ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २२
पूर्वभाग
एलेना व्होल्कोव्हा यांना अखेर जाणवतं की Black Ember चं ऑपरेशन नियंत्रणाबाहेर गेलं आहे. झुरिच आणि लंडनमधील आर्थिक गट स्वतःच्या नफ्यासाठी संकट अधिक वाढवत आहेत, तर मूळ “containment phase” पूर्णपणे हुकली आहे.
निर्णायक क्षणी एलेना “Mumbai Cascade Pressure” वाढवण्यास नकार देते आणि उलट Black Ember च्या गुप्त टाइमिंग विंडोज, विमा साखळ्या आणि नियंत्रण यंत्रणेचा संवेदनशील डेटा A.D. Recovery Relay कडे पाठवते, ज्यामुळे ती प्रत्यक्षपणे सिस्टीमविरुद्ध उभी राहते.
दरम्यान डॅनियल क्रॉस पाण्याने भरत चाललेल्या जेएनपीटी रिले चेंबरमध्ये अडकलेला असतानाही Phantom Signals वापरून शत्रूला दिशाभूल करत राहतो. अखेर Black Ember ला ते सिग्नल खोटे असल्याचं समजतं, पण तोपर्यंत त्याने टीमसाठी अमूल्य वेळ मिळवलेली असते.
आरव देशमुख, कबीर, माया सेन आणि समीर नायर भूमिगत सापळ्यातून बाहेर पडून फ्रेट यार्डमध्ये पोहोचतात. एलेनाने पाठवलेल्या डेटामुळे त्यांना पहिल्यांदाच Black Ember च्या जागतिक समन्वयात गंभीर तडे पडल्याचं स्पष्ट दिसतं.
शेवटी एक धक्कादायक सत्य समोर येतं: शत्रू आता आर्काइव्ह शोधत नाही, तर आर्काइव्ह नेणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे. आणि कुठेतरी अंधाऱ्या, पाण्याने भरत चाललेल्या रिले चेंबरमध्ये डॅनियल अजूनही त्यांच्या सुटकेसाठी शेवटचा लढा देत उभा आहे.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २३ - Last Relay
बाहेर पाऊस अजूनही थांबला नव्हता. एका जुन्या मेंटेनन्स शेडमध्ये आरव, माया, कबीर, समीर आणि विनायकराव यांनी तात्पुरता आश्रय घेतला होता आणि ते तिथे लपून बसले होते.
बाहेर फ्रेट यार्डमधले पिवळे दिवे पावसाच्या पडद्याआड अत्यंत धूसर दिसत होते. आतल्या अंधारात मात्र मायाच्या टॅब्लेटचा निळसर प्रकाश सतत चमकत राहिला होता. एलेनाकडून आलेले डेटा पॅकेट्स आता जवळजवळ पूर्णपणे डिक्रिप्ट झाले होते.
टॅब्लेटच्या स्क्रीनवर INSURER TIMING WINDOWS , CASCADE SEQUENCE MAP, SUPERVISORY AUTHORIZATION LAYER असे काही तांत्रिक शब्द एकामागून एक उमटले होते.
आरव आणि माया गेल्या दोन तासांपासून तो संपूर्ण डेटा Cross-correlate करत होते. एका स्क्रीनवर Insurer timing windows दिसत होते. दुसऱ्या स्क्रीनवर Maritime advisories चालू होते. तिसऱ्या स्क्रीनवर Hedge synchronization approvals उघडले होते.
हळूहळू वेगवेगळ्या सिस्टीम्समधले विखुरलेले ठिपके एकमेकांशी जोडले जाऊ लागले होते.
अचानक आरव थांबला. त्याची नजर स्क्रीनवरच्या एका विशिष्ट अप्रूव्हल चेनवर स्थिरावली. आरव गंभीर आवाजात म्हणाला, “हे बघा."
त्याचा आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे जण त्याच्याकडे वळले. स्क्रीनवर जगभरातले फायनान्शियल रिव्ह्यू नोड्स वेगाने एकमेकांशी जोडले जात होते.
नकाशावर एकामागून एक सिंगापूर, लंडन, झुरिच, दुबई, मुंबई या शहरांची नावे ठळक झाली होती.
