डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

A Trump insider opened a $51,000,000 oil short position — hours before Trump announced a ceasefire with Iran. This guy is now 16 for 16. $170 million in profit. A perfect streak.
This is not a talented trader.
"We placed the bet." "The ceasefire dropped." "We cashed out." Sixteen times in a row.
That is not skill. That is not instinct. That is not research.
That is someone who knows what is coming before it comes.
Think about what that actually means. A private individual is placing a $51 million bet that oil prices are about to collapse — hours before a sitting president announces a ceasefire that collapses oil prices. Not once. Sixteen times. Zero losses.
There are only two explanations and both should terrify you.
Either someone inside the White House — or with direct access to it — is leaking ceasefire negotiations to traders before diplomats, before the press, before the American people hear a single word. That is insider trading. That is corruption. That is a federal crime.
Or the timing of the announcement itself is being shaped around the trade. Which is worse.
This is not a genius investor who reads the news faster than you do. The news hadn't happened yet. He wasn't reading the news. He was getting a phone call.
While Americans were watching the ceasefire announcement and feeling relieved — somebody already knew. Somebody had already bet $51 million on it. And somebody was already counting their winnings.
You are not watching a free market. You are watching a White House with a side hustle. Via~ Really American

क्रिस्टी नोमने करदात्यांचे ७० मिलियन डॉलर उडवून बोईंग चे अती लक्झरी विमान घेतले. कशासाठी म्हणे तर हाय एंड डिपोर्टेशन साठी. (मागा लोकं कशावरही विश्वास ठेवतात). हे विमान जेड्याच्या एअर फोर्स टू पेक्षाही हाय एंड आहे. आता असला कुठला हाय एंड इमिग्रंट जगी आहे की ज्यासाठी कॉकटेल बार असलेले विमान गरजेचे आहे, हे नोम बाईंना माहीत. बर आता नोम बाईंची हकालपट्टी झाली, तर विमान कोण वापरणार तर मेलानिया ट्रम्प !

शी इज गेटिंग हरसेल्फ डिपोर्टेड?!
Lol बाकी हे पैसे उडवायला कॉंग्रेसला विचारावं लागत नाही का? काही अप्रोप्रोएशन वगैरे असतं का आता गुंडाळुनच टाकलंय!

चला, अजून दोनेक हजार प्रतिसाद म्हणजे एकतर अजून पाचेक वर्षं तात्या हलत नसतोय, दुसरं म्हणजे मनोरंजन की अजिबात कमी नही होंगी Proud

“ this is abhorrent and the american public does not support this…” असे कमला हॅरिस यान्नी end of civilization या बेताल वक्तव्या बद्दल म्हटले आहे. शेन्डेजी आता तरी व्यक्त व्हायला सोईस्कर व्हावे.

ह्या विषयावरचा पहिला धागा शेंडेंनी आणि त्याचा दुसरा भाग अमितवने काढावा हा काव्यात्मक न्याय आहे का निव्वळ योगायोग? Happy

हो ना! त्यातून पोप लिओ ब्ल्यू स्टेट मधला!
भक्त मंडळी बंकरमधे गेलीत की नो किंग रॅलीला की वाढत्या इन्फ्लेशनचा ठपका कुणावर द्यावा या विचारात?

आमच्या इथे रिडिस्ट्रिकिंग हाणून पाडले तर त्यामुळे एका माणसाची फारच चिडचिड झाली. मग काय डेमॉक्रसीची ऐशी की तैशी करायचे प्रयत्न सुरु
https://www.nbcnews.com/politics/2026-election/white-house-failed-push-c...

मलॅनियाने असे रँडम निवेदन देण्यामागे काय कारण होतं? माझा आणि एपस्टीनचा काही संबंध नाही, एपस्टीनने माझी आणि टाकोची भेट बीट घडवून दिली नाही. का सांगितलं असं? काही घडलं का? का युद्धविराम झाल्यावर परत एपस्टीनचा मुद्दा आणा असं सांगते आहे?

युद्ध अंगाशी आले ना तेव्हा आता पुन्हा लक्ष दुसरीकडे वळवणे. मॅक्सवेलला लिहीलेली इमेल आहेच. त्यातही मखलाशी अशी की पुन्हा पिडीतांनाच साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे रहा म्हणून बर्डन ढकण्याचा जुनाच खेळ खेळायचा. गुन्हेगार फिप्थ घेणार आणि पिडीतांना पुन्हा पुन्हा म्हणत रहाणार सिद्ध करा म्हणून.

बोलणी फिसकटली. जेडी हात हलवत परत निघाला.
दोन जहाजे स्ट्रेट पास झाली अशी खोटीच माहिती अमेरिकेने सांगितली अशी वदंता आहे.
इकडे ट्रंप आणि रेजिमला मलानिया काही बोलणारे, काय बोलणारे काही कल्पनाच न्हवती. आता १४ दिवस थांबताहेत का परत युद्धपिपासू टाको आणि अमेरिका युद्ध चालूच ठेवते आहे कोण जाणे.

https://x.com/realDonaldTrump/status/1853571107439399155
Donald J. Trump
@realDonaldTrump
We are building the biggest and broadest coalition in American Political History. This includes record-breaking numbers of Arab and Muslim Voters in Michigan who want PEACE. They know Kamala and her warmonger Cabinet will invade the Middle East, get millions of Muslims killed, and start World War III. VOTE TRUMP, AND BRING BACK PEACE!

