खरं सांगायचं तर बुकमार्क कशाला म्हणतात ते माहीतही नव्हतं. जेव्हा पुस्तक वाचायचो तेव्हा ते पान फोल्ड करून ठेवायचं हेच आमचं बुकमार्क. आता ह्या स्पर्धेच्या निमित्ताने बुकमार्क काय असते ते कळले. तेव्हा ही प्रवेशिका लहान मुलांच्या गटात पकडा खरंतर त्यांनीही माझ्यापेक्षा छान बनवलेत.
साहित्य चौकोनी पान आणि आवडतील ते कलर.

लहानपणी आपण खेळायला जो कागदाचा कॅमेरा करायचो तेच केलंय.
    
  
      
  
  
      
  
  
    पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय :  ३ वर्षे १० महिने
खरंतर बुकमार्क स्पर्धेत भाग घ्यायचा विचार माझा होता.  ब गटात.  आज फ़ुरसत मिळाली आणि क्राफ्टचा डबा उघडला.  पण आई काही करायला लागली की लुडबूड  करण्याचा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क असतो.  तेव्हा आधी तिने बनवलेला बुकमार्क दाखवते. 
साहित्य
रेडिमेड कपड्यान्चे प्राईस टॅग पुठ्ठे
आईचा जुना कुडता
कात्री
फब्रिक ग्लू
फैब्रिक कलर
भेंडी
हिरवा मार्कर पेन
जूना कुडत्याचे कापड कापून प्राईस टॅग वर चिटकवले.  त्यावर  फैब्रिक कलरनी भेंडीचे छापे मारले. मार्करने दांड्या रंगवल्या
    
  
      
  
  
      
  
  
  
      
  
  
      
  
  
    साहित्य- वहीचा आयताकृती पुठ्ठा, काळा पेन, रंगीत दोरा, मणी

*

साहित्य- आयताकृती पुठ्ठा, कापडाचा तुकडा, फॅब्रिक ग्लू, रंगीत दोरा
    
  
      
  
  
      
  
  
    मॅक्रमे म्हणजे दोरींच्या गाठी मारून त्यातून नक्षी  निर्माण करणे.  यंदाच्या गणपती उत्सवासाठी मी  या   कलेचा उपयोग करून बुकमार्क केला आहे. मॅक्रमे करण्याची ही माझी दुसरीच वेळ आहे आणि हे डिझाईनही  जरा गुंतागुंतीचं आहे त्यामुळे अनेक तृटी असतीलच.   पण ही कला  गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचं समाधानही आहे.  
बुकमार्क  संपूर्ण लांबी - १२ इंच,  मधली आडवी  नक्षीची पट्टी - ६ इंच, रुंदी - दीड इंच
क्र. १

    
  
      
  
  
      
  
  
    साहित्य: उरलेले कागद्,दोरा, मणी
बुद्धिदेवता गणपतींच्या उत्सवात पुस्तकांचा बूकमार्क योग्य वाटला म्हणून तो बनवला 

    
  
      
  
  
      
  
  
    गट- अ गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु
क्राफ्ट पेपर वापरुन , ओरिगामीने  तयार केलेले बुकमार्क.


    
  
      
  
  
      
  
  
    गट ब - हर्पेन हर्षद पेंडसे 
टी बॅग्स च्या बॉक्समधे जो सेपरेटएर असतो त्याचा वापर करून हा बुक मार्क बनवण्यात आला आहे.
बनवला त्या क्रमाने फोटो टाकत आहे.
डिझाईन इथून बघून कॉपी केलंय
https://www.classroomdoodles.com/bookmarks.html  दोन वाढीव टिंब ही माझी भर 
    
  
      
  
  
      
  
  
    हा अगदी साधा , लोकरीने विणलेला क्रोशाचा बुकमार्क आहे. आणि  मी स्वतः वापरते . वापरताना फूल पुस्तकाच्या बाहेर ठेवते, आणि साखळी पुस्तकाच्या आत 
मधे लेकीच्या वाढदिवसाला पण तिच्यासाठी बनवले होते.
 