पहिल्या नजरेला हे सगळे एकमेकांशी संबंधित नसलेले वाटत होते, पण त्यांच्या शेजारी असलेले टाईमस्टॅम्प्स काही वेगळीच कहाणी सांगत होते.
विनायकराव पुढे आले. काही क्षण ते त्या स्क्रीनकडे रोखून पाहत राहिले. मग अत्यंत गंभीर आवाजात ते म्हणाले, “हे फायनान्शियल इन्फ्लुएन्स नेटवर्क आहे.”
मायाने लगेचच स्क्रीनवरचा दुसरा लेयर उघडला. आता समोर GLOBAL STABILIZATION REVIEWS, MARITIME EMERGENCY ADVISORIES, CROSS-BORDER RISK PANELS अशा आणखी काही धक्कादायक सिस्टीम्स उघडल्या होत्या.
आरव स्क्रीनकडे एकटक पाहतच राहिला आणि स्वतःशीच पुटपुटल्यासारखा म्हणाला, “भीती आधीपासूनच अस्तित्वात असते. सप्लाय चेन्स मध्ये, मार्केट्स मध्ये आणि तिथल्या गव्हर्नमेंट्स मध्ये."
"डायरेक्टर कोणतीही टंचाई किंवा भीती तयार करत नाहीये. तो फक्त... अगदी योग्य क्षणी, त्या भीतीची किंमत वाढवतो.”
विनायकराव म्हणाले, “फिअर मॉनिटायझेशन... भीतीचा व्यापार!"
त्याच क्षणी, मायाच्या टॅब्लेटवर एक नवीन अनपेक्षित त्रुटी लाल रंगात चमकू लागली. स्क्रीनवर ठळक अक्षरात उमटले UNMAPPED AUTHORIZATION PATH.
आरवचे बारीक लक्ष होते, त्याने ते सर्वात आधी नोटीस केले. आरव हळू आवाजात, आश्चर्याने म्हणाला, "हे बाकीच्या अप्रूव्हल चेन्स सारखं दिसत नाहीये."
मायाने वेळ न घालवता लगेचच तो विशिष्ट पाथ उघडला. स्क्रीनवर RESTRICTED ACCESS, ARCHIVAL EXCEPTION, GUARDIAN OVERRIDE असे एकापाठोपाठ एक एन्क्रिप्टेड फोल्डर्स दिसू लागले, ज्यांवर सुरक्षेचे कडक चेतावणी वजा टॅग्ज होते.
मायाने तिच्या कीबोर्डवर बोटे चालवत सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण स्क्रीनवर लाल अक्षरात फ्लॅश झाले Access denied.
तीने लगेच दुसरा मार्ग शोधला आणि पुन्हा प्रयत्न केला, पण तिथेही पदरी निराशाच आली - Denial.
ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिसऱ्या प्रयत्नात तिने एका वेगळ्या लूपमधून सिस्टीम क्रॅक केली आणि काही अंशी डेटाचा मेटाडेटा उघडण्यात तिला यश आले. त्या पूर्ण फाईल्स नव्हत्या, तर फाईल्सचे काही तुकडे होते. त्यात फक्त Approval timestamps, Archived references, Authorization hashes आणि... एकच कोड जो वारंवार रिपिट होत होता EV-17.
कबीर काही क्षण स्तब्ध होऊन त्या स्क्रीनकडे पाहत राहिला. तो कोड पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. नेहमी प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणारा कबीर यावेळी कोणताही निष्कर्ष काढत नव्हता, किंवा तर्क लावत नव्हता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याने अत्यंत शांतपणे, पण गंभीर आवाजात म्हटले, “"हे... हे कोड्स इथे असायलाच नको होते."
त्याच्या आवाजातील तो थरकाप समीरने ओळखला. तो पुढे सरसावला, "पण नक्की काय आहे ते?"
कबीरने काहीही न बोलता फक्त नकारार्थी हलकी मान हलवली. त्याची नजर अजूनही त्या 'EV-17' वरच खिळलेली होती.
कबीर, "मला माहीत नाही..."
काही सेकंद थांबून, समोरच्या कोडकडे पाहत तो पुढे म्हणाला, "पण हा कोणताही नॉर्मल ऑपरेशनल लेअर नाही. हे त्याहूनही खूप वेगळं आहे."
