उपवास

पाककृती स्पर्धा-१ - उपासाची गोड कचोरी - साक्षी

Submitted by साक्षी on 29 September, 2023 - 01:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
प्रादेशिक: 

उपवास

Submitted by Ravi Shenolikar on 11 October, 2019 - 10:50

रविवारी नवरात्रीतली अष्टमी होती. ठरवून उपवास केला. मी केला म्हणून सौ. ने ही केला. माझा तिला काही आग्रह नव्हता. पण तिनेही केला. अर्थात निर्जळी किंवा तत्सम भीषण उपवास नव्हे. नेहमी करतो तसा. सकाळी बटाट्याचा कीस व दूध, दुपारी दोन केळी, संध्याकाळी साबुदाणा वडे. रात्री ९ ला उपवास सोडून जेवण. संध्याकाळी देवीच्या देवळात जाऊन आलो. एकूण छान वाटले. मनात आलं, आपण आपली पचनसंस्था किती राब राब राबवतो. तिलासुद्धा विश्रांतीची गरज आहे. कदाचित आपल्या पूर्वजांनी म्हणूनच एकादशी, संकष्टी वगैरे निमित्तानी उपवासाची योजना करून ठेवली असेल. त्यामागचे शहाणपण कळायला बराच काळ गेला.

विषय: 
शब्दखुणा: 

उपवासाचा शिरा खास आषाढी एकादशीनिमित्त by Namrata's CookBook :९

Submitted by Namokar on 11 July, 2019 - 04:14
upwasacha -shira
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
पाककृती प्रकार: 

फसलेल्या उपवासाची कहाणी

Submitted by ओबामा on 2 October, 2017 - 00:43

तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते. मी फक्त फुल्या मारून दिवस संपवायचो. तशीच फुली मारताना लक्षात आले अरे आजतर "महाशिवरात्री".

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ

Submitted by राहुल बावणकुळे on 11 August, 2017 - 05:21

लागणारा वेळ:
४५-६० मिनिटे
साहित्य
२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी
१०० ग्राम उपवासाची भाजणी
५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा जिरेपूड
चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ
आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल
कृती
१. प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी.
२. एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी.
३. आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे.

विषय: 

मला समजलेलं इंटरमिटन्ट फास्टींग

Submitted by नलिनी on 28 March, 2017 - 06:48

मी माझ्या डाएटचा एक भाग म्हणून इंटरमिटन्ट फास्टींग करायला सुरवात केली. सुरवात करताना त्यावर जमेल तसं वाचन, इतरांचे अनुभव ऐकणे, वाचणे हे सुरू केले.

डाएटचा कोणताही प्रभाव न पडू देता मला समजले तसे आणि शक्य तेवढ्या सोप्या भाषेत मी ह्याबद्दल लिहीणार आहे.

इंटरमिटन्ट फास्टींग म्हणजे नक्की काय?
हे एक फॅड आहे का?
हे कोणी करावे? फक्त वजन कमी करण्यासाठीच करावे का?
मला डायबेटीस बरा करायला जमेल का? बरा नाहीच झाला तर कमीत कमी औषधांपासून माझी सुटका होईल का?
मला सकाळी उठल्यावर काहीतरी खायला लागतेच लागते, तर मी हे कसे करावे, मला जमेल का?

विषय: 

उपवासाचे ढोंग

Submitted by कुमार१ on 15 February, 2017 - 21:43

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.

विषय: 

कवठाचे आंबील - उपवासाला चालणारे आणि पित्तनाशक

Submitted by हर्ट on 27 November, 2015 - 06:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

उपवास..

Submitted by दुसरबीडकर on 17 August, 2013 - 05:49

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते तर त्यांच्यासोबत लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय' कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!

Pages

Subscribe to RSS - उपवास