रोलर प्रकारातले पक्षी एकंदरीत सुरेख असतात असं म्हणायला हरकत नाही.
मी आतापर्यंत दोनच रोलर्स पाहिलेत. एकदा कामशेतला दिसलेला इंडीयन रोलर (मराठीत नीलपंख/नीलकंठ?) आणि अलिकडे बाल्टीमोरच्या झू मध्ये दिसलेला हा Blue bellied Roller. त्याचा आफ्रिकन बंधू.
किती देखणं असावं एखाद्याने? फिकट गुलाबी/पीच रंगाची मान, काळे आणि अगदी इंकब्ल्यू रंगाचे पंख. त्यात मध्येच चमकदार आकाशी रंगाचा पट्टा. उडताना हे पसरलेले पंख दहापट जास्त सुंदर दिसतात.
वेगवेगळ्या पोझेसमधल्या असंख्य फोटोंमधून एक निवडणं आणि त्याहीपेक्षा मूळ रंगांच्या शक्य तितक्या जवळ जाणार्या छ्टांच्या पेन्सिल्स गोळा करणं हे काम आलं. पंधरा वर्षांपूर्वी घेतलेला ४८ छटांचा Prismacolor पेन्सिल्सचा सेट मदतीला धावून आला. आश्चर्य म्हणजे पेन्सिल्सचा दर्जा अजूनही टिकून आहे हे पाहून धन्य झाले. 
त्या निळाईत हरवायला झाले. म्हणून याचे नाव दिले - Wings of Sapphire
Strathmore 300 series artist paper.
Prismacolor premier.
Prismacolor VeryThins.
भारीच
भारीच
Awesome
Awesome
भारी
भारी
पहिल्या चित्रातील डोळा एखादा मणी चिकटवून बनवला आहे इतका हुबेहूब.. आपल्याकडे बघतोय असे वाटणारा
कमालीचं सुंदर चित्रं वर्षा.
कमालीचं सुंदर चित्रं वर्षा.
केवळ सुंदर.......
केवळ सुंदर.......
किती देखणं असावं एखाद्याने >>
किती देखणं असावं एखाद्याने >>
तसंच किती सुंदर चित्र काढावं एखादीने
अप्रतिम आलय. त्याची फर पण इतकी हुबेहूब वाटतेय.
देखणे ते हात ज्यांना
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
_/\_
कधीतरी नक्की प्रदर्शन भरवशील. अशीच सुंदर चित्रे काढत रहा, रंगवत रहा.
काय सुंदर चित्र! डोळा तर इतका
काय सुंदर चित्र! डोळा तर इतका जिवंत!
अप्रतिम आहे चित्र...
अप्रतिम आहे चित्र...
चित्र न वाटता फोटो वाटतोय.
डोळा तर हुबेहूब
अप्रतिम काढलंय चित्र ,फोटोच
अप्रतिम काढलंय चित्र ,फोटोच वाटतोय इतकं परफेक्ट.
अप्रतिम, काय सुरेख झाले आहे
अप्रतिम, काय सुरेख झाले आहे शेडिंग. डोळा तर एकदम भारी झालाय
.
सुंदर!
सुंदर!
सुंदर डोळा तर खूप सुरेख
सुंदर
डोळा तर खूप सुरेख
व्वा फारच भारी.
व्वा फारच भारी.
फारफार सुंदर.
फारफार सुंदर.
अतिशय सुंदर, जिवंत !
अतिशय सुंदर, जिवंत !
अप्रतिम.
अप्रतिम.
अतिशय सुंदर !!!!
अतिशय सुंदर !!!!
( तुम्ही जलरंगात काम करत असता तर तुम्हाला अधिक गंमत वाटली असती व रंगही अधिक खुलून आले असते, असंही वाटून गेलं ! )
धन्यवाद वलय, जाई, ऋन्मेष.
