बालपण

रम्य ते बालपण

Submitted by शिवानी बलकुंदी on 2 July, 2025 - 06:29

लहान असताना अनेकदा आपण मोठ्यांकडून “आमच्या वेळी नव्हतं असं काही” हे वाक्य ऐकत आलो. आता तेच वाक्य नकळत आपण आपल्या मुलांना पण म्हणत असतो. तसं पहिलं तर हे खरंच आहे नाही का. आपल्या लहानपणीच्या कितीतरी किंबहुना अनेक गोष्टी, वस्तु, आपले जीवनमान खूप म्हणजे खूपच बदलले अहे. त्यातीलच एक म्हणजे मुलांचे खेळ. आताची मुले जे खेळ खेळतात ते बघून हे प्रकर्षाने जाणवते. मुलं आता स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबलटेनीस, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांच्या वर्गांना सकाळी किंवा संध्याकाळी जातात किंवा क्लब जॉइन करतात.

विषय: 
शब्दखुणा: 

तुमच्या बालपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत?

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47

आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.

त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.

जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.

..... आणि

एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!

पुन्हा वाटते

Submitted by Rajkumar Jadhav on 16 April, 2022 - 22:54

पुन्हा वाटते

वार्‍या संगे राना मध्ये
पुन्हा वाटते धावत जावे
आणि तरूच्या अंगावरती
मजेत अलगद झोके घ्यावे

भर दुपारी डोहा मध्ये
पाठशिवणी खेळत डुंबावे
उन्हे घेऊनी पाठीवरती
सावलीत अर्ध्या पहुडावे

कुठे मधाचे पोळे दिसता
वरून झटकून मोडून घ्यावे
या फांदिहून त्या फांदीवर
सरसर जाऊन मस्त चुपावे

सायंकाळी खेळ खेळुनी
पारावरती पैस बसावे
मित्रांसंगे गप्पा मारत
आयुष्यावर खूप हसावे

कानावरती हाक आईची
घराकडे झेपावत जावे
मायेचा तो घास खाऊनी
कुशीत तीच्या झोपी जावे

राजकुमार जाधव

शब्दखुणा: 

फटाके आणि आपले बालपण - आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2020 - 17:11

कुठेतरी वाचलेले, आपल्या आयुष्याचा एक कालखंड आपल्या ईतक्या आवडीचा असतो की तो आपल्याला पुन्हा एकदा जगावासा वाटतो.
माझ्यासाठी तो माझ्या दक्षिण मुंबईतल्या चाळ संस्कृतीत गेलेल्या बालपणाचा होता.

पैसे फार नव्हते तेव्हा. पैश्याने सारे सुखेही विकत घेता येत नाहीत म्हणा. पण आहे त्या पैश्यात मोजके फटाके विकत घेता यायचे. आणि ते मात्र अफाट सुख द्यायचे.

विषय: 
शब्दखुणा: 

बालमित्रांची सुट्टी....

Submitted by भागवत on 12 June, 2019 - 05:26

करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती
करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी

करू थोडा खेळ, बसला आता मेळ
करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी

भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा
दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी

दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड
जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी

आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ
मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी

दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान
खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी

शब्दखुणा: 

दोस्ता.....

Submitted by पुरंदरे शशांक on 26 June, 2018 - 04:48

दोस्ता....

नाही कल्लोळत आता
मन पावसाने तसे
बागडत होतो कधी
बालपणी धुंद जसे

नाही नाचत मी आता
दूर ढगांना बघून
मन नाही थरारत
बिजलीही कडाडून

भिजण्याची नव्हतीच
भिती कधीच मनात
दोस्ती तुझीमाझी खरी
दंगामस्ती ये भरात

होड्या कागदाच्या पार
गेल्या वाहून वेगात
ठेव खांद्यावरी हात
खेळू पुन्हा अंगणात.....

शब्दखुणा: 

बालपण : पुन्हा एकदा जगण्यासारखं

Submitted by चिन्गुडी on 27 April, 2017 - 09:49

उन्हाळा म्हंटलं की काही जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणीच्या सगळ्या धमाल मज्जा आठवायला लागतात. वार्षिक परीक्षा संपायच्या आधीपासून उन्हाळी सुट्टीचे प्लॅन बनायला लागायचे.

विषय: 

टॅटू, मावळा, भिंगरी इत्यादी इत्यादी

Submitted by सचिन काळे on 23 October, 2016 - 09:11

सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर खिडकीजवळ दोन प्रौढ व्यक्ती बसतात. आणि तिसऱ्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. त्या चौघांची आधीचीच ओळख असावी. पप्पा मुलीला हाताला धरून घेऊन आले कि त्या प्रौढ व्यक्तींपैकी एकजण चॉकलेट काढून मुलीच्या हातावर प्रेमाने ठेवणार आणि ती मुलगी ते गट्टम करणार, हा रोजचा शिरस्ता.

विषय: 

काय भारी होतं ना बालपण

Submitted by अभिषेक पांचाळ on 19 April, 2016 - 23:00

काय भारी होतं ना बालपण

काही मिळत नसेल तर रडायचं
पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं
आपली बालिश बुद्धी आईला कळायची
आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची

आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही
आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही
आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते
पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ?

कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण
आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण

नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा
मिळालं कि एकदम , उर भरायचा
खेळत खेळत कधी , मधेच पडायचं
तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं

आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती
परत न मिळायला , ती थोडी खरी होती ?

शब्दखुणा: 

पत्र सांगते गूज मनीचे ---- जाई.

Submitted by जाई. on 18 September, 2013 - 11:28

पत्र क्रमांक एक

प्रिय अभ्यास,

खुप दिवसापासून तुला पत्र लिहायच मनात होत. तशी तुझी आणि माझी ओळ्ख पाच सहा वर्षापासूनचीच आहे. पहिल्यांदा आपण भेटलो ते मी पहिलीत गेल्यावर. घरातले सगळेजण आई, बाबा, आजी, आजोबा तू येणार येणार असे म्हणत होते. मलाही बरच कुतुहल होत तुझ्याबद्द्ल. खुप अभ्यास करायचा म्हणजे नेमक काय करायच ?? किती कराय़चा तो ?? गेम आणि कार्टून का नाही खेळायचे मग ?? ताई करते तिच्याएवढा करायचा की तिच्यापे़क्षा जास्त ??

Pages

Subscribe to RSS - बालपण