इराण खूप बातम्यांत राहतो, सारखा अमेरिकेवर कुरघोडी करतो, आम्ही चार वेळा जिंकलो सांगितलं तरी हरत नाही या सगळ्याने विफल्लक झालेला टाको आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जी ऑलरेडी बंद आहे ती परत बंद करणार आहे.
आता एकही शिप आता शिरू किंवा बाहेर पडू शकणार नाही. इराणला टेरीफ हा ब्युटीफूल वर्ड दिलेले तर नाहीच नाही. इराणचे सिव्हिलायझेशन नेस्तनाबूत नाही करायला जमलं म्हणून काय झालं अमेरिकेचे तर करूच शकतो ना! किमान रिपब्लिकन पार्टीचे भवितव्य तरी बेचिराख करणार अशी गर्जना केलेली आहे.
रविवार! ऑईल फ्युचर लाँग डे!

https://www.cnbc.com/2026/04/06/wall-street-firm-sends-analyst-to-the-st...
Citrini asserts that the actual shipping volume is higher than reported data as many ships turn off their transponders and are not visible on official tracking systems.
Based on the Substack post, the analyst’s interviews with fishermen, smugglers and regional officials point to a system in which Iran is selectively allowing ships to pass. Tankers are required to secure approval before transiting waters near Iranian territory, creating what the firm described as a “functional checkpoint” rather than a blockade, Citrini said in its post.

<<आता एकही शिप आता शिरू किंवा बाहेर पडू शकणार नाही.>>
इराणने सांगितले आहे की इराणची आणि त्यांच्या मित्र देशांची (चीनची)जहाजे जाऊ शकतील. पण अमेरिका म्हणते, आम्ही त्या जहाजांवर हल्ला करू.
" अभि मजा आयेगा ना भिडू!! "
चीनला जाणारे जहाज अडवले किंवा त्यावर हल्ला केला तर WWIII !

व्हिक्टर ओरबान हरला. सुपर मेजोरिटीने विरोधी उमेदवार निवडून आला.

हंगेरीत सत्ता बदल झाला तर मला का आनंद व्हावा? तर ट्रम्पने एंडोर्स केलेला, जेडी तर प्रत्यक्ष जाऊन प्रचार करून आलेला परवा... तर असा फार राइट ओरबान हरला. ऑरबान जिंकला तर अमेरिकेचे माइट (!!! Biggrin असं काहीही नाही हे अमेरिकन सोडून सर्वांना समजून चुकले आहे. मूठ झाकलेली होती तोवर ठीक होतं. आता गुडघ्यावर आलेला अमेरिका हाच मोठा जोक झालाय. तर ते असो... ) हंगेरीला देऊ, पाण्यासारखा पैसा हंगेरीत ओतू असल्या वल्गना आणि थापेबाजीला अमेरिकन भुलतात एकदा नाही दोनदा भुलतात, पण जग हिंग लावून विचारात नाही. हंगेरीच्या लोकांनीही त्यांना हवा तो निर्णय घेतला. अभिनंदन!

व्हिक्टर ओरबान हरला. सुपर मेजोरिटीने विरोधी उमेदवार निवडून आला
>>>

मला खूप आनंद झाला. विक्टर ओर्बानचे सुरुवातीचे दिवसात तीन वर्षे मी हंगेरीत राहिलो होतो व तिथे कश्या सर्व सिस्टम्स फिदेस ने घश्यात घातल्या ते मी थोडेफार पाहिले होते. माझे तिथले अनेक मित्र गेली अनेक वर्षे ओर्बान कधी हारेल याची वाट बघत होते व बहुतेक हे आपल्या आयुष्यात होणार नाही या मुळे निराश होत होते.

ओर्बानचा पराभव पाहून भारतात पण मोदींचा/भाजपाचा पराभव होईल याला बळकटी मिळेल. ओर्बान प्लेबूक मोदी, एर्डोआन हे जास्त वापरतात त्रम्प्यापेक्षा.

कठीण काम झालय ट्रंप चे...स्वतःच्या कुठल्याही विधानावर ठाम नाही निर्णय ऊलटसुलट फिरवणे हे तर अगदी किरकोळ आहे. अर्धे जग स्वतःचे नागरिक रोज त्याच्या नावाने बोटे मोडतात हे तर गावी ही नसेल.
हंगेरी चे राजकारण आजवर कधीच फाॅलो केले नव्हते..आता जरा वाचून बघते.