मायाने सिस्टीमच्या आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. तिची बोटे टॅब्लेटवर वेगाने धावत होती, पण ती काही पुढचा कप्पा उघडणार इतक्यात... संपूर्ण आर्काइव्ह सिस्टीमने स्वतःला अचानक पुन्हा लॉक करून घेतले. सर्व दरवाजे एका क्षणात बंद झाले होते.
फक्त एकच शेवटचा तुकडा स्क्रीनवर काही सेकंदांसाठी उघडा राहिला होता, ज्यावर लिहून आले होते;
ARCHIVAL GUARDIAN STATUS
DATA CORRUPTED
OWNER UNKNOWN
आणि पुढच्याच क्षणी, टॅब्लेटची स्क्रीन एका झटक्यात पूर्णपणे काळी पडली. संपूर्ण डेटा गायब झाला होता.
मायाने एक मोठा निःश्वास सोडला, आपले हात कीबोर्डवरून मागे घेतले आणि थकलेल्या स्वरात म्हणाली, "बस... आता यापुढे अॅक्सेस मिळत नाहीये."
आरव काही क्षणांसाठी त्या काळ्या पडलेल्या स्क्रीनवर आणि शेवटी दिसलेल्या त्या तुकड्याकडे एकटक पाहत राहिला. त्याला ती अखेरची एरर अत्यंत विचित्र आणि संशयास्पद वाटत होती. पण सध्या त्या कोडचा विचार करण्यापेक्षा त्यांच्यासमोर त्याहूनही मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आ वासून उभा होता - 'डायरेक्टर'.
आरवने फार वेळ न गमावता पुन्हा एकदा टॅब्लेटवर सुपरवायझरी चेन्स उघडल्या. एकामागून एक सिस्टीम्स पुन्हा स्क्रीनवर जिवंत होऊ लागल्या.
आता हळूहळू ते सगळे लेयर्स एकमेकांशी अलाईन व्हायला, म्हणजेच एका रेषेत यायला सुरुवात झाली होती. आणि पहिल्यांदाच त्यांच्यासमोर एक धक्कादायक सत्य उघड होत होते... 'डायरेक्टर' हा पडद्यामागून सगळी सूत्रे हलवणारा केवळ एखादा नेहमीसारखा मास्टरमाईंड नव्हता, तर तो एका बलाढ्य इन्फ्युअन्स आर्किटेक्चरचा मुख्य केंद्रबिंदू होता.
मायाने वेळ न घालवता Correlation इंजिन पुन्हा एकदा रन केले. या वेळी टॅब्लेटने डेटाची जुळवाजुळव करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि स्क्रीनवर आलेला रिझल्ट आधीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.
स्क्रीनवर हिरव्या रंगात ठळक अक्षरे चमकली:
SUPERVISORY ALIGNMENT DETECTED
HIGH CONFIDENCE
************************************************************************************************************************
त्याच वेळी, जेएनपीटीच्या एका अंधाऱ्या आणि पाण्याने भरलेल्या रिले चेंबरमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. चेंबरमध्ये घुसलेले पाणी आता वेगाने वाढत थेट इलेक्ट्रिकल जंक्शनच्या वर पोहोचले होते.
अशा भीषण परिस्थितीतही डॅनियलचा टर्मिनल अजूनही कसातरी चालू होता. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे स्क्रीनवर शेवटचे डायग्नोस्टिक्स धोक्याच्या लाल रंगात ब्लिंक होत होते:
RELAY INTEGRITY FAILING
FLOOD LEVEL CRITICAL
त्याने काही क्षण त्या धोक्याची चेतावणी देणाऱ्या स्क्रीनकडे पाहिले. तिथून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असलेली एक्झिट लॅडर तिथून थोडी दूर होती. त्याने एकदा त्या शिडीकडे पाहिले, जिथून तो आपला जीव वाचवून बाहेर पडू शकत होता... आणि पुन्हा एकदा त्याने समोरच्या टर्मिनलकडे पाहिले.
त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती नव्हती, तर एक जिद्द होती. त्याने तिथून पळ काढण्याऐवजी आपले ओले हात कीबोर्डवर ठेवले आणि शेवटची रिले कमांड क्यू केली. सिस्टीम आणखी काही मिनिटे चालू ठेवण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालत होता.
