गद्यलेखन

एल् एल् एम्

Submitted by केशवकूल on 28 June, 2026 - 08:44

मी आणि प्रकाश त्याला आम्ही पक्या म्हणतो जीवा भावाचे मैतर. माणसाचे सावलीशी जे नाते तेच आमचे पण, कधी तो सावली तर कधी मी सावली.
पक्या म्हणजे आडमाप माणूस, आम्ही दोघेही कसेबसे. कसेबसे जगणारे, आमचे सगळे कसेबसे. कशीबशी परिक्षा पास करणारे. कशीबशी पदवी मिळवली. नोकरी धरसोड करत अखेर एका ठिकाणी बुड स्थिरावले.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २५

Submitted by नितनवे on 21 June, 2026 - 02:16

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २४
पूर्वभाग
आरव देशमुख, माया सेन, कबीर आणि समीर नायर दुष्यंतच्या “हिडन आर्किटेक्चर”ला पूर्णपणे सक्रिय करतात आणि Black Ember विरुद्धचे पुरावे जगभरातील नियामक, विमा आणि तपास यंत्रणांकडे योग्य वेळी पोहोचवतात.
या पुराव्यांमुळे सिंगापूर, लंडन आणि झुरिचमधील विमा व आर्थिक संस्थांनी स्वतंत्र चौकशा सुरू केल्या. Black Ember च्या व्यवहारांना मिळणारं संरक्षण तुटू लागलं आणि त्यांची जागतिक आर्थिक साखळी डळमळू लागली.

शब्दखुणा: 

झाकोळ

Submitted by मोहना on 19 June, 2026 - 08:12

"उठून जायचं नाही. बस इथे." रत्नाकर इतक्या जोरात ओरडले की चिडून उठलेला दत्ता घाबरून परत बसला. मुक्ता तर बाबांच्या आवाजाने रडकुंडीलाच आली. दोघांच्या चेहर्‍याकडे पाहताना रत्नाकरना आपण खूप मोठी चूक करतोय असं वाटलं. अजूनही निर्णय बदलावा असं वाटून गेलं. मुलांसमोर अखेर त्यांनी विषय काढला होता पण परिणाम काय होतील याचा अंदाज नव्हता. दत्ता ताडकन उठून निघून चाललेला पाहून ते चिडले.
"मी हे सुखासुखी ठरवलेलं नाही. तुमच्यासाठीच पुन्हा लग्न करतोय. मला एकट्याला नाही झेपणार तुम्ही दोघं. मुक्ता मोठी होतेय." कठोर स्वरात रत्नाकर म्हणाले.

शब्दखुणा: 

चिरुमाला ( भाग १८)

Submitted by मिरिंडा on 11 June, 2026 - 12:58

थोड्याशा काळजीतच माझा प्रवास चालला होता. हा फोन कोणी केला, मला समजेना. मला पैंचा संशय होता. कारण ते ऑफिसमध्ये माझ्या जास्त जवळ होते.कोणीतरी रिसिव्हरवर हात ठेवून किंवा रुमाल लावून बोलत असणार. मी पुन्हा पुन्हा फोनवरचं बोलणं आठवत होतो. आवाज थोडा दबलेला आणि लांबून आल्यासारखा वाटत होता.

प्रांत/गाव: 

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २४

Submitted by नितनवे on 9 June, 2026 - 13:25

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २३
पूर्वभाग
आरव देशमुख आणि त्याची टीम एलेनाने पाठवलेल्या गुप्त डेटाचा अभ्यास करताना Black Ember च्या खऱ्या ताकदीचा शोध लावते. त्यांना समजतं की ही संघटना संकट निर्माण करत नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या भीतीचा आणि अनिश्चिततेचा अचूक वेळी आर्थिक फायदा करून घेते.

शब्दखुणा: 

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २३

Submitted by नितनवे on 8 June, 2026 - 13:48

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २२
पूर्वभाग
एलेना व्होल्कोव्हा यांना अखेर जाणवतं की Black Ember चं ऑपरेशन नियंत्रणाबाहेर गेलं आहे. झुरिच आणि लंडनमधील आर्थिक गट स्वतःच्या नफ्यासाठी संकट अधिक वाढवत आहेत, तर मूळ “containment phase” पूर्णपणे हुकली आहे.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २२

Submitted by नितनवे on 4 June, 2026 - 13:37

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २१
पूर्वभाग
आरव देशमुख, कबीर, माया सेन आणि समीर नायर पाण्याने भरत चाललेल्या भूमिगत बायपास कॉरिडॉरमधून जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना Black Ember त्यांचे सर्व बाहेरचे मार्ग एकामागून एक बंद करत असल्याचं स्पष्ट होतं.
दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी चिन्हांकित केलेला गुप्त “ब्लाइंड रूट” हा त्यांचा एकमेव आशेचा किरण ठरतो, तर शत्रूचे कमांडोज त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचतात.

शब्दखुणा: 

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २१

Submitted by नितनवे on 2 June, 2026 - 13:45

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २०
पूर्वभाग
आरव देशमुख, माया सेन, कबीर आणि समीर नायर यांना कळतं की Black Ember संपूर्ण भूमिगत टनेल प्रणाली पाण्याने भरून त्यांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न करत आहे.
समीरला जुन्या ब्रिटिशकालीन इमर्जन्सी बायपासची चिन्हं सापडतात, तर आरवला दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी गुप्तपणे मार्क केलेला असा “ब्लाइंड रूट” सापडतो, जो आधुनिक surveillance systems च्याही नजरेआड राहिलेला असतो.

शब्दखुणा: 

शंभर पावलं...

Submitted by स्वप्नील on 2 June, 2026 - 11:07

“‘अगं, झाला का डबा? माझी ९:४५ची पंचवटी आज नक्कीच सुटेल.” वडिलांचा आवाज कानावर पडताच नीलची झोप मोडली. “हो, आलेच...एक मिनिट” आई किचनमधूनच म्हणाली. सकाळच्या धावपळीत तिची होणारी तारांबळ झोपेतून उठलेल्या जड डोळ्यांनी नील बघत होता. अंजली ज्वेलर्सच्या पिशवीत भाजीचा डबा आणि महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत चपात्या बांधून आई डब्याची पिशवी घेऊन आली. वडिलांनी ती त्यांच्या ऑफिसच्या बॅगेत ठेवली आणि निघू लागले. ते घरातून निघणार तेवढ्यात आई म्हणाली “अहो, ती फाईल घेतली ना?” वडील “हो...चल येतो मग” म्हणाले आणि धावपळ करत निघाले. वडील जाताच नील झोपेतून उठून बसला. त्याने आईला विचारले "कसली फाईल गं?".

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २०

Submitted by नितनवे on 1 June, 2026 - 13:29

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १९
पूर्वभाग
डॅनियल क्रॉस स्वतःला आमिष बनवत Black Ember च्या टीम्सना वेगवेगळ्या खोट्या सिग्नल्सच्या मागे धावायला भाग पाडतो, ज्यामुळे त्यांच्या synchronization मध्ये पहिल्यांदाच गंभीर तडे पडू लागतात.
दरम्यान आरव देशमुख, माया सेन, कबीर आणि बाकीची टीम भूमिगत freight maintenance tunnels मधून पळ काढताना दुष्यंत देशमुखने मागे ठेवलेले गुप्त रेल्वे मार्ग आणि “FA-17” सारखे छुपे कोड शोधून काढतात.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन