पाककृती स्पर्धा ३: संत्र्याचे सालीसकट आंबटगोड तोंडीलावणे/ चटणी - सावली

Submitted by सावली on 7 September, 2025 - 11:10

संत्र्याचे सालीसकट आंबटगोड तोंडीलावणे/ चटणी

साहित्य
- १ अख्खे संत्रे सोलून आणि तुकडे करून
- त्याच संत्र्याच्या सालीचे तुकडे करून
- १ते २ खारवलेल्या कैरीच्या फोडी किंवा चिंच ( दोन्ही थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून)
- १ लाल सुकी काश्मिरी मिरची
- भरपूर कढीपत्त्याची पाने
- १ छोटा चमचा डाळव किंवा साल काढलेले चणे
- २ चमचे तेल
- १ चमचा मोहरी
- किंचित मेथी
- हळद, तिखट मिठ

कृती

१. चणे/ डाळव आणि लाल मिरची (बिया काढून) मिक्सरला लावून पावडर करावी
२. तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकावे.
३. त्यात संत्र आणि सालीचे तुकडे घालावे आणि थोडे परतून घ्यावे.
४. तिखट, हळद घालावी
५. लगेच वर तयार केलेली पावडर घालावी.
६. आवश्यक तेवढे पाणी, घालून किंचित शिजू द्यावे.
७. नंतर चिचेंचा कोळ किंवा कैरीचे खारवलेले भिजवलेले तुकडे घालून अजून थोडावेळ शिजू द्यावे
5. घट्ट होत आले की गुळ घालून ढवळून थोड्यावेळात Gas बंद करावा..
6. तोंडी लावणे, चटणी, भाजी म्हणून खाता येते.

टिपा: आंबट संत्री खपवण्याचा उपाय आहे.
वेगळे तोंडीलावणे म्हणून छान लागते. चणे नाही घातले तरी छान लागते पण घट्टपणा येत नाही.

2025-09-07-20-38-41-755.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Thanks
मुरेपर्यंत उरले नाहीये Lol

डाळे जास्त घातले चांगले लागणार नाही. अगदी १ चमचा , घट्टपणा येण्यासाठी हवे. त्याची चव फरशी नाही लागली पाहिजे.

मस्त.
संत्र्यांचा सिझन आला कि करून बघणार. आंबट - गोड - तिखट अश्या एकत्र चवीचे सगळे पदार्थ मनापासून आवडतात. हे सुद्धा आवडेल नक्कीच.