दूरदर्शन वाहिनीचा पक्षप्रचारासाठी वापर

Submitted by रेव्यु on 19 April, 2026 - 02:45

काल माननीय प्रधान सेवकांनी डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्याबद्दल विरोधी पक्षांना, विशेषत: कॉंग्रेसला खूप शिव्या घालून आग पाखडली.
मी ते बिल योग्य की अयोग्य या बद्दल चर्चा करू इच्छित नाही.
दूरदर्शन वाहिनी या कारणासाठी आहे का? व स्वत: प्रधान सेवक याचा दुरुपयोग करतात व स्वत:ला प्रधान हुकुमशहा सिध्द करतात. हे कितपत बरोबर आहे?
ती एक स्वायत्त संस्था आहे..... हे काय चाललंय??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो सरकारी खर्चाने पक्षाचा प्रचार करत असतात, त्यात हा प्रकार म्हणजे दर्यामे खसखस. तसेही भजप हा कमरेचे डोक्याला बान्धुन फिरणारा पक्ष आहे , त्यामुळे त्याच्या सर्वोच्च नेत्याकडुन काय अपेक्षा ठेवावी ?

बाकी हे टिव्ही वर येऊन मोदींनी आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतलाय. प्रचंड ट्रोल होत आहेत.

आजपासुन सगळ्ञा राज्यात एनडीए ची रुदाली सुरु होणार आहेच

चूक आहे. त्यातही देशाला संबोधन करणार म्हणजे एक पंतप्रधान सगळ्या जनतेला संबोधन करणार आणि आपापला राजकीय कल कुठलाही असला तरी लोक बघतात, ऐकतात किंवा तशी अपेक्षा असते.
त्या आडून आपला पक्षप्रचार आणि विरोधी पक्षांचे नाव घेत त्यांच्यावर आगपाखड हा पूर्णतः गैरवापर आहे.

लक्षात घ्या... आचार संहिता लागू आहे आणि हा सरळसोट कायदा धाब्यावर बसवतो..... याने पायंडा घालून दिला पाहिजे... दुर्दैव आहे देशाचे

या पूर्वीचे राष्ट्र के नाम संदेश (नोटबंदी, लॉक डाऊन) म्हणजे खरे धक्के होते सर्व सामान्य जनतेकरता, या वेळी पण तशीच अपेक्षा असावी. पण इजा बिजा तिजा या न्यायाने तिसरा बार फुसका निघाला आणि स्वतःवर चिखल उडवला असे दिसत असले तरी, ४ मे ला निवडणुक निकाल आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. बाकी दूरदर्शनचा वापर निवडणुक काळात करणे या बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही कारण यांनी प्रत्येक स्वायत्त संस्थेचा स्वतःच्या आणि मित्रांच्या फायद्याकरता गैरवापरच केला आहे.

माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहिता हि ज्या राज्यात निवडणूक आहे तेथेच लागू असते इतर राज्यात नाही.

माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहिता हि ज्या राज्यात निवडणूक आहे तेथेच लागू असते इतर राज्यात नाही. > म्हण़जे तामिळनाडु आणि बण्गाल मधे प्रसारण बंद केले होते असेल का?

आचारसंहिता बाजूला ठेवू. ते भाषण पंतप्रधान म्हणून होतं की भाजप नेता म्हणून? राष्ट्राला संबोधन करण्यासारखी काय जगबुडी आली होती? आणि नेमकं ज्या राज्यांत मत दान व्हायचं आहे, त्यांचीच नावं वारंवार का घेतली?

इंदिरा गांधींनी निवडणूक प्रचारासाठी सरकारी कर्मचारी, सरकारी सुरक्षा दल आणि अजून काही सरकारी यंत्रणा वापरल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सध्या कोणीही निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी सरकारी यंत्रणा वापरत नाहीत. पराभव न पचल्याने भोकाड पसरण्यासाठी सरकारी यंत्रणा कधीही , कशीही आणि कितीही वेळा वापरता येते.

डॉ खरे ,एक शंका आहे ! ममता बॅनर्जी दूरदर्शन वर येऊन राष्ट्राला संबोधन करू शकतात का ?की त्यांचं संबोधन निवडणूक प्रचार म्हणून गणलं जाईल आणि निवडणुक आचारसंहितेच्या नियंत्रणाखाली येईल ?