क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माबोच्या नवीन धाग्यावर वादावादी खूपच लांबली तर ती थांबवायला तिथे चांगला अम्पायर हवाय; बघ रिटायर झाल्यावर घेतोस का ती जबाबदारी !!
20181215_133742_1.jpg

भाऊ, असा चांगला अम्पायर हवाय;
उगीचच वाढवत नेतात वाद. दोघे दोन वेगळ्या मुद्द्यांवर बोलतात नि कुणिहि दुसर्‍याचे ऐकून घ्यायला तयार नाही.

भाऊ तुम्ही थर्ड अंपायर आहात कि मैदानावरचे ते स्पष्ट करा आधी बरे Lol

भारतीय महिला जशा खेळत आहेत ते बघता भोज्याजवळ येऊन न शिवता जाणार असे वाटतेय आता.

भोज्याजवळ येऊन न शिवता जाणार असे वाटतेय आता.
>>>>

असे त्या बरेचदा करतात.
त्यांना बघून नव्वदीच्या दशकातील भारतीय संघाच्या वाईब येतात..

असे त्या बरेचदा करतात. >> ह्यावेळी एकूण संघाचा आधी असलेला फॉर्म, भारतात खेळणे नि इतर संघांचे कंपोझीशन ह्यामूळे आपले पारडे जड आहे असे वाचले होते.

त्या ऑस्ट्रेलिया नंतर फेवरेट मलाही वाटत आहेत. स्पेशली स्मृती सुद्धा यंदा अश्या कडक फॉर्म मध्ये होती.. पण कुठेतरी ऐन मोक्याला कच खाणे, अंतिम सामन्यात खेळ उंचावता न येणे हे जे आपला दिग्गजांचा संघ सुद्धा करायचा. म्हणजे मला आठवते की दादा कप्तान असताना आपण कितीतरी फायनल सामन्यात सातत्याने हरलो होतो. या संघाने सुद्धा आधीच्या वर्ल्डकप स्पर्धात असे केले आहे. पण यंदा त्या उलट होत यांनी खेळ उंचावावा अशी अपेक्षा आहे. कारण गेले काही काळ महिला क्रिकेट जास्त बघणे होऊ लागले आहे. थोडा लगाव झाला आहे. त्यामुळे जिंकल्यास तितकाच जास्त आनंद होईल.

६ बॉल ८ हवेत आफ्रिकेला
आज सुद्धा धमाल सामना चालू आहे

आज सुद्धा आफ्रिकेच्या त्याच बाईने चुरशीच्या सामन्यात सिक्स मारून जिंकवले

मागील धाग्यावरून पुढे:

“त्याला त्याच्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर मग काय करणार” - स्वतः गिल अश्या क्विक सिंगल्स टेस्टमधे अनेकदा घेतो. दुसर्याच्या कॉलवर पळतो सुद्धा (नंतर रेड्डीच्या कॉलवर तो पळालाच होता). अश्या क्विक सिंगल्स टेस्टमधे घ्याव्या किंवा नाही हा वेगळा मुद्दा (घेऊ नये असं मलाही वाटतं). जैस्वालच्या रन-आऊटच्या वेळी गिलची एकाग्रता भंग पावली, पार्टनरच्या कॉलवर पळण्याऐवजी तो बॉल बघत बसला आणि इंडियाची एक विकेट हकनाक गेली इतकंच ह्या प्रकारात तथ्य आहे.

Admin यांना सांगून धागा बंद केला तरी तुमचे आहेच..
चला मग मी सुद्धा मागच्या धाग्यावरून...

शंभर पैकी ९५ लोकं कसोटीत असा सिंगल घ्यायला धावत असतील तर ठीक आहे मला अल्पसंख्यांक समजा Happy

मूळात तुला "बॉल नजरेच्या टप्प्यात नसताना, पार्टनरचाच कॉल घ्यायचा असतो. " हे मान्य आहे का?
>>>
जर मी कसोटी खेळत असेल आणि मी डेंजर एंडला धावणार असे मला वाटत असेल तर मी पार्टनरला परत पाठवेन
आणि पार्टनर सुद्धा कसोटी खेळतोय हे ध्यानात ठेवून खेळत असेल तर तो इतका सुसाट नाही धावणार की त्याला परत येणे अवघड व्हावे.