इंटरनेटने व्हान्सला अगदीच जोक करून टाकलाय. व्हान्स टच!
जर्मनीला फार राइट पार्टीच्या प्रचाराला गेला. ते हरले. २५० अ‍ॅनिव्हरसरीला पोपला बोलवायला गेला, पोप काही येत नाहीये. हंगेरीला प्रचाराला गेला. ते हरले. इस्लामाबादला करार करायला गेला ते पारच फिसकटलं. ज्याला ज्याचा हात लावतो त्याची पार माती करतो करून इंटरनेट वर फार टर उडवताहेत. Wink Proud हा कसा निवडणुकीला उभा राहणार कोण जाणे!

अमेरिकेने इराणच्या पोर्ट मधून निघणाऱ्या आणि इराणला टोल देणारी जहांज रोकण्याचा निर्णय घेतला आहे.
हे प्रकरण गंभीर आहे. ह्यावर चीनची प्रतिक्रिया अजून तरी आली नाही. हे झालं तर, चीन ला तेल विकणाऱ्या वेनेझुअला नंतर अजून एका देशाच्या तेल विक्रीवर अमेरिकेचे नियंत्रण होईल.
ह्याचा बदला म्हणून इराण होरमुझ पूर्णपणे बंद करायचा प्रयत्न करेल.

इराणी डेलिगेशन इराणला विमानाने जात नाही आहेत. डिप्लोमॅटिक विमानाला ही अमेरिका टारगेट करेल ही शक्यता असल्याने ते पर्यायी मार्गाने इराणला परत जाणार आहेत. अमेरिका परतीचे दोर आपणच कापून टाकत आहे त्याअर्थी अमेरिकेला युद्धच हवे आहे. ते त्याच्या नागरिकांना सेल करण्यासाठी हे सगळं नाटक होतं. सेल झालंय का नाही कळेलच. पण उद्यापासून परत गोंधळाला सुरुवात होईल अशीच शक्यता आहे.

अमेरिका युद्धखोर देश आहे अशी.>>> त्यामानाणे ही फारच mild प्रतिक्रिया म्हणवी लागेल. अर्थात ट्रम्पणे घोषणा केली म्हणून अमेरिका लगेच चीन कडे जाणारी जाहजे थांबवेल असं नाही. त्यात ट्रम्पच्या चीन भेटी अगोदर दोन्ही देश संघर्ष टाळायलाच बघतील.

जहाजे बिहाजे ठीक आहे, ती होत रहातील पास. आपण ऑईल एक आठवडा शॉर्ट करायचे की दुसरा आठवडा लाँग. आपल्याला आणि आपल्या मित्रांना पैसे मिळाल्याशी कारण.
आता पोपला शिव्या घातल्या आहेत. Lol पोपला म्हणे त्याचा भाऊ टाको पेक्षा जास्त आवडतो. अरे! हे काय कारण आहे का शिव्या घालायला! पण आहे! इतर कोणी पोपला शिव्या घातल्या असत्या तर रिप नी घर डोक्यावर घेतलं असतं. अर्थात आपल्याला ना पोप आणि ती इनस्ट्रिट्युशन आवडते ना टाको. आपण मजा बघावी झालं.

गंमतच आहे. इराणने होर्मूझ सामुद्रधुनी बंद केली तेव्हा अमेरिकेने तिथे आमची नेव्ही पाठवून ती खुली करू असं सांगितलं. पण मग अमेरिकन नेव्हीने आम्ही नाही जा असं म्हटलं. मग तात्यांनी दुसर्‍या , विशेषतः नाटो देशांना गळ घातली की तुम्ही शिप्स एक्सॉर्ट करा. त्यांनी नाही म्हटल्यावर आम्हांला तुमची गरज नाही असं म्हटलं.
मग इराणने अमेरिकेच्या गळ्यात गळा न घालणार्‍या देशांना टोल घेऊन सामुद्रधुनीतून जाऊ द्यायला सुरुवात केली. हा टोल डॉलर मध्ये नव्हे तर युआन आणि क्रिप्टो करन्सीत होता. म्हणजे पुन्हा अमेरिकेला फटका.

युनोच्या सुरक्षा परिषदेत , इराणने सामुद्रधुनी बंद करण्याविरोधात ठराव मांडला गेला, तो चीन आणि रशियाने व्हिटो वापरून परतवला.

आता अमेरिका म्हणतेय आम्ही तिथे नाकाबंदी करू.

सामुद्रधुनी आखातात. टोल घेणार इराण. काही देश द्यायला तयार आहेत. यात अमेरिका कुठे आली? पण जिथे तिथे नाक खुपसायची सवय नाक कापलं तरी जायची नाही.
आता या देशांनी अमेरिकेविरोधात फळी उभारावी आणि युनोत ठराव करावा Happy
क्युबाच्या नाकेबंदीचं पुढे काय झालं आणि त्याचं नेमकं कारण ठरलं का?

इराणने अमेरिकेची लढाऊ विमानं पाडलीत. आता युद्ध नौका बुडवून घ्यायची हौस असावी.

तिकडे अमेरिकन लष्कर याबाबत तातोबांच्या पाठी आहे, असंही दिसत नाही.

Pages