#कविता
माया वाटते आवाजात
(मल्लिकार्जुन मन्सूर - https://youtu.be/HNYAQAecqqI?si=G9GBVXO392f-blVB)
माया वाटते आवाजात.
आवाज फक्त ओळखीचा
बाकी सारे बेमतलब-निरर्थक.
आवाज गरजतो
बरसतो
आवाज पाझरवतो
आवाज वितळवतो
— बर्फाच्छादित डोंगर.
आवाज बोलू करतो
डांबून ठेवलेले शब्द.
आवाज मुरत जातो
अस्तित्वाच्या खाच्याखुच्यांतून.
आवाज करणार कदाचित
मलमपट्टी
आवाज करू शकतो मायावी जादू.
आवाज करणार परीस-सोने
आवाज करणार सूर्य उभा.
(ऑगस्ट २०२३)
माझ्या वाटून ठेवलेल्या दिवसाच्या उत्साहातून
माझ्या वाटून ठेवलेल्या दिवसाच्या उत्साहातून
माझी कालची बुद्धासाठीची तळमळ —
ताज्या बसवलेल्या शावर्म्यातून गळणारी मसाल्याची
एकसारखी टपटप
सूर्योदयाचे सौन्दर्य पकडण्याचा पुन्हा फसलेला प्रयत्न
इथिओपियातील युद्धाने तडीपार झालेल्या टॅक्सी वाल्याची एक उदास कहाणी
उध्वस्त चायच्या टपरीत परतून येणारी अब्दुल्लाची एक आठवण
त्या शांत, निळ्या ग्लोव्हज वाल्या परीची सबवे व्यापून टाकणारी करुणयाचना
आणि प्रतिष्ठितांची गांडमात्र चाटणाऱ्यांची फौज अविरत घडवणारी
ही युनिव्हर्सिटी
चकचकीत गगनचुंबी काचेच्या इमारती ज्या
ढसाळांची कविता ३: सारीपाट आणि दोन रस्ते
ढसाळांची कविता २: एखाद्याने एखाद्याला
ढसाळांची कविता १: त्यांची सनातन दया
[गोलपिठा पृ. क्र. १ , लोकवाङ्मय गृह, सतरावी आवृत्ती २०२१. ]
त्यांची सनातन दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही
खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही
बोलून चालून ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश
लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथदेखील आपली नाही
माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार
करपून गेलेल्या आतड्यात साधी माती भरायला मिळत नाही
उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्यागत त्यांचाच होतो पाठीराखा
आपली कत्तल घडताना त्याच्या हातातून नि:श्वासही ढळत नाही
ढसाळांची कविता 0: ढसाळ आणि त्यांच्या कवितेबद्दल
गेल्या तीन-चार वर्षांपासून मी ढसाळांची कविता वाचत आहे. ढसाळांच्या कवितेशी माझा संबंध तसा खूप उशिरानेच आला. सवर्णांच्या सांस्कृतिक जडणघडणीत दलित कविता किंवा एकूणच दलित वाङ्मय/कला यांच्याशी संबंध बेतानेच येत असावा. तसा आला तरी त्याचा सखोल विचार होणे आणि त्याबद्दल आवड, एक प्रकारची आपुलकी निर्माण होणे हे ही बहुधा विरळच असावे. आजही मराठी साहित्य/कला/संस्कृती आणि त्यासंबंधीच्या संकल्पना, ज्यांना सुर्वे “सारस्वत” म्हणतात त्यांनी डॉमिनेट केलेली आहे आणि ह्या बायसला अनुसरूनच कोणत्याही कलाप्रकाराचे संस्कार आपल्यावर होत असतात.
हेगलच्या नावाने बोंब हाय
हेगलच्या नावाने बोंब हाय;
कान्ट तुला मार्क्स कधी कळणार न्हाय.
कामू-सार्त्र ची भांडी धुते,
ती बी धारावीची रमाबाय.
आरथिक-मंदीचा ह्या कारण काय?
खालती डोकं वरती पाय.
क्रांतीची बती म्होरना येती,
पायाने जरी ती गोगलगाय.
शहीद घोगरे तुझ्या पिंडीला,
कोरटाचा न्याय शेवटी शिवलाच न्हाय.
[ऑगस्ट २०२४]
साय तिच्या त्वचेतून पाझरत राहिली
(मूळ इंग्रजी कवितेचा अनुवाद)
साय तिच्या त्वचेतून पाझरत राहिली.
किळस तिच्या चेहऱ्यावर वावरत राहिला.
अंधकार – ज्याने तिचे आयुष्य झपाटले होते –
तिच्या पापण्यांखाली घट्ट तो बंदिस्त राहिला.
पैसा बेरहम, तिच्या ओठांवर हसण्याची बळजबरी —
तिच्या शरीरावर माझी मालकी, दीड तासभरासाठी;
तिच्या कत्तलेची माझी जबाबदारी, दीड तासभरासाठी;
दोन बोटांनी मानेखाली अलगद खुपसले आणि,
दूध घळघळा वाहून गेले, दीड तासभरासाठी.
मला ब्लॅक-होलं मधला सूर्य दिसू लागला होता त्या वेळेची गोष्ट
मला ब्लॅक-होलं मधला सूर्य दिसू लागला होता त्या वेळेची गोष्ट …
बेंबीच्या देठातून अल्लाहला दिलेल्या यातनेचा अस्मान चढलेला स्वर, कोकीळ उतरवणार होता.
शतकानु शतकांच्या वाटेचे रक्ताने बरबटले पाय स्वच्छ धुऊन निघाले होते;
भविष्यांच्या मेंदूतील जाळी-जळमटे अदृश्य होणार होती.
वर्षानुवर्षांचे नागडे प्राण पांघरलेली भूकेली जठरे पंचपक्वानांचा स्वाद हुंगत होती.
भाईचार्यांच्या वायद्यांचा दबदबा होता;
अजरामर चुंबनाची प्रदर्शने देऊन अबसोल्यूट माणुसकीची प्रात्यक्षिके आयोजित केलेल्या शो ची,
सारी तिकिटे विकली गेलेली होती.
Pages