केस स्टडी
जुनीच सवय
मारा आणि धावत सुटा
माझ्यामते हे कसोटी क्रिकेट नाही.

https://www.instagram.com/reel/DEEnzXbpQO4/?igsh=MTgyY3o5ZG52Y3Y3cA==

अश्या क्विक सिंगल्स टेस्टमधे घ्याव्या किंवा नाही हा वेगळा मुद्दा (घेऊ नये असं मलाही वाटतं).
>>>>>>

प्लस ७८६
हे सर्वात महत्वाचे
ना रहेगा बाज ना बजेगी बासरी Happy

तलवारीच्या धारेवर चालाल तर कधी ना कधी रक्त येणारच Happy

गिलची एकाग्रता भंग पावली, पार्टनरच्या कॉलवर पळण्याऐवजी तो बॉल बघत बसला

कदाचित आपण टेस्ट खेळत आहोत म्हणून क्विक सिंगल बाबत रिलॅक्स असेल आणि त्याची एकाग्रता फलंदाजीवर केंद्रित असेल असा विचार करून बघा.
हेच जर वन डे खेळत असता तर समीकरण वेगळे असते.

“ आपले पारडे जड आहे असे वाचले होते” - आत्ताची भारतीय बायकांची टीम मला बरीचशी ९० च्या दशकातल्या पुरुषांच्या टीमसारखी वाटते. स्मृती, दिप्ती वगैरे खेळाडू इंडिव्हिज्युअल ब्रिलियंस वर काही मॅचेस जिंकून देतात. often times, they manage to punch above their weight. पण एक टीम म्हणून क्लिनिकली जिंकण्याइतक्या प्रोफेशनल लेव्हलवर अजून पोहोचायला वेळ आहे. पोटेन्शियल नक्कीच आहे. पण अजून तो पल्ला गाठायचाय.

ह्या वर्ल्डकप मधे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. अफ्रिका जास्त तगड्या टीम्स आहेत. अर्थात भारतीय टीमने ‘अबोव्ह देअर वेट’ पंच करून दाखवलं तर कमाल होईल आणि आनंदही होईलच.

“ तलवारीच्या धारेवर चालाल” - तू खरोखरंच इतरांच्या पोस्ट्स नीट वाचतोस की फक्त सहमतीच्या पोस्ट्सची वाट बघत असतोस आणि तुझ्या पोस्टला माना न डोलावणार्यांवर तलवार घेऊन वार करतोस?

“ कदाचित आपण टेस्ट खेळत आहोत म्हणून क्विक सिंगल बाबत रिलॅक्स असेल” - ये रे माझ्या मागल्या!! क्रिकेट कोचिंगच्या वेळी जे बेसिक्स शिकवतात ते सगळ्या फॉर्मॅट्सना लागू पडतात. हाच गिल रेड्डीच्या सिंगलच्या वेळी का ‘रिलॅक्स्ड’ नव्हता? कारण तो फोकस्ड होता. जैस्वालच्या वेळी त्याचा फोकस सुटला आणि जैस्वालची विकेट गेली.

जर मी कसोटी खेळत असेल आणि मी डेंजर एंडला धावणार असे मला वाटत असेल >> डेंजर एंड जय्स्वालचा होता, गिलचा नाही. मिड ऑफ चा फिल्डर पहिला पास बोलिंङ एंड कडे करणे प्रीफर करतो. पार्टनरचाच कॉल ह्याचसाठी असतो. ह्या बेसिक गोष्टी आहेत. गल्ली क्रिकेटमधेही ह्या फॉलो करतात. अर्थात तुला हे पटणार नाहि हेही उघड आहे.

