फुलराणी
तूच ग सखे माझी फूलराणी,
तुझ्याचसाठी माझी सर्व गाणी।
तूच माझी बाग, मीच तुझा माळी,
तुझ्याविण सखे, सुनी झाडाची डहाळी।।
बागेस जेव्हा तुझी चाहूल लागली,
माझ्या सोनचाफ्याची कळी खुलली।
मोगऱ्याची वेल सरसर चढली,
मोगऱ्याची फुले बहरली।।
बागेस कळले पानोपानी,
जडली प्रीत दोघांच्या मनी।
तुझ्या नजरेची पडता सावली,
फुलाफुलांत प्रीत आपली विसावली।।
गंध दरवळला बागेत चोहीकडे,
फुलपाखरे भिरभिरती तिकडे।
चांदण्यांनी जणू रात्र सजविली,
प्रीतीची वाट फुलांनी भरली॥