पाककृती स्पर्धा ३- चटपटीत पीच रोल्स - देवीका

Submitted by देवीका on 8 September, 2025 - 01:41

रोज रोज गोड खावुन कंटाळला असला तर हे मस्त लागतात.

जिन्नसः

सफेद पीचेस ३ (तुम्ही पिवळे पीचेस सुद्धा वापरु शकता).
मसाले:
दालचिनी चिमटीभर,
सूंठ चिमटीभर,
लाल तिखट चिमटीभर,
वेलची पूड,
मीठ चवीप्रामाणे,
१-२ लवंगा,
केसर काड्या एपतीप्रमाणे,
जायफळ पूड चिमटीभर,
ओलं खोबरं खोवलेलं १ वाटी,
काळे तीळ शोभेला,
कोकोनट साखर( नारळाच्या ताडीची साखर) , तुम्ही गुळ , साखर घेवु शकता.
साजुक तूप लागेल तसं
लिंबू रस १ चमचाभर,

रोल्स शीटः
मी रेडीमेड पेस्टी शीट आणली.

कृती:
प्रथम तूपात चौकोनी कापलेले पीचचे तुकडे परतून घ्यावे.
मग त्यात वरील मसाले टाकावे. थोडावेळ शिजले की, त्यात साखर टाकून आटवून घ्यावे.

मिश्रण आळत आले की, त्यात लिंबू रस घालून मग खोवलेलं खोबरं घालून परत आळावून घ्यावे.
आता पेस्ट्री शीट पसरवून चौकोनी लाटून त्यात आटीव पीच सारण भरावे. वरून काळे तीळ घालावे. व रोल करून ३५० फॅ २५ मिनिटे बेक करून घ्यावे व मधून कापावे.

नुसता जॅम म्हणून सुद्धा ब्रेडला लावून खाउ शकता.

c61c9cac-e584-4a6d-a881-ae00d293435e.jpegda497ec1-deb2-4d11-b575-e1bae0832703.jpeg81dfec36-35a7-40c4-b160-0fe438450c5b.jpegIMG_3593.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users