कदाचित आपण टेस्ट खेळत आहोत म्हणून क्विक सिंगल बाबत रिलॅक्स असेल आणि त्याची एकाग्रता फलंदाजीवर केंद्रित असेल असा विचार करून बघा. >> "त्याची एकाग्रता फलंदाजीवर केंद्रित असेल" तर तो धावला असता , विचार करत बसला नसता. आता तुला एक जबरदस्त कोलांटी मारून परत हे वाक्य डीफेंड करायला लागणार आहे. मजा येणार आहे Happy

असामी, तुम्ही चुकीचे गृहीतक मांडले तर मी माझे वाक्य कशाला डिफेंड करू?

फेरफटका, डेंजर एंड नेहमी फिल्डरला कुठे थ्रो करणे सोयीचे आहे यावर ठरत नाही. तर जेव्हा उन्निस वीस असते तेव्हा कुठला फलंदाज समोरच्या फ्रिजमध्ये उशिरा पोहोचेल यावर देखील डेंजर एंड ठरतो. फलंदाज मारून स्वतःचाच कॉल असल्याने क्षणाचाही विचार न करता धावत सुटला तर तो लवकर पोहोचू शकतो. स्पेशली कसोटी जेव्हा नॉनस्ट्रायकर आधीच रन अप घेऊन तयार नसतो तेव्हा समोरच्याचा कॉलला रिस्पॉन्ड करून मग धावायला सुरुवात करणे यात तो उशीरा पोहोचून त्याचा एंड डेंजर होऊ शकतो.

फील्डर सुद्धा अशावेळी क्षणाचाही वेळ न दवडता ओळखतो की कुठला एंड डेंजर आहे आणि बरोबर तिथेच थ्रो करतो.

“ फेरफटका, डेंजर एंड नेहमी फिल्डरला कुठे थ्रो करणे सोयीचे आहे यावर ठरत नाही” - तुझा एंड चुकलाय. कारण तू असामीच्या पोस्टचं उत्तर मला उद्देशून देतोयस. बहुदा तुझी एकाग्रता भंग पावली असावी किंवा ह्या फॉर्मॅटमधे तू रिलॅक्स्ड असावास. हरकत नाही, तरिही उत्तर देतो.

असामीची पोस्ट नीट वाच (!) कारण त्यात त्याने हा मुद्दा नीट एक्स्प्लेन केलायः “ मिड ऑफ चा फिल्डर पहिला पास बोलिंङ एंड कडे करणे प्रीफर करतो. पार्टनरचाच कॉल ह्याचसाठी असतो.”

जर गिलने अपेक्षित प्रतिसाद दिला असता - म्हणजेच पार्टनरच्या कॉलवर प्रतिसाद देऊन धावला असता - जे त्याने थोड्या वेळाने रेड्डीच्या बाबतीत केलं - तर क्रिकेटिंग कॉमन सेन्सप्रमाणे दहापैकी नऊ वेळा मिड-ऑफच्या फिल्डरने जवळच्या, म्हणजेच नॉन-स्ट्रायकर एण्ड्ला a.k.a. डेंजर एंडला थ्रो केला असता. आणि तिथे जर जैस्वाल आऊट झाला असता तर त्याची चूक मानली गेली असती. हेच वाक्य मी माझ्या पहिल्या पोस्टमधे लिहिलंय. वर्तुळ पूर्ण. आता शोध काहीतरी आणि कोलांट्या उड्या किंवा डायलॉग मार.

तर जेव्हा उन्निस वीस असते >> तर आला ह्यातच समज कि तुझ्या एकंदर आर्ग्युमेंट्मधे दम नाही. इथे जर तरचा प्रश्नच नव्हता. कॉल जय्स्वालचाच होता. गिल कॉट स्लीपींग म्हणून त्याने धाव घ्यायला नकार दिला. जैस्वाल बाद झाला तेंव्हा जिथे पोहोचला त्यावरून धाव सहज शक्य होती हे उघड दिसते आहे. गिल धावला असता तर डेंजर एंड नॉन स्ट्राईकर झाला असता. तो वेळेवर धावला नाही म्हणून बॅटसमनचा झाला.

