चिया सीड्सचा चटपटीत ब्रेकफास्ट
साहित्य
- २ चमचे चिया seeds
- १ वाटी ताजे दही
- १ संत्रे (साल काढून फोडी करून, बीया काढून)
- १ केळे (चकत्या करून)
- १ हिरवी मिरची (बारीक चिरून)
- थोड्या भोपळ्याच्या बिया ( किंवा इतर कोणत्याही )
- १ छोटा चमचा चाट मसाला
- मीठ चवीनुसार
कृती :
१. एका मोठ्या वाडग्यात दही घेऊन त्यात थोडे पाणी चिया बिया घालाव्यात.
२. त्यातच बारीक चिरलेल्या मिरचीचे तुकडे घालावे.
३. नीट ढवळून हे मिश्रण १५ ते २० मिनिटे झाकून फ्रिज मध्ये ठेवावे , जेणेकरून बिया नीट भिजून फुगतात, मिरचीचा स्वाद देखील मुरतो आणि पदार्थ थंड पण होतो
४. दही घट्टसर झाले की त्यात संत्र्याच्या फोडी व केळ्याच्या चकत्या घालाव्यात. भोपळ्याच्या बिया देखील घालाव्यात.
५. आता त्यावर चाट मसाला व मीठ शिंपडून नीट मिक्स करून घ्यावे.
६. न शिजवता अगदी कमी वेळात करता येणारी तरीही हेल्दी अशी न्याहारी तयार आहे.
टिपा: यात बाकी ड्राय फ्रुट, नट्स, इतर बिया देखील घालता येतील . कोणतेही फळ घालता येते. त्यामुळे रोज नवीन चवीचा ब्रेकफास्ट करू शकतो. अननस, डाळिंब यात खूपच छान लागतात. न खपणारे सफरचंद देखील यात संपवता येते.
छान डिश आणि छान सजवली आहे.
छान डिश आणि छान सजवली आहे.
चोथायुक्त फळं घातली की (यात घातली आहेच) ही प्रि+प्रोबायोटिक+प्रोटीनयुक्त डिश होते.
मस्तच दिसतेय, आवडली कृती.
मस्तच दिसतेय, आवडली कृती.
चियो!!! सॉरी जियो!!
चियो!!! सॉरी जियो!!
फारच मस्त.
मस्तच दिसत आहे!
मस्तच दिसत आहे!
मस्त दिसत आहे
मस्त दिसत आहे
मस्त दिसतेय
मस्त दिसतेय
आणि टेस्टीही वाटतेय. संत्री आणून करुन बघेन
Thanks मानव, अस्मिता, सामो,
Thanks मानव, अस्मिता, सामो, ऋन्मेऽऽष, झकासराव, कविन
हे छान लागतं. मी बऱ्याचदा सकाळी खाते. आणि कोणतीही यात फळं चालतात. संत्री नसली तरी चालेल.
सकाळी गोड खायचा कंटाळा येतो त्यामुळे साखर वगैरे न घालता मीठ आणि थोडी हिरवी मिरची घालते.
मिरची देखील ऑप्शनल आहे. काळी मिरी देखील चालते.
चिया सीड आणि दही तेवढे कम्पल्सरी आहेत
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
नक्की करून बघणार.
मीठ, मिरची घालायची असेल तर - पुदिन्याची २-४ पानंही चांगली लागतील असं वाटलं.
मस्त सोपी वाटतेय रेसिपी
मस्त सोपी वाटतेय रेसिपी

चिया बिया नाहीयेततर सब्जा चालेल का
हे आवडलंय. गोड ब्रेकफास्ट
हे आवडलंय. गोड ब्रेकफास्ट आवडत नाही आणि रोज रोज उकडलेली अंडी खायचा कंटाळा येतो. अधून मधून खायला हे सोप्पं आहे. केळं आवडत नाही, पण मी सफरचंद, अननस, संत्री आणि डाळिंब यापैकी काहीतरी घालून खाईन. कोथिंबीर, पुदिना पण घालेन हिरव्या मिरची सोबत.