पृथ्वी

नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

Submitted by जिज्ञासा on 13 June, 2021 - 23:43

या आपल्या गप्पांच्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण केतकीकडून इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या अभ्यासात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याविषयी ऐकलं. शिवाय पृथ्वीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करताना पृथ्वीची विविध बायोम्स मध्ये कशी विभागणी होते ते देखील पाहिलं. या भागात आपण या गप्पा पुढे चालू ठेवू.

नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

Submitted by जिज्ञासा on 4 June, 2021 - 23:45

असंबाधमं बध्यतो मानवानां यस्या उद्वतः प्रवतः समं बहु।
नानावीर्या ओषधीर्या बिभर्ति पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः।। अथर्ववेद

अर्थ: ही धरा जी आपल्या पर्वत, दऱ्या आणि पठारांच्या माध्यमातून मनुष्यांना आणि सर्व जीवांना आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारचे अनिर्बंध स्वातंत्र्य प्रदान करते. जी अनेक गुणांनी संपन्न अशा औषधी वनस्पतींना जन्म देते आणि त्यांचे पोषण करते. अशी पृथ्वी आम्हाला समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो.

प्रस्तावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

Submitted by मार्गी on 8 May, 2016 - 09:09

प्रस्तावना

आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो.

विमानाची उडल्या जागी राहून पृथ्वीप्रदक्षिणा ?!

Submitted by गजानन on 5 January, 2016 - 10:23

पृथ्वी स्वतःभोवती फिरते. समजा एका विमानाने (न जाणो त्याच्या खाण्यात काय आले!) जमिनीशी एकदम काटकोनात सरळ रेषेत उड्डाण केले आणि काही किलोमीटर उंचीवर जाऊन (उदा. ५ किमी उंचीवर एका बिंदूशी) ते स्थिर झाले, (ना आगे, ना पिछे, ना उपर, ना नीचे) तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दुरावलेल्या अवस्थेत राहील. मग ते बराच वेळ असेच राहिले तर स्वतःभोवती फिरणार्‍या पृथ्वीचा पृष्ठभाग विमानाच्या खालून पुढे सरकत राहील का?

"कडक पृथ्वी" - "सौम्य मंगळ"

Submitted by गुलाम चोर on 22 October, 2013 - 00:29

हो - नाही - हो करता करता अखेर फायनल झालेलं आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था लवकरच मंगळावर (तोच तो आपल्या भारतीयांच्या जीवनात 'चहा' , इस्त्री यांच्या खालोखाल 'कडक' मानला जाणारा…) यान पाठवणार आहे. मोहीम यशस्वी होईल असं गृहीत धरू.. नाही धरू'च' (कारण शेवटी आपल्या खिशातूनच जाणार आहेत हे पैसे). सारे काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीला भारताचे 'मंगलयान' मंगळाच्या दिशेने झेपावेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ आपली मुद्रा आणखी ठळक करतील.

आता मला अशी शंका आहे कि, जर आज - उद्या - १०० वर्षांनी मंगळावर वस्ती शक्य झाली तर....

धूमकेतु - मृत्यूघन्टा की जीवनदाता ?

Submitted by kaushiknagarkar on 10 March, 2013 - 23:53

हॅलो ...

अरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.

बोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय?

कॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.

कसली कॉमेंट? कुणी केली?

कॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय? कॉमेट म्हणालो मी? ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.

हो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस?

कॉमेटला मराठीत काय म्हणतात?

धूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.

म्हणतात ना? म्हणतात ना? काय म्हणालो मी. जिंकलो की नाही? हा हा हा.

अरे मित्रा, काय म्हणालास? काय जिंकलास?

मनोगत

Submitted by शिलमित on 31 October, 2011 - 14:24

मनोगत
बाई, तशी तूही सहनशीलच!
अनंत काळचे उन्हाळे, पावसाळे,
किती उठली असतील वादळे.
त्यातून तावून सुलाखून
तूही इथवर पोचलीसच.
निसर्गाचे रागलोभ अन चमत्कार
तुझ्याही अंगणात हक्कानं येऊन नांदतात.
त्यांच्या खाणाखुणा, माझ्यासारख्याच
तूही जपतेस, दागिन्यांसारख्या अंगाखांद्यावर.
पण तुझ्या इच्छाआकांक्षांची ठिणगी
ओंजळीत ठेवतेस घट्ट मिटून.
त्यासाठी आभाळासारखं शक्तिशाली
करावं लागतं मन.
(मलाही हे चांगलंच माहित आहे!)
अगं, सात अब्जांना जन्म देणारी मी ,
अन, त्या सात अब्जांचा भार वाहणारी तू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पृथ्वी