ज्या गोष्टी ढळढळीत दिसतात त्या मान्य न करणे हे सभ्य भाषेमधे बनवाबनवीमधले माने म्हणतात तो प्रकार आहे.

मी माझे वाक्य कशाला डिफेंड करू?>> हे तू म्हणतोयस ह्यातच म्हणजे डिफेंड करता येत नाहि ह्याचा कबूलीजवाब येतो रे. एव्हढ्या सहज नांगी टाकलीस ? Lol

बहुदा तुझी एकाग्रता भंग पावली असावी किंवा ह्या फॉर्मॅटमधे तू रिलॅक्स्ड असावास. >> Lol

जायस्वाल–गिल यांच्या वेळी डेंजर एंड हा नॉन-स्ट्रायकरकडे होता. मग ती कसोटी असो, वनडे असो किंवा टी२० — धाव सहज निघाली असती.

समजा हा वनडे असता तर असं म्हणता आलं असतं की "जिंकणारच आहोत, मग रिस्क कशाला घ्यायची?" आणि टी२० असता तर उलट, एक-दोन धावा पळत काढून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा चौकार मारणं योग्य ठरलं असतं.

ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्या — जिथे धाव घेण्याची शक्यता दिसते तिथे ते धाव घेतातच.

कोलांटी उडी वगैरे शब्द वापरला की आपण कसे याला मुद्द्यात पकडला असे स्वतःचेच समाधान होत असेल तर वापरत राहा Happy

मागच्या पोस्टमध्ये जे लिहिले आहे त्यात आता मुद्दा क्लिअर झालाच आहे. जर तर वगैरे शब्द तुमच्या पोस्ट मध्ये सुद्धा आहेतच. उगाच ते शब्द वापरले की मुद्दा कच्चा होतो वगैरे आभास निर्माण करायचे प्रयत्न सुद्धा छान.

असो
सौ बात की एक बात,
तुम्ही थेअरीटिकली विचार करता आणि मी प्रॅक्टिकली.
हे आपण आधीही पाहिले आहे.
जसे तंत्र कितीही महत्त्वाची गोष्ट असली तरी प्रेशर मध्ये जेव्हा तुमचे हातपायत चालायचे बंद होतात तेव्हा त्याचा फायदा शून्य होतो. म्हणूनच जग एखाद्या ## सारख्या खेळाडूला मानते. पण ज्यांचे विचार एका परिघात बंद असतील त्यांना केवळ ### आणि ### अश्या खेळाडूंचीच महानता समजते. ## सारख्याची समजने अवघड.
कारण माईंडगेम या संकल्पनेवर देखील तुम्हाला हसायला येते ज्याचा तो बादशाह होता/आहे.

त्यामुळे एकूणच या धाग्यावरचे आपले मतभेद कायम राहणार Happy

असो, हा विषय संपवला आहे असे नाही. नंतर काही वेगळ्या पद्धतीने समजावता आल्यास जरूर समजावेन. मी त्या थ्री इडियट मधील आमिर खान सारखा आहे. समजावण्याचा बाबतीत हार नाही मानणार Happy

महिला क्रिकेट वर्ल्डकप कोणी बघतेय का?
काल पुन्हा त्या आफ्रिकेच्या बाईने नादीन क्लार्कने जसा गेम फिनिश केला ते पाहून ९९ वर्ल्डकप मधील क्लूजनरची आठवण झाली.

