माझे आवडते कार्टून - मॅगी - इंद्रनील निमकर (कापुचिनो आसास्सिनो)

Submitted by मॅगी on 2 September, 2025 - 04:22

हे दुसरे आवडते ब्रेनरॉट कॅरॅक्टर कापुचिनो आसास्सिनो! याच्या गावावर 'बंबार्डिनो क्रोकोडिलो'ने बाँब टाकून सगळ्यांना मारले. म्हणून हा साधा कॉफी कप चिडला आणि किलर बनला. हा रात्रीच्या अंधारात शत्रूच्या गोटात घुसतो आणि धूळधाण ऊडवतो. तो रडला तर कॉफीचे अश्रू येतात Happy
याचा रंग साधा तपकिरी आणि पांढरा असतो. आम्ही बदलून आमचा आवडता 'पलपल' दिला आहे.
आर्टिस्ट - इंद्रनील (वय ४ वर्षे)

Capucino.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सहीच निळोबा, कल्पक एकदम. शाबास.

ह्या इंद्रनीलमुळे मला नवीन माहीती मिळाली. मला हे कॅरॅक्टर माहीतीच नव्हतं.

व्वा छान आहे चित्रकला नील ची... सही म्हणून I हे भारीच आहे.
चित्रकलेच्या बाबतीत आईचा वारसा चालवणार नक्की इंद्रनील..

अजून त्याला सही म्हणून फक्त 'आय' काढता येतो >>> अग ही कोटी झाली, मी सुरेखसाठी सहीच शब्द वापरलेला (श्लेष अलंकार), हाहाहा.

बाप ले! मेनेसिंग दिसतोय की पल्पल कापुचिनो!
शाब्बास इंद्रनील! मला तुझंही नाव खूप आवडलं! Happy

भारीच! एकदम आय-कॅचिंग आहे कापुचिनो आसास्सिनो. गुड जॉब इंद्रनील! मला त्या कपाचं नावच भारी आवडलं आहे.
त्यामागची कथा पण बेस्ट आहे.

कसला क्युटे हा कापुचिनो..

इन्द्रनील निमकर….. काय नाव आहे!!!! बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथेतल्या हिरोला शोभेलसे.

एकदम आवडला पलपल कापुचिनो आसास्सिनो. मला या कॅरेक्टरचे नाव खूपच आवडलं आहे. आणि हो इंद्रनीलची सही मस्तच आहे.
शाब्बाश इंद्रनील!