धन्यवाद वलय, जाई, ऋन्मेष. धनश्री, शशांक, छंदी, वावे, धनवंती, सिमरन, निर्मल, स्वाती, ऋतुराज, लंपन, सुनिधी, अस्मिता, मनीमोहोर, भाऊ!
@भाऊ, जलरंग शाळेनंतर कधीही वापरले नाहीत. पेन्सिल्स माध्यमाची ओळख झाल्यानंतर त्याच्या सुटसुटीतपणामुळे या माध्यमाकडे फारच आकर्षित झाले आणि ही चित्रे करताना फार मन रमते. एकाच बैठकीत अर्थातच करत नाही, रोज थोडा-थोडा प्रोग्रेस करत राहते.
जलरंग किंवा तैलरंगांइतके रंग कदाचित ठळक जाणवले नसतील इथे तर ती अर्थातच माझ्या चित्रातली कमतरता आहे पण जलरंग/तैलरंग/अॅक्रिलिकपेक्षा तसूभरही कमी नसणारी चित्रे साकारणे या माध्यमातही शक्य आहे असं मला वाटतं.
मध्यतंरी पेन्सिल चित्रे
मध्यतंरी पेन्सिल चित्रे करण्यात विविध कारणांमुळे खंड पडला होता. सराव गेलाय असं वाटत असतानाच एका युकेमधल्या कलर्ड पेन्सिल आर्टीस्टची ऑनलाईन वर्कशॉपची जाहीरात पाहिली आणि नाव नोंदवलं. तिने काही चांगली टेक्निक्स शिकवली. अजून खूप सराव लागेल पण ते तंत्र वापरुनच रोलरच्या डोक्यावरील, गळा-मानेपर्यंतची गुलाबीसर पिसे काढण्याचा प्रयत्न केला.
तिच्या वर्कशॉपमध्ये तिने हा चायनीज फ्लायकॅचर करुन घेतला होता:
वर्षा मस्त गं. काय गोड
वर्षा मस्त गं. काय गोड एक्स्प्रेशन्स.
- धनश्री (सामो)
Too good.. फार आवडल चित्र.
Too good.. फार आवडल चित्र..हुबेहुब झालंय
वाह..... सुरेखच....
वाह..... सुरेखच....
बर्षा सुरेख आहेत चित्रे…
बर्षा सुरेख आहेत चित्रे…
उडतानाचा इन्डियन रोलर पण चितार एकदा. कसला जीवघेणा दिसतो. त्या निळ्या रंगाला तोड नाही.
चायनीज फ्लायकॅचर अप्रतिम !
चायनीज फ्लायकॅचर अप्रतिम !
*...या माध्यमाकडे फारच आकर्षित झाले आणि ही चित्रे करताना फार मन रमते * - माध्यम निवडीचा हा अंतिम निकष आहे व त्यावर अढळ राहावं. मुळात, मी जलरंगाचा पर्याय सुचवणंच चुकीचं होतं. सॉरी.
वा! निव्वळ अप्रतिम आहेत
वा! निव्वळ अप्रतिम आहेत दोन्हीही चित्रं.
दंडवत घ्या अफाट सुंदर आहे हे
दंडवत घ्या
अफाट सुंदर आहे हे
@भाऊ, एवढं सॉरी म्हणण्याइतकं
@भाऊ, एवढं सॉरी म्हणण्याइतकं काही नाही हो.

झकासराव, मामी, साधना, शशांक, केया, सामो धन्यवाद
>>उडतानाचा इन्डियन रोलर पण चितार एकदा. कसला जीवघेणा दिसतो. त्या निळ्या रंगाला तोड नाही.
साधना अगदी अगदी.
खूप सुंदर. तो पक्षी तर सुंदर
खूप सुंदर. तो पक्षी तर सुंदर आहेच पण तो लाकडी ओंडकाही सुरेख उतरलाय चित्रात.
हा पण अप्रतिम चितारला आहे.
हा पण अप्रतिम चितारला आहे. फारच सुंदर!
Pages