
गेली तीन-साडेतीन वर्षे मी ज्या ठिकाणी काम करते, ती संस्था बंगळूर शहराच्या मध्यवर्ती भागात असली, तरी संस्थेच्या विस्तीर्ण आवारात असंख्य झाडं आहेत. इमारती मोजक्याच आहेत. त्यामुळे आत प्रवेश केला की एकदम प्रसन्न वाटतं. आजूबाजूला वाहत्या रहदारीचे रस्ते असले, तरी आत मात्र छान शांतता असते. उन्हाळ्यात तर बाहेरून आत आलं की तापमानातला फरक चांगलाच सुखावह वाटतो. सध्या पानगळ सुरू आहे, त्यामुळे जरा रखरखाट आहे खरा, पण विविध प्रकारचे पक्षीही या दिवसांत दिसायला लागले आहेत. आमच्या विभागाच्या इमारतीला आमच्या मजल्यावर एक लाऊंज आहे, जो एका बाजूने पूर्ण खुला आहे. फावल्या वेळात तिथे उभं राहणं हा बर्याच जणांचा आवडीचा उद्योग आहे, माझाही आहे. समोर भरपूर झाडं दिसतात आणि कधीकधी झाडांवरचे पक्षीही दिसतात. दुपारी जेवण झालं की आम्ही आवारात चक्कर मारतो, तेव्हाही पक्षी दिसतात.
असे गेल्या काही दिवसांमध्ये दिसलेले आणि कॅमेर्यात पकडता आलेले हे काही पक्षी!
एशियन ब्राऊन फ्लायकॅचर

एशियन टिट
ब्लॅक-रम्प्ड फ्लेमबॅक(सुतारपक्षी)
ब्ल्यू-कॅप्ड रॉक थ्रश
ब्ल्यू-नेप्ड मोनार्च
कोतवाल
ग्रीनिश वार्ब्लर
हेअर-क्रेस्टेड ड्रॉंगो
हूपो (हुदहुद)
इन्डिअन व्हाईट-आय (चष्मेवाला)
स्वर्गीय नर्तक (इंडिअन पॅरेडाईज फ्लायकॅचर)
स्वर्गीय नर्तकाची मादी
स्मॉल मिनिव्हेट (निखार)
पर्पल-रम्प्ड सनबर्ड (जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी)
सूर्यपक्ष्याची मादी
टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर
व्हाईट-चीक्ड बार्बेट
रुफस ट्रीपाय (टकाचोर)
Spotted owlet (पिंगळा)
हे फोटो बऱ्याच दिवसांपूर्वी काढले होते त्यामुळे विसरून गेले होते 

अजून एक फोटो
खूप छान आलेत फोटो सगळे.
खूप छान आलेत फोटो सगळे. ऑफिसमधून असे सुंदर पक्षी बघायला मिळतात हे किती मोठं भाग्य आहे.
वावे
वावे
जबरदस्त. सगळे फोटो मस्तच..
तुमच्या ऑफिसला ऑफिशियली पक्षी निरीक्षणाची जागा घोषित करा.
इथे आम्हाला जंगलात देखील एक वेळी इतके पक्षी बघायला मिळत नाहीत.
ऑफिसातून स्वर्गीय नर्तक पहायला मिळतो म्हणजे विशेषच.
अप्रतिम लकबी टिपल्या आहेत हे
अप्रतिम लकबी टिपल्या आहेत हे विशेष. पक्ष्यांचा डोळा चांगला स्पष्ट येणे चांगले.
अप्रतिम लकबी टिपल्या आहेत हे
अप्रतिम लकबी टिपल्या आहेत हे विशेष. पक्ष्यांचा डोळा चांगला स्पष्ट येणे चांगले.
काय छान फोटो टिपले आहे...
काय छान फोटो टिपले आहे... मस्तच!!!
फोटो खूप छान आलेत.
फोटो खूप छान आलेत.
तुमच्या ऑफिसला ऑफिशियली पक्षी निरीक्षणाची जागा घोषित >>>
पण खरंच नशीबवान आहात की ऑफिसमध्ये असताना एव्हढे छान पक्षी बघायला मिळतात.
>>तुमच्या ऑफिसला ऑफिशियली
>>तुमच्या ऑफिसला ऑफिशियली पक्षी निरीक्षणाची जागा घोषित करा.
+१११\
सुंदर! फोटो मस्त आहेत. किती वैविध्य! मिनिवेट्चा रंग कमाल!
खूप सुंदर आहेत सगळे फोटो.
खूप सुंदर आहेत सगळे फोटो. आवडले.
वा किती सुण्दर पक्षी आहेत.
वा किती सुण्दर पक्षी आहेत. बंगलोरमध्ये झाडे भरपुर आहेत, त्यामुळे पक्षीही असावेत.
मात्र ते पक्षी दिसले तरी चांगले फोटो मिळावा हे मात्र भाग्य व कौशल्य.
अमेझिंग. मस्त निरिक्शण
अमेझिंग. मस्त निरिक्शण
मस्तच. नेत्रसुखद नजारा.
मस्तच. नेत्रसुखद नजारा.
बापरे.. फारच सुंदर.
बापरे.. फारच सुंदर.
बंगळूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऑफिसच्या परिसरात इतके पक्षी.. हे खरेच ग्रेट आहे. इथे ऑफिसला गार्डन असली तरी ती शोभेची असतात. पक्षी त्यांना थारा देत नाही.
ऑफिसमधले पक्षी असे शीर्षक
ऑफिसमधले पक्षी असे शीर्षक वाचून वेगळेच काही असेल असे वाटले होते.

