ऋतूपालट
दोन ऋतूंमधला बदल हा बेमालूमपणे होत असावा असा माझा समज होता. गेल्या आठवड्यात आलेल्या अनुभवांनी, तो चुकीचा आहे असे वाटायला लागले आहे. खटका दाबावा तसा ऋतू बदलला.
दोन ऋतूंमधला बदल हा बेमालूमपणे होत असावा असा माझा समज होता. गेल्या आठवड्यात आलेल्या अनुभवांनी, तो चुकीचा आहे असे वाटायला लागले आहे. खटका दाबावा तसा ऋतू बदलला.
गेली तीन-साडेतीन वर्षे मी ज्या ठिकाणी काम करते, ती संस्था बंगळूर शहराच्या मध्यवर्ती भागात असली, तरी संस्थेच्या विस्तीर्ण आवारात असंख्य झाडं आहेत. इमारती मोजक्याच आहेत. त्यामुळे आत प्रवेश केला की एकदम प्रसन्न वाटतं. आजूबाजूला वाहत्या रहदारीचे रस्ते असले, तरी आत मात्र छान शांतता असते. उन्हाळ्यात तर बाहेरून आत आलं की तापमानातला फरक चांगलाच सुखावह वाटतो. सध्या पानगळ सुरू आहे, त्यामुळे जरा रखरखाट आहे खरा, पण विविध प्रकारचे पक्षीही या दिवसांत दिसायला लागले आहेत. आमच्या विभागाच्या इमारतीला आमच्या मजल्यावर एक लाऊंज आहे, जो एका बाजूने पूर्ण खुला आहे.
दुरदेशीचा पक्षी मी,
दुरुन खूप आलो आहे.
क्षणभर इथे घरटे माझे,
लवकरच प्रस्थान आहे.
आलो कुठुन इथे लक्षात नाही,
जाणार कुठे,ना हे माहीत आहे.
इथे मर्त्य सर्व,फक्त अस्तित्व उरते,
अगणिक रंग त्याचे,एकेक उलगडत आहे.
उन,पाऊस,वारा भोगते ते शरिर,
"मी" कोण? ज्याला न यांचा स्पर्श आहे.
दुःख,विलास,आनंद अनुभवते ते मन,
तो "मी" कोण जो चिदानंद आहे.
हा अहंकार भाव मिथ्या,नव्हे सत्य,
तो "मी" कोण जो याचा सर्वसाक्षी आहे.
सोमवार, १४/७/२०२५ , ५:४० PM
अजय सरदेसाई - मेघ
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.
आमच्या बिल्डिंगला छानशी गच्ची आहे आणि दोन विंग्ज गच्चीने एकमेकींना जोडलेल्या असल्यामुळे ती एकूण मिळून बरीच मोठी आहे. कोविडमुळे माझं बागेत किंवा तळ्यावर फिरायला जाणं बंद झालं आणि गच्चीवर जाणं वाढलं. सकाळ-संध्याकाळ गच्चीवर फिरायला गेल्यावर आजूबाजूच्या झाडांवर, झुडपांवर, विजेच्या तारांवर अनेक पक्षी दिसतात. आकाशातून उडत जाणारे बगळे, पाणकावळे, चित्रबलाक, शराटी अशा पक्ष्यांचे भलेमोठे थवेही दिसतात. गच्चीवरून बघितल्याचा फायदा म्हणजे झाडाच्या शेंड्यावर बसलेले पक्षीही दिसतात, ( जे एरवी आपण झाडासमोर उभं असताना सहज दिसत नाहीत. ) शिवाय एकाच वेळी मोठ्या भागावर नजर ठेवता येते.
विहंग
वाटले मज आज होऊनी विहंग
उधळावेत रंग आसमंतातले..
घेतली भरारी पसरूनी पंख
उमटलेत तरंग बघ पाण्यावरी...
मिटलेल्या गच्च पापण्यांनी घेतली मी खोल उडी
केल्या भंग आज मी माझ्याच खोट्या ह्रडी...
न्याहाळतीये हे विश्व होऊनी विहंग
मीच मज संग का उरलेली?
अर्थ लावत मी या जगण्याचा
गाठते सुरुंग मनाच्या अंताचा..
गवसले मज आज होते जे हरवले
बांधिला आता चंग नव्या उम्मेदीचा!
- जान्हवी जोरी.
जंगलातल्या मैत्रीची गोष्ट
भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ आहेत असे त्यांना पुन्हा पुन्हा बजावले गेले होते.