नमस्कार! BMM सिअॅटल मध्ये विविध कार्यक्रम, स्पर्धा , उपक्रम यांची नेहेमीप्रमाणे रेलचेल आहेच.
विविध स्पर्धांची माहिती इथे मिळेलः https://bmmseattle2026.org/competitions
पण यंदा एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती देते.
आज २४ जानेवारी, बरोबर एक वर्ष झाले. मागील वर्षी मी भारतात गेलो होतो तेंव्हाची गोष्ट .
पुण्यास कामानिमित्त गेलो होतो ते झाल्यावर वेळ हाताशी होता. त्यावेळी माझा एक मित्र श्री शेखर याने आपण पुणे आणि परिसरात थोडे विनाकारण भटकूया असे सुचवले. आणि मग आमचे कधी सिहंगड तर कधी वेगवेगळी प्रदर्शने, असे अनियोजित भटकणे सुरु झाले .
सर्वांना येणार्या नववर्षाच्या शुभेच्छा!
Hermit Thrush

हा पक्षी माझा अजून एक लाडका पक्षी. Hermit Thrush. स्केचिंगसाठी हा योग्य होताच पण तरीही याच्याबद्दल आधी लिहावे आणि मग स्केच काढावे असे ठरवले होते. पण उलट झाले आणि माझे स्केच आधी काढून झाले आणि आत्ता त्याच्याबद्दल लिहायला घेतलेय. त्यामुळे या लेखात त्याचे स्केच आणि फोटो दोन्ही असतील.

किलडिअर हे विचित्र नाव असलेले हे पक्षी मी फ्रीमॉंटच्या लेक एलिजाबेथजवळून जाणार्या रेल्वेट्रॅकवर पाहिले होते. त्यांची मान उंचावण्याची लकब, तुरुतुरु चालणं गंमतीशीर वाटलं.

(बहुतेक) हा पक्षी टिटवीसारखा आहे. किलडीअरचे मराठी नाव सापडले नाही.
या पक्ष्याचे स्केच करताना डोळ्यांभोवतीची केशरी रींग धरुन केवळ पाच छटांच्या पेन्सिल्स वापरल्यात. आणि एचबी पेन्सिल आउटलाईन आणि शेडींगसाठी.

Burnt Ochre
रोलर प्रकारातले पक्षी एकंदरीत सुरेख असतात असं म्हणायला हरकत नाही.
मी आतापर्यंत दोनच रोलर्स पाहिलेत. एकदा कामशेतला दिसलेला इंडीयन रोलर (मराठीत नीलपंख/नीलकंठ?) आणि अलिकडे बाल्टीमोरच्या झू मध्ये दिसलेला हा Blue bellied Roller. त्याचा आफ्रिकन बंधू.
किती देखणं असावं एखाद्याने? फिकट गुलाबी/पीच रंगाची मान, काळे आणि अगदी इंकब्ल्यू रंगाचे पंख. त्यात मध्येच चमकदार आकाशी रंगाचा पट्टा. उडताना हे पसरलेले पंख दहापट जास्त सुंदर दिसतात.

हे दुसरे आवडते ब्रेनरॉट कॅरॅक्टर कापुचिनो आसास्सिनो! याच्या गावावर 'बंबार्डिनो क्रोकोडिलो'ने बाँब टाकून सगळ्यांना मारले. म्हणून हा साधा कॉफी कप चिडला आणि किलर बनला. हा रात्रीच्या अंधारात शत्रूच्या गोटात घुसतो आणि धूळधाण ऊडवतो. तो रडला तर कॉफीचे अश्रू येतात 
याचा रंग साधा तपकिरी आणि पांढरा असतो. आम्ही बदलून आमचा आवडता 'पलपल' दिला आहे.
आर्टिस्ट - इंद्रनील (वय ४ वर्षे)

हा आहे इटालियन ब्रेनरॉट मधला पक्षी फ्रुली फ्रुला (frulli frulla)! हा एक हायपरअॅक्टिव्ह (आपल्या रंगार्यासारखाच), हमिंगबर्ड कम पफिन कम टूकन असा मिक्स ब्रीड पक्षी आहे. एका वेड्या शास्त्रज्ञाने ठेवलेला रासायनिक चहा पिऊन त्याचं रूप बदललं आणि वेगवेगळ्या शक्ती मिळाल्या.