कारण त्याला माहीत होते, की वर कुठेतरी... या सगळ्यापासून दूर, आरव अजूनही डेटा डिक्रिप्ट करण्याचे काम करत होता. आणि आरवला त्याचा हा लढा जिंकण्यासाठी अजून थोडा वेळ हवा होता. डॅनियल तो वेळ त्याला स्वतःचा जीव पणाला लावून मिळवून देत होता.
ते गोठवणारे थंड पाणी आता डॅनियलच्या गुडघ्यापेक्षाही वर आले होते. त्या अथांग अंधाऱ्या चेंबरमध्ये आता फक्त छतावरून पाण्याचे सतत गळणारे थेंब, दूरवरून येणारा समुद्राच्या लाटांचा गाज आणि समोरच्या टर्मिनलचा एक संथ, मंद आवाज... इतकंच काय ते उरलं होतं.
डॅनियलच्या समोर असलेल्या स्क्रीनवर धोक्याचे डायग्नोस्टिक्स अत्यंत वेगाने स्क्रोल होत होते.
RELAY INTEGRITY FAILING
FLOOD LEVEL CRITICAL
MULTIPLE SEARCH TEAMS ACTIVE
लाल रंगाच्या त्या चेतावण्यांमध्ये आता आणखी एका नवीन संकटाची भर पडली होती.
ब्लॅक एम्बरच्या शोधपथकांनी त्याला शोधण्यासाठी यार्ड पिंजून काढायला सुरुवात केली होती, हे आता स्पष्ट झाले होते. डॅनियलने एक दीर्घ, शांत श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा संयम होता. त्याने मुख्य स्क्रीनवरून मागे हटण्याऐवजी टर्मिनलचा एक अत्यंत जुना, छुपा दुसरा लेयर उघडला.
ते होते - ओल्ड फ्रेट डायग्नोस्टिक नेटवर्क.
जवळपास तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या फ्रेट मेंटेनन्स आर्किटेक्चरचे (Freight maintenance architecture) ते विसरले गेलेले अवशेष होते. त्या सिस्टीममध्ये अजूनही जुन्या रेल्वेचे सेन्सर्स, बऱ्याच काळापासून इनअॅक्टिव्ह असलेले कार्गो डायग्नोस्टिक्स, मेंटेनन्स व्हेरिफिकेशन नोड्स अशा काही गोष्टी अजूनही जिवंत होत्या.
आजच्या आधुनिक सिस्टीम्स या कचऱ्यासारख्या पडलेल्या जुन्या डेटाला फारसे महत्त्व देत नव्हत्या, त्याला सरळ बायपास करत होत्या. पण ब्लॅक एम्बरच्या प्रगत आणि अचूक सर्च अल्गोरिदम्सची हीच सर्वात मोठी कमजोरी होती; त्यांना या नेटवर्कमधून निघणारा प्रत्येक छोटा सिग्नल व्हेरिफाय करावाच लागणार होता. डॅनियल नेमका याच गोष्टीचा फायदा उठवणार होता.
डॅनियलने कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता कीबोर्डवर बोटे चालवून कमांड क्यू सुरू केली. आणि पुढच्या काही सेकंदांतच, संपूर्ण मुंबईभर कित्येक वर्षांपासून शांत पडलेले, सुप्त अवस्थेतील डायग्नोस्टिक नोड्स एकामागून एक जिवंत होऊ लागले. डिजिटल नकाशावर जणू विजा चमकू लागल्या होत्या.
एका रेल्वे यार्डमधून Delayed sensor response गेला. दुसऱ्या एका निर्जन कॉरिडोरमधून Maintenance beacon सुरू झाला. तिसऱ्या बंद पडलेल्या डॉकवरून Archived verification ping सिस्टीमवर आदळली.
वास्तवात तो कोणताही जुना आर्काइव्ह डेटा नव्हता, की शत्रूला चकवण्यासाठी तयार केलेले कोणतेही फँटम ट्रेल्स नव्हते. तो केवळ डॅनियलने जाणीवपूर्वक निर्माण केलेला एक डिजिटल कचरा म्हणजेच निव्वळ Noise होता. पण ब्लॅक एम्बरच्या स्वयंचलित अल्गोरिदमला तो कचरा की खरी माहिती, हे तपासण्यासाठी प्रत्येक सिग्नल व्हेरीफाय करावाच लागणार होता.
