“शीत” युद्ध
खरंच! कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते. काल व्यवस्थित दिसणारी गोष्ट, आज बंद पडू शकते. या तत्वज्ञानाचं कारण म्हणजे आमचा फ्रिज! तसं त्याचं बरं चाललं होतं. गेली पाच वर्षे तो अगदी इमाने इतबारे आमच्या कुटुंबाला थंड ठेवत होता.
खरंच! कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते. काल व्यवस्थित दिसणारी गोष्ट, आज बंद पडू शकते. या तत्वज्ञानाचं कारण म्हणजे आमचा फ्रिज! तसं त्याचं बरं चाललं होतं. गेली पाच वर्षे तो अगदी इमाने इतबारे आमच्या कुटुंबाला थंड ठेवत होता.
आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
नमस्कार, आम्ही काही दिवसात कॅनडाला मूव्ह होणार आहोत. मला बरेच प्रश्न आहेत पण सामानाची बांधाबांध करायची तर पहिला. प्रश्न मला भांड्यांबद्दल पडतोय.
तर ज्यांनी कोणी incuction gas coil wala, वापरला आहे त्यांननि प्लीज मला सजेस्ट करा कि काय काय बेसिक भांडे न्यावेत, flat bottom चे सगळे भांडे चालतात कि स्पेसिफिक induction basech लागतात? स्टील चे काही भांडे आहेत फ्लॅट वाले ते चालतील का?
नॉनस्टिक चे चालतात का, समजा अलुमिनिम चे भांडे use केले तर हीट genret होतं नाही असे वाचले मी. असे कशी असते का?
पुण्यात बराच काळ घालवला आहे मात्र शुद्ध शाकाहारी फेज मध्ये... पुढील काही महिन्यात आता पुण्यात जायचे योग आहेत - अमेरिकेत चिकन खाणे सुरु केले मात्र जेव्हाही भारतात गेलो मांसाहार केला नाही... या वेळी मात्र मांसाहारी खादाडी लोकेशन्स हव्या आहेत... औंध बाणेर जवळ स्पेशली ..
जाणकारांनी माहिती द्यावी.. शाकाहारी चांगल्या खादाडी देखील चालतील...
सकाळी रेड्डीट वाचताना एक इंडक्शन बद्दलचा धागा पाहिला. पण तिथली चर्चा मुख्यत्वे अमेरिकन परिप्रेक्ष्यातून असते.
तेव्हा आपल्याकडे इंडक्शनचा वापर गॅसपेक्षा चांगला होऊ शकेल का, याबद्दल मायबोलीवर विचारावे असे डोक्यात आले. त्यासाठी हा धागा.
जर तुमच्या गावात सारखे लाईट जात नसतील, तर इंडक्शन चा पर्याय गॅसपेक्षा स्वस्त, स्वच्छ, अधिक एनर्जी एफिशियंट वाटतो आहे.
गॅस वापरताना ५०% च्या आसपास उष्णता खोली गरम करण्यात वाया जाते असे दिसते. तेव्हा इंडक्शनने उर्जा बचतीसोबत आपल्याकडच्या गरम हवेत किचनमधली धग कमी ठेवणे हा फायदा होईल असे वाटते.
नवीन घरात राहायला जाणार असाल तर कोणती भांडी असायला हवीत?
Basic यादी देते आहे.
जुन्या घरातून नवीन घरात जाताना किंवा नवीन संसार थाटणाऱ्यांना उपयोग होईल.
.
देवपूजेचे साहित्य
ताम्हण, पळी, कलश इत्यादी
पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे, कळशी
स्टील च्या बादल्या इत्यादी
..
उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही स्वच्छ दिवस, चांगले तापमान वगैरे बघून बार्बेक्यू करणं इथं खूप कॉमन आहे. कबाब वगैरे कोळशाच्या बार्बेक्यूवर करता येतात पण कोळशावर भाजलेले नान, रोटी किंवा तत्सम प्रकार करून बघण्यासाठी तंदूर घ्यावा असं वाटत होतं. किंमती बघितल्यावर 'कुठे इतका वापरला जाणार आहे' म्हणून आपसूकच ऑप्शनला टाकलं जात होतं. एकदा यूट्यूबवर कोणीतरी घरी तंदूर केलेलं पाहिलं तेव्हापासून डोक्यात घरीच तंदूर करायचं घोळू लागलं. त्यातच एका क्लायंटनं 'outdoor kitchen' डिझाईन करण्याबद्दल विचारलं. त्याला मोठ्या आकाराचा तंदूरही हवा होता.
माझी आजी पाच पाच बर्नरची चूल फक्त दगड आणि मातीचा वापर करून करायची. खेड्यात चुली शेणाने सारवतात. तिला आजूबाजूला चूल बनवायला बोलवायचे. त्या चुलीला धुराडे पण असायचे. लहान असताना कुणाकडे जाताना मला घेऊन जायची तेव्हां चूल बघताना बघत बसायचो. त्यामुळे ही आवड निर्माण झाली.
साहित्य:
उकडलेला बटाटा 1 छोटा
राजगिरा पीठ 1 छोटी वाटी
मीठ 1 चमचा
साखर चिमूटभर
शेंगदाणे कच्चे मूठभर
जिरे 1 टी स्पून
मिरच्या 3 मोठ्या(1 सजवायला)
खवलेले खोबरे 1 छोटी वाटी
तूप 2 छोटे चमचा एकदा परतायला एकदा वरून घ्यायला.एकच चमचा 2 वेळा वापरला तरी चालेल.
कृती
1.
तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!