चित्रकला उपक्रम : त्रालालेलो त्रालाला- रीया - रिदीत गोडबोले

Submitted by रीया on 30 August, 2025 - 17:04

पाल्याचे नाव - रिदीत गोड्बोले
वय - ६ वर्षे
चित्राचा विषय - काल्पनीक प्राणी

ज्यांच्या कडे जेन अल्फा मुले आहेत त्यांना हे काय आहे ते सांगायलाच नको. इतरान्साठी - या वयोगटात सध्या इटालियन ब्रेन रॉट ची चलती आहे. एआय वापरुन तयार केलेले हे कॅरेक्टर्स मुलांना आवडतायेत.

त्यापैकी एक म्हणजे त्रालालेलो त्रालाला. हा एक तीन पायांचा शार्क आहे जो नायकी चे शुज घालतो. मला यापुढे जास्त ऐकवलं नाही .

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह मस्त. लहान मुलांमध्ये पहिलीच एंट्री रिदीतची.. शाब्बास Happy

त्रालालेलो त्रालाला - हे वाचून बोबडे बोल लिपीत लिहिलेले नाव वाटलेले Happy

चित्र छान काढले आणि रंगवले आहे रिदीतने.

3 पायांचा शार्क नायकी शूज घालणारा हे अजिबात माहीत नव्हते.
हा फुल मॅरेथॉन पळत असेल ह्यावरही विश्वास ठेवतो आता.
Happy

मस्तच रिदीत! शाब्बास!
आमच्याकडे पण ब्रेन रॉट फॅन आहे पण तो अजून तरी क्रेयॉन्स फेकून देतोय. रंगवलं तर देईन इथे.