उबो
उबो
उबो
उबो
छान आलेत फोटो सगळे. ऑफिसमधून असे सुंदर पक्षी बघायला मिळतात हे किती मोठं भाग्य आहे. +1
किती सुरेख रंगीत पक्षी आहेत स्वर्गीय नर्तक भारीच.
मस्त आहेत फोटो! प्रॉपर कॅमेर्
मस्त आहेत फोटो! प्रॉपर कॅमेर्याने काढलेत का? खूप जवळून आल्यासारखे आहेत.
त्या कोतवाल पक्ष्याचा फोटो जाम आवडला. इतक्या तिरक्या फांदीवर बॅलन्स साधून तो सरळसोट उभा आहे!
सुंदर फोटोज्.
सुंदर फोटोज्.
..”ऑफिसमधले पक्षी” शीर्षक वाचून वेगळेच काही असेल असे वाटले…
डिट्टो
१७ प्रतिसाद बघून मस्त वाटलं.
१७ प्रतिसाद बघून मस्त वाटलं. 'ऑफिसमधले पक्षी' नावावरून अशी काही अपेक्षा निर्माण होईल असं वाटलं नव्हतं

धन्यवाद सगळ्यांना. खरोखरच भाग्य आहे ऑफिसमधून एवढे पक्षी दिसणं याची मला जाणीव आहे. ऋन्मेष, आमच्या ऑफिसला गार्डन नाहीये, गार्डनमध्ये ऑफिस आहे
फारएण्ड, हो माझ्या निकॉन p900 ने काढले आहेत फोटो.
ऑफिसातून स्वर्गीय नर्तक
ऑफिसातून स्वर्गीय नर्तक पहायला मिळतो म्हणजे विशेषच.>>> नक्कीच....आम्ही दोडामार्ग च्या जंगलात एका रिसॉर्टला गेलेलो जिथे पक्षी निरीक्षणासाठी देशी विदेशी लोक येतात....तिथे याचे ओझरते दर्शन झालेले पाणवठयावर....हा उडताना याचा शेपटा खूपच सुंदर दिसतो
क्लिकबेट मथळा
क्लिकबेट मथळा
ऑफीसच्या आवारातले पक्षी आहेत हे.
छानच आलेत सगळेच फोटो.
अवांतर - भर शहरात स्वर्गीय नर्तकासह इतक्या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवू शकणार्या संस्थेला मानाचा मुजरा ! पुण्यात लॉकडाऊनच्या काळात एकदा भांडारकर की प्रभात रस्त्यावर दिसला होता हा. (मला नव्हे)
खूप सुंदर आहेत फोटो. किती
खूप सुंदर आहेत फोटो. किती छान ऑफिसमधून बघायला मिळतात एवढे पक्षी!
सुंदर!!
सुंदर!!
आहाहा !!!!!
आहाहा !!!!!
फार दिवसांनी सुंदर फोटो आले वावे कडून.

एकसे बढकर एक
ऑफिसात हे इतके पक्षी दिसतात आणि फोटोत पोज देतात ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.
सुंदर फोटो !!
सुंदर फोटो !!
सुंदर... ऑफिसमधून असं सौंदर्य
सुंदर... ऑफिसमधून असं सौंदर्य बघायला मिळणं म्हणजे खूपच भारी
सर्व फोटो छान
धन्यवाद सर्व नवीन
धन्यवाद सर्व नवीन प्रतिसादकांना!
भर शहरात स्वर्गीय नर्तकासह इतक्या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवू शकणार्या संस्थेला मानाचा मुजरा >> हर्पेन
इतके पक्षी बघायला मिळतायत हे
इतके पक्षी बघायला मिळतायत हे फारच भाग्य आहे.
वाह! सुरेख फोटो!
वाह! सुरेख फोटो!
श्रीमंत ऑफिस आहे तुझं
फारच भारी. मस्त टाईमपास होत
फारच भारी. मस्त टाईमपास होत असेल कामाचा कंटाळा आला की. स्वर्गीय नर्तक आणि मिसेस नर्तक इतक्यात बघितले होते. काय सुंदर हालचाल करतो नर्तक. एका क्षणात इकडून तिकडे आणि ते पण लयबद्ध. हुदहुद मुलीला हिंदी धड्यात आहे एका, त्याला डोक्यावर सोनेरी मुकुट कसा मिळाला ह्याची गोष्ट
अप्रतिम आलेत फोटो! खरच
अप्रतिम आलेत फोटो!
Pages