काव्यलेखन

कधीतरी वाटतं आजारी पडावं

Submitted by चैतन्य रासकर on 10 May, 2024 - 05:15

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं

पालथं झोपून छताकडे बघावं
भिंतीच्या पापुद्रांनी किती ते पडावं

दार उघडं ठेवून शांत झोपावं
स्वप्नात का होईना कोणीतरी गोळी द्यायला यावं

जुनं काही आठवावं स्वतःशी हसावं
असा का वागलो हे स्वतःला विचारावं

मागच्या गोष्टीचं काही दुःख नसावं
आपल्याला काहीही झालेलं नाही हे नव्याने कळावं

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं..

-चैतन्य रासकर

नभाला नभांची मिळे सावली

Submitted by द्वैत on 10 May, 2024 - 01:04

दिशा धावती दूर क्षितिजापुढे या
दिठीची मिती आज रुंदावली
नभाला नभांची मिळे सावली

दिसू लागता गाव कोठे सुखाचा
मुक्या पैंजणी धून झंकारली
नभाला नभांची मिळे सावली

फुलावे कळीने पहाटे पहाटे
तशी आर्तता अंतरी दाटली
नभाला नभांची मिळे सावली

कुणी छेडता मारवा सांजवेळी
शिडे गलबतांची हलू लागली
नभाला नभांची मिळे सावली

द्वैत

सेवानिवृत्तीची क्षणचित्रे

Submitted by पॅडी on 9 May, 2024 - 01:41

*सेवानिवृत्तीची क्षणचित्रे*

१/ समारोप

सुरकुतल्या शुभेच्छांचा गंधवर्षाव
कोमेजल्या अभिनंदनाचे हार तुरे
इतिहासजमा कालखंडावर
पहिले अन् शेवटचे गौरवपर भाषण,
सर केलेल्या अत्युच्च शिखरावरून
पेशवाई कटागत; सामूहिकरित्या-
अनाम अंधारदरीत ढकलून दिल्यासारखा
तो आत्मक्लेशी सुवर्णक्षण !

२/ दिनचर्या

रस्ता चुकलाच कसा?

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:17

रस्ता चुकलाच कसा?
©️ चन्द्रहास शास्त्री

आज काफिला आला, इथे कळ्यांचा कसा
माझे मलाच उमजेना, रस्ता चुकलाच कसा?

दवांचे लेऊन ते, वसन मनोहर भारी
डोलत डोलत आल्या, रस्ता चुकलाच कसा?

की नवा शिरस्ता हा, धरला ते समजेना
कळ्यांनो सांगा ना, रस्ता चुकलाच कसा?

तिला थांबू द्या जरा, तुम्ही जा सुखे घरां
पण तरी सांगून जा, रस्ता चुकलाच कसा?

सिद्ध मी हा स्वागतां, तरी विद्ध होई ती
म्हणून मी विचारतो, रस्ता चुकलाच कसा?

शब्दखुणा: 

खुशाल आहे.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:15

खुशाल आहे.
©️ चन्द्रहास शास्त्री

वीज दाटल्या नभी, कडाड विशाल आहे
सांग मेघा तू तिला, पण मी खुशाल आहे.

निशिगंधास रेशमी, ओढली शाल आहे
गंध झाकलास तरी, पण मी खुशाल आहे.

अवकाळी वर्षा ही, अजब हे साल आहे
खळे झालेच नाही, पण मी खुशाल आहे.

स्मृतीसारिकेने ही, मधुरली डाल आहे
पंचमाची प्रतीक्षा, पण मी खुशाल आहे.

चंद्र तेथे चांदणी, ख्याती मिसाल आहे
इतुके नसे पुरेसे, पण मी खुशाल आहे.

शब्दखुणा: 

ती

Submitted by शब्दब्रम्ह on 5 May, 2024 - 07:27

आठवतंय...,शेवटच्या भेटीत बुजली होती ती,
स्वतः च्याच अश्रुंमध्ये भिजली होती ती.

आभाळभर दुःखांनी रडली होती ती,
उष्टी हळद लागूनही फिकी पडली होती ती.

कित्येक यातनांशी एकटीच ,जुंपली होती ती,
नियतीला पुरून उरूनसुद्धा जणू आज संपली होती ती.

"ही शेवटचीच भेट आपली." म्हणल्यावर झुरली होती ती,
कंठात अडकलेल्या हुंदक्यात, नकळत विरली होती ती.

हजारो वादळं उरात दाबून चालली होती ती,
निःशब्द राहून सुद्धा,बरच काही बोलली होती ती.

मी जिंकलो वाटते.

Submitted by चंद्रहास शास्त्री on 4 May, 2024 - 00:41

मी जिंकलो वाटते.
©️ चन्द्रहास शास्त्री

तू हसताना सजणे, मी जिंकलो वाटते
तू लाजताना सखे, मी जिंकलो वाटते.

मिटती उघडती अशा, कळ्या भासती कशा
बोलताना सखे तू, मी जिंकलो वाटते.

गुणगुणतेस सखे तू, माझी कविता जेव्हा
शब्दच मोती होती, मी जिंकलो वाटते.

तारकांना सकाळी, वाटते जाग आली
सुधांशु तुझ्या भाळी, मी जिंकलो वाटते.

दृष्ट लागू नये तुला, अबीर मीच लावतो
मेंदीत अक्षर दिसता, मी जिंकलो वाटते.

शब्दखुणा: 

निरोपाच्या कविता

Submitted by पॅडी on 3 May, 2024 - 23:48

* निरोपाच्या कविता *

एक.

मान वेळावण्याआधी
प्राण कंठाशी येतात
न खाल्लेली सुपारी लागते
उंबर्‍यात पाऊल अडते,
ताटातुटीच्या बिकट समयी
नको नको म्हणताना
तेच ते आदिम आर्त नाट्य
आधुनिक युगातही घडते

दोन.

प्रकृतीस जपा
जेवणाचे हाल, रात्रीची जाग्रणे नको
पोहोचताच फोन करा
तुझ्या लक्षवेधी सूचनांची
लांबलचक यादी,
माझे बर्फाच्या तुकड्यागत
स्वत:त विरघळत जाणे
तुझ्या हरणकाळज्या पात्रात
धोक्याच्या पातळीपर्यंत
येऊन ठेपलेली महानदी

तीन.

शब्दखुणा: 

देवाक काळजी

Submitted by संदिप न. डिचोलकर on 3 May, 2024 - 05:46

माझं जगणं,भोगणं सारं कळुदे आधी माझं मला!
धाऊदे,दमुदे,पडूदे अन् सावरुदे आधी माझं मला!
सगळे आधार संपतील तेव्हा तूलाच साद घालेन मी!
तू माझ्या काळजीने मात्र मदतीच्या पुढे धावू नकोस!!
कळुदे झळ मला आयुष्यात येणाऱ्या ऊन पावसाची!
सोसुदे कळ मला घावावर घाव बसलेल्या वेदनांची!
प्राक्तनाला माझ्या आहे तुझी साक्ष हीच माझी श्रद्धा!
माझ्या थेंबभर श्रद्धेला तुझा कृपेचा सागर देऊ नकोस!!
सुखात रमलो जेव्हा त्याची सवय लागू दिली नाहीस!
दुःखात बुडालो तेव्हा जीवन नांव हेलकावु दिली नाहीस!
नको शुभाचा मोह नको अशुभाचा मोक्ष मला!

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन