मायबोली गणेशोत्सव २०२४ - पाककृती स्पर्धा
नमस्कार मायबोलीकरांनो,
दरवर्षी गणेशोत्सवात सगळ्यात जास्त आतुरता असते ती पाककृती स्पर्धांची. कितीही अवघड स्पर्धा ठेवली व कितीही अनोखे नियम केले तरी मायबोलीकर कायमच त्यांच्या सृजनशीलतेने एकापेक्षा एक रुचकर पाककृती तयार करून दाखवतात. दरवर्षी संयोजकांपुढे सर्वात गहन प्रश्न असतो तो म्हणजे, 'यावेळेस पाककृती स्पर्धा कोणत्या ठेवायच्या?' हाच !
गणेशोत्सवात गणपती आगमनाची तयारी, त्यानंतर गौरी आवाहन, पूजन, विसर्जन या सर्व धामधूमीत तुम्हाला पाककृती स्पर्धांची तयारी करायला वेळ मिळावा म्हणून यावर्षी पाककृती स्पर्धांची घोषणा श्रीगणेश चतुर्थीच्या आधी करत आहोत.