' ये रे माझ्या मागल्या ' .... सुरूच !! Wink
*भाऊ तुम्ही थर्ड अंपायर आहात कि मैदानावरचे. ... * -
एखादा फलंदाज छान, शैलीदार खेळत असेल, तर मी त्याला कधीच आउट देणार नाही; एखादा रटाळ खेळत असेल, तर गोलंदाजाला अपील करायला चिथावणी देवून मी त्या फलंदाजाला बाद करीन !! थोडक्यात, कसलाही अंपायर होण्याची माझी इच्छा व लायकी नाहीं !!! Wink

नविन धाग्यावर निदान उघडल्या उघडल्या उबग आणणारे चित्र दिसत नाही हे ही नसे थोडके. तरी रटाळ दळण चालूच आहे.
गिलची चूक होतीच, विकेट किपरचीही होतीच आणि लेग अंपायर तर घोडचूक होती. पण आउट जयस्वाल झाला. जीवन हे असंच असतं.

महिला संघ गोलंदाजीत कमी पडतोय. फायनलला आला तरी खूप.

कधी ##, कधी ##, मधेच ### आणि आता ##, कुणाच्याही खांद्यावरून बंदुक चालली तरी चालेल, पण कुठून तरी आपलं दुकान चालू रहायला हवं.

“ महिला संघ गोलंदाजीत कमी पडतोय.” - खरंय. फिल्डिंग / विकेटकिपिंग सुद्धा हिट ऑर मिस आहे.

धावा पळण्यातल्या त्याच त्याच चुका नेहमी होत असतील तर गौतम गंभीर नाही अस मी म्हणेन. पंतच्या रन आऊट मुळे इंग्लड मधे एक टेस्ट मॅच गेली. सुधरा.
टेस्ट मधे असलं करायची काहिच जरूर नसते.

जिंकली एकदाची गिलच्या नेतृत्वाखाली मालिका.

१२० धावा करायला ३ बळी गमावलेच तरीही.

*जिंकली एकदाची गिलच्या नेतृत्वाखाली मालिका.* - जिंकल्याच्या आनंदापेक्षा एक वेळच्या बलाढ्य वे.इंडिजची सध्याची दयनीय अवस्था बघून वाईटच अधिक वाटतं !

*भोज्याजवळ येऊन न शिवता जाणार असे वाटतेय* * असे त्या बरेचदा करतात. * -
देव करो आणि द. आफ्रिका पुरुष संघासारखा यांच्यावरही अन्यायकारक असा ' चोकर्स ' हा शिक्का न बसो !!

साई सुदर्शन मोठ्या खेळी करत नाहीये. त्याला डोमेस्टिक खेळायला पाठवायला हवे. तिथे स्वतःला सिद्ध केलेले बरेच आहेत त्यांना आधी संधी मिळायला हवी असे वाटते.

एक वेळच्या बलाढ्य वे.इंडिजची सध्याची दयनीय अवस्था बघून वाईटच अधिक वाटतं !>>>

ते आहेच. परंतु दुसर्‍या डावात त्यांनी बराच चांगला प्रयत्न केला ज्या योगे ही टीम चांगली तयार होऊ शकेल. जलदगती गोलंदाजी हा त्यांचा महत्वाचा घटक होता. तो आता तितकासा दिसत नाही. कोर्टनी वॉल्श नंतर त्या दर्जाचा गोलंदाजच दिसला नाही विंडीज संघात.

तुम्ही थेअरीटिकली विचार करता आणि मी प्रॅक्टिकली. >> रन न घेणे हा प्रॅक्टिकल विचार असतो ह्यात तुझे #, ## नि ### दिसतेय बंधो.

देव करो आणि द. आफ्रिका पुरुष संघासारखा यांच्यावरही अन्यायकारक असा ' चोकर्स ' हा शिक्का न बसो !! >> नाहि बसणार. त्या बाद फेरींच्या आधीच लटकत आहेत भाऊ Sad

एक वेळच्या बलाढ्य वे.इंडिजची सध्याची दयनीय अवस्था बघून वाईटच अधिक वाटतं ! >> त्यांना इतिहासजमा धरण्यात यावे अशी स्थिती आहे Sad

Pages