भूमिका
क्षितिज पटवर्धन लिखित , चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेले भूमिका हे नाटक आताच पाहून आलो.
क्षितिज पटवर्धन लिखित , चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेले भूमिका हे नाटक आताच पाहून आलो.
राजा शिवाजी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
बघून या मस्त आहे.
मी सुरू करतो
सर्वात पहिले मी कबूल करतो की स्टारकास्ट बघून मी आधीच नकारात्मक मत बनवून ठेवले होते. त्याच वेळी चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे तर चुकवायचा कसा याही द्विधा मनस्थितीत होतो. पण चित्रपट प्रदर्शित होताच कुठलाही किंतु परंतु मनात शिल्लक राहिला नाही. जर "छावा" संभाजी महाराजांना चित्रपटगृहात बघून आलो तर "शेर" शिवाजी महाराजांना बघायला जायचेच होते.
तुम्ही म्हणाल ही द्विरुक्ती आहे तर दोष माझा नाही.
सगळे म्हणतात करण जोहर नेहमी फ्लफी, सोबो आणि साऊथ देल्ही क्राऊड दाखवणारे पिक्चर काढतो. आता तो तिथेच राहत होता ना? सकाळी कल्याण नाहीतर भायंदरवरून २० किलोची सॅक घेऊन ८:१७ ची लोकल पकडून वझे केळकर, पाटकर, रुईया नाहीतर इंटिग्रेटेडवाले ॲलन, फिजीक्सवाला गाठणारे विद्यार्थी त्याला कुठे माहिती? शहाड, नायगाव तर त्याने ऐकलं पण नसेल. मग निम्मं मुंबईकर महाविद्यालयीन पब्लिक क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळत असताना तो बास्केटबॉल खेळणारे, झेवियर्समधे
वावरणारे स्टुडंटसच दाखवणार ना? त्याचा बिचाऱ्याचा काय दोष?
ती (मृण्मयी गोडबोले) परक्या शहरात, परक्या देशात आहे, आणि तिला अचानक रस्त्यात तो (ललित प्रभाकर) दिसतो. तिच्या नजरेत त्याच्या बद्दल काही आहे. ती काही काळ त्याचा पाठलाग करते, त्याला भेटून ओळख द्यावी न द्यावी हा संभ्रम तिच्या डोळ्यात दिसतो आणि तो रस्ता ओलांडायला उभा असताना त्याच्या बाजुला ती उभी रहाते. त्याला ती दिसते, त्याच्या आणि तिच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडुन वहात असताना ते एकमेकांना आलिंगन देतात. ती संध्याकाळ दोघे एकत्र घालवतात. त्यातून त्यांच्यात काहीतरी जुने बंध, ओळखच न्हवे तर घट्ट मैत्री, बहुतेक त्याहुन जास्त अजुन काही आहे याची आपल्याला खात्री पटते.
आयुष्यात रिलेव्हन्ट राहण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण निसर्गाने अदृश्य केले.
आशा भोसले गेल्या.
'ती आशा भोसले' असा उल्लेख करायची अजिबात इच्छा नाही.
लता, मुकेश, रफी, किशोर, आशा -
असंख्य आयुष्ये घडवणारी नावे. रंजक होऊ शकतील असे अजिबात न वाटणाऱ्यांची आयुष्ये रंजक बनवणारी नांवे. त्यातील शेवटचा दुवा निखळला.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक असा दुवा निवर्तलेला आहे जो आपल्याला आता 'चला आता नवीन पिढीशी जोडून घेऊ' असे सुचवतो.
श्रद्धांजली!
काल केस नं 73 हा चित्रपट कोथरुड सिटी प्राईडला पाहिला. पहिलाच शो. Dr मिलिंद आपटे , psychologist and counselor, यांनी या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे
मध्यंतरी मी विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत सामाजिक जाणीवा असलेल्या सायकॉलॊजिस्ट व कौन्सिलर यांनाआवाहन केले होते. त्यानिमित्ताने माझी डॉ मिलिंद आपटे यांच्याशी परिचय झाला होता. जेव्हा त्यांनी या चित्रपटाची निर्मीती केली तेव्हा मला आश्चर्य वाटले.कारण चित्रपट निर्मिती हा त्यांचा प्रांत नव्हे. पण एकदा का सामाजिक जाणिवेचा किडा चावला की माणूस अस्वस्थ होतो. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.
अकरावी बारावीत असताना कै. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा रंग और नूर की बारात किसे पेश करू ऐकलं तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून "माई री sss, मैं कासे कहूं" ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदनमोहनची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते.
मुळात सचिन भौमिक यांच्या कथेवर आधारित "अनुराधा" हृषिदाना बंगाली भाषेतच करायचा होता. पण बलराज सहानीने गळ घातली आणि हृषिदा चित्रपट हिंदीत करायला तयार झाले. हृषिदासारखा मनस्वी दिग्दर्शक, बलराज सहानी, लीला नायडू (लीलाबाईंचा हा पहिलाच चित्रपट) आणि अभिभट्टाचार्य असे उत्तुंग अभिनय आणि सौंदर्य यांचे समसमा मिश्रण असलेले कलाकार आणि पंडित रविशंकर यांचे दैवी संगीत या त्रिवेणी संगमाने सजलेला हा चित्रपट.
डिसेंबर आला की छान छान क्रिसमस मूवी दिसायला सुरुवात होते. ते हापूस आंब्यासारखे सीजनल असतात आणि तसाच गोडवा घेऊन येतात म्हणून त्यावर चर्चा करायला हा स्वतंत्र धागा.
बघा.. लिहा.. सुचवा.. गोडवा पसरवा 