डॅनियलच्या स्क्रीनवर शत्रूच्या सिस्टीमचे इंटरसेप्ट्स वेगाने चमकू लागले,
VERIFY EAST NODE
VERIFY DOCK RESPONSE
VERIFY MAINTENANCE SIGNAL
आणि मग तो आकडा थांबला नाही. आणखी... आणखी... आणि आणखी! काही मिनिटांतच ब्लॅक एम्बरच्या रिस्पॉन्स क्यूज या फसव्या सिग्नल्सनी पूर्णपणे गच्च भरून गेल्या.
याचा परिणाम तातडीने दिसू लागला. डॅनियलला शोधण्यासाठी निघालेली सर्च टीम्स गोंधळात पडली आणि वेगवेगळ्या दिशांना भरकटू लागली. त्यांच्या सिस्टीममधील व्हेरीफिकेशन रिक्वेस्ट्स बॅकलॉग मध्ये जाऊ लागल्या आणि मुख्य प्रायोरिटी राउटिंग पूर्णपणे विस्कळीत झाले.
डॅनियल शांतपणे, गुडघाभर पाण्यात उभा राहून त्या स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते की, ब्लॅक एम्बरचा आता या अचानक येणाऱ्या सिग्नल्सवर अजिबात विश्वास उरलेला नव्हता. पण, या सिग्नल्सपैकी एखादा सिग्नल खरोखरच महत्त्वाचा असू शकतो, या भीतीने ते सिग्नल्स दुर्लक्षित करण्याची त्यांची हिंमतही होत नव्हती.
त्याच क्षणी, स्क्रीनवर एक नवीन आणि सर्वात महत्त्वाचा इंटरसेप्ट फ्लॅश झाला RESPONSE LATENCY EXCEEDING THRESHOLD
SEARCH PRIORITIZATION FAILURE
ते पाहताच, पहिल्यांदाच डॅनियलच्या थकलेल्या आणि ओल्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. त्याने आरवचा डेटा किंवा स्वतःचे अस्तित्व लपवले नव्हते; तर त्याने थेट शत्रूच्या सर्वात मोठ्या शस्त्रावर म्हणजेच त्यांच्या टायमिंगवर खोल प्रहार केला होता, त्याला जखमी केले होते.
कारण त्याला माहीत होते, ब्लॅक एम्बरची सर्वात मोठी ताकद आणि त्यांचा कणा हा अचूक टायमिंग हाच होता, आणि डॅनियलने त्याच टायमिंगची गती मंद करून त्यांना गुडघ्यावर आणले होते.
************************************************************************************************************************
Eastern Freight Service Yard
बाहेर पावसाचा जोर तसाच होता. शेडमधला ताण आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला होता. अचानक, मायाच्या टॅब्लेटच्या काळ्या पडलेल्या स्क्रीनवर एक नवीन, अनपेक्षित सिग्नल निळ्या रंगात चमकला.
स्क्रीनवर ओळ उमटली LEGACY RELAY REQUEST.
तो कोड पाहताच बाजूला उभा असलेला कबीरच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे गंभीर झाले.
कबीर थरथरात्या आवाजात, "तो आहे..."
आरवचा श्वास जणू छातीतच अडकला. त्याने चक्रावून मायाच्या टॅब्लेटकडे पाहिले.
आरव, "डॅनियल?"
कबीरने अत्यंत जड अंतःकरणाने होकारार्थी मान हलवली.
कबीर, "बहुधा... हा त्याचा शेवटचा रिले आहे."
मायाने एकही क्षण वाया न घालवता तिची बोटे कीबोर्डवर चालवली आणि तो सिक्युअर चॅनेल आयसोलेट केला, जेणेकरून शत्रूला त्याचा सुगावा लागणार नाही. पण तो सिग्नल इतका कमकुवत होता की स्क्रीनवर सतत डिस्टर्बन्स आणि स्टॅटिक दिसत होते.
आणि मग... त्या शांत शेडमध्ये टॅब्लेटच्या स्पीकरमधून एक आवाज गुंजला. तो अत्यंत तुटक, दूरवरून येणारा आणि बॅकग्राउंडला येणाऱ्या पाण्याचा आवाज चिरणारा होता.
डॅनियल, "आरव..."
त्या एका शब्दाने संपूर्ण शेडमध्ये जणू काळ गोठून गेला. एक भीषण शांतता पसरली. आरव तातडीने टॅब्लेटच्या आणखी जवळ पुढे सरकला. त्याचा ताण स्पष्ट दिसत होता.
आरव विकल स्वरात, "डॅनियल? डॅनियल, तू ऐकू शकतोस का?"
पुढचे काही सेकंद फक्त स्पीकरमधून येणारा 'सरसर' असा स्टॅटिक आवाज ऐकू येत राहिला. आरवच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आणि मग पुन्हा तो आवाज आला.
"ऐक..."
यावेळी त्याच्या आवाजाच्या मागे कुठेतरी जड धातूवर, लोखंडी पाईप्सवर आदळणाऱ्या पाण्याचा भयानक आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
आरवचा आवाज आता कमालीच्या तणावाने आणि भीतीने भरला होता.
आरव, "डॅनियल, तू नक्की कुठे आहेस? बाहेर नीघ तिथून!"
पण डॅनियलने त्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही. त्याला स्वतःच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. स्पीकरमधून फक्त एक अगदी क्षीण, मंद हसल्यासारखा आवाज आला.
"तुझे... तुझे वडील..."
ते वाक्य पूर्ण होण्याआधीच सिग्नल पुन्हा तुटला. पुन्हा तोच भयानक स्टॅटिक आवाज... Noise. आरवचे डोळे स्क्रीनवर खिळले होते, त्याचे हात थरथरत होते. आणि मग काही सेकंदांनी डॅनियलचा आवाज परत आला.
"तुझ्या वडिलांना माहीत होतं..."
ते शब्द कानावर पडताच आरव जागेवरच पूर्णपणे गोठून गेला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कबीरने डोळे मिटून घेतले आणि तो नजर खाली करून शांत उभा राहिला, जणू त्याला या सत्याची आधीच पुसटशी कल्पना होती. विनायकरावही स्तब्ध झाले, ते काहीच बोलले नाहीत. शेडमध्ये फक्त डॅनियलचा तो तुटक आवाज घुमत होता.
"काही गोष्टी..." सिग्नल पुन्हा एकदा क्रॅकल झाला, आवाज प्रचंड कापला गेला. "तुझ्यापासून... लपवाव्या लागल्या होत्या"
त्या शेवटच्या वाक्यानंतर शेडमध्ये एकाएकी इतकी भीषण शांतता पसरली की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. आरवचा श्वास जड झाला होता, त्याचे डोके सुन्न झाले होते. आपल्या वडिलांबद्दलचे हे विधान तो पचवू शकत नव्हता.
आरव, “"काय... काय म्हणालास?"
डॅनियल काही क्षणांसाठी काहीच बोलला नाही. स्पीकरमधून फक्त पाण्याचा तो अस्वस्थ करणारा आवाज येत राहिला. मग त्याचा अत्यंत शांत आवाज घुमला.
डॅनियल, "तुझ्या वडिलांनी... स्वतः तसं ठरवलं होतं, आरव."
ते ऐकून आरवचा संयम पूर्णपणे सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले होते.
आरव जवळजवळ ओरडतच, तीव्र अस्वस्थतेने म्हणाला, “"पण नक्की कशाबद्दल? डॅनियल... कशाबद्दल बोलतोयस तू?!"
पण यावेळी डॅनियलने त्याच्या त्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही. स्पीकरमधून आता दूरवर पाण्याचा वाढणारा वेग आणि त्याचा भयानक आवाज स्पष्टपणे वाढत चालला होता. पाण्याने वेढलेल्या चेंबरमधील एखादा मोठा धातूचा भाग, लोखंडी बीम दाबाने मोडून पडत असल्यासारखा एक कर्कश आवाज झाला. सिग्नलची क्वालिटी आणखीनच खालावली होती.
आरव हताश होऊन स्क्रीनजवळ जात म्हणाला, "डॅनियल!"
पुढचे काही सेकंद फक्त आणि फक्त पांढरा डिस्टर्बन्स आणि स्टॅटिक आवाज येत राहिला. आरवचे डोळे पाण्याने भरले होते. आणि मग, शेवटी डॅनियलचा आवाज पुन्हा एकदा ऐकू आला. तो आवाज शांत होता, अत्यंत थकलेला होता.
