा मायर यांच्यासारख्या नेत्यांनी विखुरलेल्या ज्यू समाजाला एकत्र आणून राष्ट्राची उभारणी केली .
ज्यूंचा प्राचीन इतिहास आणि 'डायस्पोरा' (Diaspora)
हद्दपारीचा काळ: इसवी सन ७० मध्ये रोमन साम्राज्याने जेरुसलेममधील त्यांचे दुसरे पवित्र मंदिर (Second Temple) नष्ट केले आणि ज्यूंना तिथून हाकलून दिले. तेव्हापासून ते जगभर विखुरले गेले, ज्याला 'डायस्पोरा' म्हणतात.
प्रार्थनेतील ओढ: गेली दोन हजार वर्षे ज्यू लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी, दरवर्षी "पुढच्या वर्षी जेरुसलेममध्ये भेटू" (Next year in Jerusalem) ही प्रार्थना करत असत. ही दोन हजार वर्षांची प्रतिक्षा १९४८ मध्ये संपली.
या बद्दल सविस्तर जाणून घेण्या करिता ओ जेरुसलेम हे गाजलेले पुस्तक वाचा. लेखक- डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिन्स
या व्यतिरिक्त याच पुस्तकावर एक उत्तम मालिका यु ट्यु ब वर आहे....https://www.youtube.com/watch?v=Grzy8AekLHg
३ भाग आहेत. जरूर पहा
आणि हा २ तासांचा चित्रपट.... यात फ्रेन्च ते इंग्लिश सबटायटल्स निवडा व पहा... अप्रतिम
https://www.youtube.com/watch?v=GeYOUdKiLm8

इस्रायलबद्दल खुप काही वाचले आहे. फक्त १/३ भाग शेतीसाठी योग्य मिळाल्यावर त्यांनी त्यावर उच्च प्रकारची यशस्वी शेती करुन दाखवली. इतकी यशस्वी की ५००० वर्षे शेतीप्रवण असलेल्या देशालाही इस्रायलच्या ट्रिपा करुन त्यांचे गुपीत समजाऊन घ्यावेसे वाटते.

त्यांच्या देशप्रेमाबद्दलही खुप वाचलेय. किबुत्समधला डॅनी….. पुस्तकात दुसर्‍या देशात अपहरण करुन नेलेल्या विमानातुन सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्याबद्दल वाचले होते, युद्ध गुन्हेगारांना त्यांनी शोधुन काढुन दंडीत केले हेही वाचलेय. ज्यु नरसंहाराच्या स्मृतींचे व्यवस्थित जतन करुन जग कधीही तो संहार विसरणार नाही याची खातरजमा केली…

मला त्याण्च्यावर एकच आक्षेप आहे. त्यांनी जो वनवास २००० वर्षे भोगला नेमका तोच वनवास एका दुसर्‍या समुहाच्या माथी मारुन जगाने त्यांना त्यांची हक्काची जागा दिली. स्वतःची ससेहोलपट त्यांना माहित होती, त्या ससेहोलपटीत सापडलेल्या तिथल्या मुळ लोकांना त्यांनी प्रेमाने सांभाळायला हवे होते. अर्थात हे समीकरण इतके सोपे नाही, त्यात प्रचंड गुंतागुंत आहे हे माहित आहे. पण सुरवातीपासुनच त्यांनी सगळ्या शेजार्‍यांविषयी आक्रमक भुमिका घेतली. ती तशी घेतली नसती तर कदाचित जगाचा इतिहास वेगळा झाला असता. आता सगळेच हातातुन निसटले आहे.

इस्रायलच्या एका संस्थेचे नाव यंदा गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आले - सर्वाधिक किडनी दात्यांचे संमेलन भरवल्याबद्दल.

त्याआधी काही महिने गिनिस बुकने इस्रायलच्या प्रवेशिका घेण्याचे थांबवले होते. - कारण राजकीय. मग कायदेशीर मार्गाने गिनिस बुकवाल्यांना या प्रवेशिका घेण्यास भाग पाडले गेले. आता थोडं मागे जाऊ .
Israel has admitted that in the 1990s, its forensic pathologists harvested organs from dead bodies, including Palestinians, without permission of their families.

इस्रायलकडे कायम पॅलेस्टिनी लोक बंधक असतात. मारले गेलेल्या पॅलेस्टिनींचे मृतदेहही असतात. गाझा प्रशासनाने इस्रायलवर या मृतदेहांतील अवयव काढून घेतल्याचा आरोप केला आहे.

शुरू से शुरू करते है.

अनेकांनी बघितला असेल, पण रेकॉर्ड म्हणून इथं टाकतो. पावणेपाच तासांचा व्हिडिओ आहे. हे सारं ऐकल्याशिवाय कॉमेंट करणं म्हणजे व्यर्थ म्हणायला पाहिजे.

https://youtu.be/wVYZFNCmrBI?si=_z34dKVXLGOVTQ8E

साजिरा धन्यवाद
अनेकांनी पाहिला नसेल हा व्हिडिओ
वेळ काढून पूर्ण बघेन असे व्हिडिओ खालील कॉमेंट वाचून वाटत आहे

साधनाजी >> स्वतःची ससेहोलपट त्यांना माहित होती, त्या ससेहोलपटीत सापडलेल्या तिथल्या मुळ लोकांना त्यांनी प्रेमाने सांभाळायला हवे होते. अर्थात हे समीकरण इतके सोपे नाही, त्यात प्रचंड गुंतागुंत आहे हे माहित आहे. पण सुरवातीपासुनच त्यांनी सगळ्या शेजार्‍यांविषयी आक्रमक भुमिका घेतली. ती तशी घेतली नसती तर कदाचित जगाचा इतिहास वेगळा झाला असता. आता सगळेच हातातुन निसटले आहे>>
अगदी खरे आहे

जेरुसलमे मध्ये ननवर हल्ला, लाथा घातल्या
https://www.youtube.com/shorts/zJoTSl42A0Q

https://www.timesofisrael.com/idf-soldier-seen-placing-cigarette-virgin-...
IDF soldier seen placing cigarette in Virgin Mary statue’s mouth in Lebanese village

Outrage over Israeli soldier's vandalism of Jesus statue in Lebanon
https://www.bbc.com/news/articles/cpd575n1znzo

पॅलेस्टिनी, लेब नीज लोकांना मारलं तर बक्षीस मिळतं. या वरच्या तीन प्रकरणांची इस्रायल चौकशी करतं आहे.

पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्‍याला पकडून आणून शिक्षा देणं.

ॲडॉल्फ आईकखमन (Adolf Eichmann) त्याचे नाव, सगळे करून सावरून नंतर अर्जेंटिना मध्ये सेटल झाला होता, त्याला मोसादने तिथून स्नॅच ऑपरेशन करून यशस्वीरित्या extract केले आणि इस्राएल मध्ये आणले जिथे त्याच्यावर खटला भरून त्याला देहांत शासन करण्यात आले होते

images (33).jpegॲडॉल्फ आईखमन

भारतीय न्यायाधीश श्रीनिवासन मुरलीधर यांनी UN Independent International Commission of Inquiry on the Occupied Palestinian Territory या नात्याने इस्रायलने पॅले स्टिनींवर केलेल्या अ त्याचारांबद्दल एक सविस्तर अहवाल सादर केला आहे.

हिंद रजाबच्या हत्येची चौकशी इस्रायल करणार आहे.

या दोन गोष्टींबद्दल इथे सविस्तर लिहायचं राहिलं आहे.

वेस्ट बँकमधल्या एका इस्रायली सेटलरने ( यांना घुसखोर नाही म्हणायचं. तो शब्द बांग्लादेशी, रोहिंग्यांसाठी आणि युरोपात जाणार्‍या मुस्लिमांसाठी राखीव आहे) एका नन वर हल्ला केला. तिला ढकलून पाडलं. लाथा घातल्या. हे सगळं कॅमेर्‍यात रेकॉर्ड झालं.
इस्रायल मधल्या एका न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. कारण बिचार्‍याला फार मोठे मानसिक आजार आहेत. इस्रायल सरकारनेच तसं सर्टिफिकेट दिलंय.

लहान मुलांना ठार मारायचं , कैद्यांना टॉर्चर करायचं, बुलडोझर चालवायचे, रस्त्याने चालणार्‍यांना टिपून गोळ्या घालायच्या , त्यांच्या वाहनांवर मिसाइल्स डागायची अशी कामे देशाच्या संरक्षणासाठी करणार्‍या इस्रायली सैनिकांना सुद्धा फार मानसिक ताण येतो. आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते भारतात येतात. अगदी हजारोंनी.

तसंच या वरच्या सेटलरला भारतात एखाद्या इस्रायलप्रेमी कुटुंबात ठेवून माताभगिनींनी त्याची शुशृशा केली पाहिजे . खामोशीतल्या वहिदासारखी.

गाझामध्ये जे केलं तेच इस्रायल वेस्ट बँकमध्ये करत आहे. तिथे तर हमास नाही.
त्या विरोधात काही देशांनी लाजेकाजेस्तव वेस्ट बँकमध्ये निर्माण झालेली उत्पादने आयात करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
ब्रिटन हे एक नाव. त्याविरोधात इस्रायलने जेरुस लेम मधील ब्रिटिश वकीलात बंद करायचा निर्णय घेतला आहे.
हे देश अजूनही गाझातल्या नरसंहाराबद्दल काही कृती करत नाहीएत.

गाझा वंशसंहारावर आधारित नाझा ही डॉक्युमेंटरी चर्चेत आहे. दोघा इस्रायली आणि अर्थात ज्यू युवकांनी बनवली आहे.
https://www.youtube.com/watch?v=GY79iZahszU

व्हेनिस फेस्टमध्ये या डॉक्युमेंटरीला २५ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.

अर्थात इस्रायल सरकार यामुळे आणखीनच चेकाळलं आहे. या दोघांचं नागरिकत्व काढून घ्यायची धमकी त्यांनी दिली आहे.

त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाची फेसबुक पोस्ट

https://www.facebook.com/20531316728/posts/10154009990506729/

इस्रायलमधले तरुण आपल्या सरकारच्या विरोधात जाऊन फिल्म्स बनवतात. आपल्याकडचे?

वेस्ट बँकमधे हमास नाही? कुणी सांगितले? माझ्या माहितीनुसार तिथेही ही संघटना कार्यरत आहे.
ऑगस्ट २०२६ मधे कैस बितावी नामक हमास अतिरेकी इस्रायलने वेस्ट बँक भागात मारला.

https://www.haaretz.com/israel-news/israel-security/2026-10-08/ty-articl...

Prime Minister Benjamin Netanyahu's 55-page account of the failures that led to the October 7 attacks "does not reflect what really happened," his former military secretary said in an interview partially published Thursday, warning that official transcripts may have been altered.

"It's part of the truth, but not all of it," Maj. Gen. (res.) Avi Gil – who was serving as Netanyahu's military secretary on October 7, 2023 – said in an interview with Israel Hayom.

https://www.timesofisrael.com/netanyahus-former-military-secretary-alleg...
७ ऑक्टोबर च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अधिकृत रेकॉर्ड्स मध्ये बदल केले गेले असा त्यावेळच्या लष्करी सचिवाने म्हटलं आहे