गिफ्ट

मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 12:54

सर्वप्रथम प्रामाणिकपणे सांगू ईच्छितो की रिटर्न गिफ्ट काय द्यायचे याआधी त्याचे पर पीस बजेट काय असावे याचा अंदाज घेणे आणि मगच त्या बजेटमध्ये काय घेता येईल हे शोधणे असे मध्यमवर्गीय कुटुंब आहोत आम्ही.

तर आम्ही याआधी भाड्याने राहायचो त्या सोसायटीमध्ये मुलांच्या वाढदिवसाला केवळ दहा बारा मुलेच यायची. ती अधिक एक-दोन नात्यातील आणि कामवाल्या मावशींची पकडून आकडा पंधराच्या फार पुढे जायचा नाही. त्यामुळे व्यवस्थित योग्य बजेट राखत रिटर्न गिप्ट देता यायचे जे मुलांना आवडेल आणि उपयुक्तही ठरेल.

विषय: 

नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

शब्दखुणा: 

सोळा आण्याची गोष्ट - गिफ्ट - स्पर्शा

Submitted by स्पर्शा on 7 September, 2019 - 02:32

ज्जा ... तुझ्याशी आता बोलणारच नाही... दादाशी भांडून रडत अबोली गार्डनमधे गेली... रडल्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लाल झालेला.. डोळ्यातल पाणी काही थांबायच नाव घेत नव्हत... गॅलरीतन दादा तिची मजा बघत होता... हळूहळू संध्याकाळ सरत गेली आणि सगळीकडे काळोख पसरला... अबोलीही घरी आली.. दादावरचा राग काही थंड झाला नवता...झोपताना तिने पुन्हा मनापासून त्याला बोलावल ... तिला झोप लागली... थोड्यावेळाने तिला ऊशीजवळ हालचाल जाणवली...हळूच एक हात आला आणि बाॅक्स ठेऊन गेला.. तिने पटकन उठून तो उघडला.. बघते तर तिचा आवडता टेडी बाॅक्समधे होता... आनंदाने नाचत ती सॅन्टाक्लाॅजला थॅन्कस म्हणत होती..

विषय: 
शब्दखुणा: 

बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?

Submitted by पाथफाईंडर on 16 January, 2018 - 12:39

मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)

ऑनलाइन गिफ्ट ऑर्डर

Submitted by ज्ञाती on 3 August, 2014 - 21:38

मला एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गिफ्ट पाठवायचे आहे. ती दुसर्‍या राज्यात असल्याने ऑनलाइन निवडून पाठवणे सोयीचे पडेल जसे फुले किंवा गिफ्ट बास्केट.
तुम्ही याकरिता कुठल्या साइट वापरल्या असतील आणि अनुभव चांगला असेल तर इथे लिहा. धन्यवाद!

मला ७ ऑगस्ट ला तिला सनीवेल मध्ये मिळेल असे गिफ्ट पाठवायचे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

नातेवाईकांकडून भेट आणि इन्कम टॅक्स

Submitted by स्वाती२ on 2 April, 2014 - 07:24

भेट / गिफ्ट म्हणून मिळालेली रक्कम ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल/ वस्तूची किंमत ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल तर भेटीवर इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण भेट नातेवाईकांकडून असेल तर असा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. यात नातेवाईक म्हणजे कोण क्वालीफाय होते त्याबद्दल माहिती हवी होती. जालावर शोधले पण गोंधळ उडाला. जाणकार मायबोलीकरांनी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

Subscribe to RSS - गिफ्ट