डॅनियल, "Keep moving.”
ते शब्द कानावर पडताच आरवचे डोळे क्षणार्धात मिटले गेले. त्याच्या छातीत कळ उमटली; कारण हेच ते शब्द होते जे डॅनियलने याआधीही अशाच कठीण प्रसंगांत वापरले होते.
आरव विकल होऊन म्हणाला, “डॅनियल..."
पण आता ती लाईन पूर्णपणे तुटायला लागली होती. टॅब्लेटच्या स्क्रीनवर दिसणारी सिग्नल स्ट्रेंथ अत्यंत वेगाने खाली घसरत चालली होती. शेवटच्या काही सेकंदांत फक्त एक अगदी अस्पष्ट, क्षीण आवाज ऐकू आला. डॅनियल आता आरवला नाही, तर जणू स्वतःशीच बोलत होता.
डॅनियल, “ऑलमोस्ट देअर…आपण जवळ पोहोचलोय."
आणि पुढच्याच क्षणी तो रिले कायमचा बंद झाला. टॅब्लेटची स्क्रीन एका झटक्यात पूर्णपणे काळी पडली. त्यावर पांढऱ्या अक्षरात फ्लॅश झाले CONNECTION LOST
शेडच्या छपरावर पाऊस अजूनही कोसळत होता, पण आत मात्र कोणाच्याच तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. प्रत्येकाची नजर त्या काळ्या पडलेल्या स्क्रीनवर खिळलेली होती.
आरव अजूनही टॅब्लेटच्या त्या निर्जीव, काळ्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिला होता. आजूबाजूला काय चालले आहे, याच्याशी जणू त्याचा संबंध तुटला होता. त्याच्या डोक्यात, त्याच्या संपूर्ण अस्तित्वात डॅनियलचे ते शेवटचे वाक्य एखाद्या महाभयानक वादळासारखे गोलगोल फिरत होते, "काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या गेल्या..."
पण त्या कोणत्या गोष्टी होत्या? त्यामागे काय कारण होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुष्यंतने स्वतःच्या वडिलांनी हे सगळे त्याच्यापासून का लपवून ठेवले होते? या एकाही प्रश्नाचे उत्तर आरवपाशी नव्हते. त्याला ते उत्तर हवे होते, पण ते देणारा डॅनियल आता हा संवाद पूर्ण करण्यासाठी तिथे उरला नव्हता. तो कायमचा दूर निघून गेला होता.
************************************************************************************************************************
त्याच वेळी जेएनपीटी रिले चेंबर
जेएनपीटीच्या त्या पाण्याने भरलेल्या रिले चेंबरमध्ये मृत्यू अगदी दारात उभा होता. चेंबरमधले गोठवणारे पाणी आता वर चढत थेट मुख्य टर्मिनलच्या स्क्रीनपर्यंत पोहोचले होते. पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे सिस्टीमचे डायग्नोस्टिक्स एकामागून एक शॉर्ट सर्किट होऊन कायमचे बंद पडत होते.
पण ते संपूर्ण टर्मिनल विझण्यापूर्वी, डॅनियलने आपल्या अंधुक होत जाणाऱ्या डोळ्यांनी स्क्रीनवरचा शेवटचा स्टेटस रिपोर्ट पाहिला.
त्या काळवंडत जाणाऱ्या स्क्रीनवर शेवटचे काही शब्द चमकत होते;
RESPONSE LATENCY CRITICAL
PRIORITY ROUTING DEGRADED
SEARCH COORDINATION FAILURE
ते शब्द पाहताच डॅनियलने अत्यंत शांतपणे आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान पसरले होते; कारण त्याला जे करायचे होते, ते त्याने साध्य केले होते.
डॅनियलने निर्माण केलेल्या डिजिटल कचऱ्यामुळे ब्लॅक एम्बरचा तो अचूक 'रिदम' आणि टायमिंग आता कायमचे तुटले होते. ते चक्रावून गेले होते.
चेंबरमध्ये पाणी आता त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचले होते, पण डॅनियलच्या मनात एकच आशा जिवंत होती... की वर कुठेतरी, या भयानक अंधारापासून दूर, आरव अजूनही थांबला नव्हता. आरव अजूनही पुढे चालत होता.