रंगीत पेन्सिल्स - Killdeer

Submitted by वर्षा on 19 October, 2025 - 19:55

किलडिअर हे विचित्र नाव असलेले हे पक्षी मी फ्रीमॉंटच्या लेक एलिजाबेथजवळून जाणार्‍या रेल्वेट्रॅकवर पाहिले होते. त्यांची मान उंचावण्याची लकब, तुरुतुरु चालणं गंमतीशीर वाटलं.

(बहुतेक) हा पक्षी टिटवीसारखा आहे. किलडीअरचे मराठी नाव सापडले नाही.
या पक्ष्याचे स्केच करताना डोळ्यांभोवतीची केशरी रींग धरुन केवळ पाच छटांच्या पेन्सिल्स वापरल्यात. आणि एचबी पेन्सिल आउटलाईन आणि शेडींगसाठी.

Burnt Ochre
Walnut Brown
Shwarz black
White
Dark Cadmium orange

डोके, डोळा, मान फटाफट झाली आणि पाठीवरच्या ब्राऊन शेड्सनी सर्वात जास्त वेळ घेतला. (पण कुठल्याही स्केचमध्ये मला जास्त वेळ हा मूळ रेखाटन म्हणजे एचबी पेन्सिलने काढलेली आऊटलाईन आणि त्यात असलेले इतर डिटेल्स रेखाटायलाही लागतो, त्यात भरपूर खाडाखोड होत असते. :))
एरवी मी तारीख नोंदवून ठेवते म्हणजे एकूण किती वेळ घेतला तो अंदाज येतो पण या वेळेस विसरले, पण बहुतेक एका आठवड्यात झाले पूर्ण. आजच संपवले.

Strathmore 300 series artist paper tile.
Faber Castell Polychromos colored pencils.
Amazon Basics HB pencil.

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख. अप्रतिम रेखाटन.

मला फार आवडतो किल डिअर. माझ्या घराजवळच्या एका डबक्याकाठी याचे घरटे होते या वर्षी

पाय आणि तू लिहीलेली मान उंचावण्याची लकब यावरुन, टिटवीच्या जातीचा दिसतोय. चित्र आवडले.

सुंदर!!
तो डोळा किती जिवंत वाटतो आहे! कमाल!

धन्यवाद सर्वांना.
>> मला फार आवडतो किल डिअर. माझ्या घराजवळच्या एका डबक्याकाठी याचे घरटे होते या वर्षी
मस्त!
>> जोडी काढ ना याची
चांगली आयडीया. रेफरन्स मिळाला पाहीजे पण

>>पाय आणि तू लिहीलेली मान उंचावण्याची लकब यावरुन, टिटवीच्या जातीचा दिसतोय.
हो आणि मी वाचले की शत्रूला घरट्यापासून लांब पळवायला जखमी झाल्याचं नाटक (टिटवीप्रमाणे) हे पक्षीसुद्धा करतात (broken wing act)