क्रिकेट

बाणेर, पाषाण, बालेवाडी भागातील क्रिकेट अकादमी बाबत

Submitted by सन्ग्राम on 31 March, 2026 - 01:35

सर्वांना नमस्कार.
माझ्या दहा वर्षाच्या मुलाकरता बाणेर, बालेवाडी, Sus किंवा पाषाण या भागात चांगली क्रिकेट अकादमी शोधतोय.
आजकाल या भागात बऱ्याच अकॅडमी झाल्यात त्यामुळे confusion वाढलंय म्हणुन इथे विचारतोय. मुलाला
क्रिकेटचे प्राथमिक knowledge आहे आणि ही त्याची पहिलीच अकॅडमी असेल.
कोणाला चांगला अनुभव असेल तर सांगा.
धन्यवाद.

सचिननामा-६: Ten do, ten don't

Submitted by फारएण्ड on 1 February, 2026 - 00:07

३१ जानेवारीला फेसबुक फीडमधे १९९९ च्या चेन्नई मॅच बद्दल बर्‍याच क्लिप्स व माहिती आली आणि त्यामुळे तेव्हाच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. कॅलेंडर मधे पाहिले तर त्या दिवशी रविवार होता. पण आम्हाला गुरूवारी सुट्टी असल्याने आम्ही ऑफिसात होतो. भारताला २७१ करायचे होते. तेव्हा पाकचा प्रचंड धाक होता. त्यामुळे मॅच जिंकायची शक्यता कमीच होती. जिंकण्याची सवय नसलेल्या संघांना अचानक जिंकण्याची संधी आली की काय करायचे कळत नाही असे भारताचे तेव्हा खूप वेळा व्हायचे. पण दुपारपर्यंत भारत २०० च्या जवळ पोहोचला आहे आणि सचिन अजून खेळत आहे वगैरे स्कोअरवरून लक्षात आले होते.

विषय: 

क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 

ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड - लंडन

Submitted by फारएण्ड on 1 August, 2025 - 02:26

ही फेसबुक पोस्ट असती तर मी याची सुरूवात "लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउण्डला सगळेच लाइक करतात. पण त्याच शहरात असलेल्या या ओव्हल ला एक लाइकतरी बनतोच" अशी केली असती. हे लंडनमधेच असलेले ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड. पूर्वी केनिंग्टन ओव्हल किंवा नुसतेच द ओव्हल म्हणत - आता अधिकृत नाव " "किया ओव्हल". क्रिकेटप्रेमींच्या लंडन ट्रिपमधला टीआरपी लॉर्ड्स खेचून घेते आणि हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते. मी लॉर्ड्स याआधीच पाहिले आहे, त्याच्या टूरबद्दल काही वर्षांपूर्वी इथे लिहीलेही आहे.

क्रिकेट वेडे कुटुंब - (व्हिडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2025 - 10:42

वाचायचा कंटाळा असल्यास थेट व्हिडिओ बघू शकता.
व्हिडिओची लिंक -
https://jmp.sh/p3yq45mA

पण असे नुसते बघण्यात मजा नाही,
लेख वाचल्यावरच त्यातील भावना कळतील.
-------------------------------------------------------

क्रिकेट वेडे कुटुंब !

विषय: 

जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक

Submitted by मार्गी on 25 June, 2025 - 23:42

✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील)
✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा
✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द
✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक
✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता
✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ
✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही!
✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य
✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला!

शब्दखुणा: 

क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 

शेवटी टीम इंडियाने करून दाखवलंच...! ( Late post तरीही must post )

Submitted by प्रथमेश काटे on 6 July, 2024 - 05:13

किती अन् काय काय बोलावं या सामन्यात बद्दल. पूर्ण टूर्नामेंट मध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराट कोहलीने अगदी योग्य वेळ साधून केलेले पुनरागमन. त्याची नियोजनपूर्वक, शानदार खेळी. दुसरीकडून मधल्या फळीची मिळालेली भक्कम साथ. ही झाली फलंदाजीची गोष्ट.

शब्दखुणा: 

नागाची मुर्ती आणि क्रिकेटचे चेंडू !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 January, 2024 - 17:07

आमच्या घरात माझे विचार घरातल्या चारचौंघांपेक्षा वेगळे आहेत. तसेच मला ते विचार मांडायला आणि शक्य तिथे आर्ग्युमेंट करायला आवडते. त्यामुळे घरात वादविवाद चर्चा होत राहतात.
-------------------------------

तर या शनिवारची गोष्ट. सुर्याचे पहिले किरण धरतीवर पोहोचायच्या आधीच आम्ही मस्त नहा धो के मॉर्निंग वॉल्कसाठी निघालो. आम्ही म्हणजे मी आणि माझी लेक. हे आमचे दर विकेंडचे रुटीन आहे. पोरांना घेऊन मॉर्निंग वॉकला मिनी सी शोअरला जायचे. तिथून चहा नाश्त्याला जवळच असलेल्या माझ्या सासुरवाडीला आणि पोरांच्या आजोळी फेरी मारून यायचे.

विषय: 

वर्ल्डकप फायनल : २० वर्षांनंतर पुन्हा एकदा... भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Submitted by प्रथमेश काटे on 19 November, 2023 - 01:47

मागील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक सुरूवात झालं, आणि आता पाहता पाहता अंतिम सामना येऊन ठेपला आहे. मागच्या वेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताही सेमीफायनल सामन्यात हीच न्यूझीलंडची टीम समोर उभी ठाकली होती. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या डावात कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर व के एल राहुल या पिचवर उतरलेल्या प्रत्येक बॅटरने आपापल्या निरनिराळ्या शैलीत उत्कृष्ट बॅटिंग करून ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता ; पण न्यूझीलंड बॅटिंगला उतरल्यानंतर मात्र सामन्यात अनिश्चितता निर्माण झाली होती.

Pages

Subscribe to RSS - क्रिकेट