कोडे

दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 

निम्न

Submitted by तो मी नव्हेच on 18 August, 2020 - 04:56

भावनांचे कोडे विलक्षण अवघड वाटतं
एकदा भावलेली पुन्हा नाही भावत तशीच
त्याच आर्ततेने, तन्मयतेने
गात्रांत, श्वासात, मनात, स्पर्शात,
रंध्रारंध्रात झिरपून गेलेली, नितळ अगदी..
कधीकधी येतेही जवळपास तशीच
पण जवळपासच....
भेटते ती पुन्हा पुन्हा.... पण...
स्वतःचेच निम्न रूप घेऊन दरवेळेस
भावना स्वजातीभक्षक असतील कदाचित

-रोहन

शब्दखुणा: 

दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 

एक उरलेले कोडे - शिळ्या कढीला ऊत

Submitted by हर्पेन on 28 February, 2015 - 08:12

हे एक मागच्या मभादि निमित्त तयार केलेले कोडे आता देत आहे. म्हणून शिळ्या कढीला ऊत म्ह्टलंय

अनेक उत्तम चित्रकृती साहित्यावर आधारित आहेत / असतात. चित्रपट विषयक लिखाण आवडीने वाचणारे अनेक वाचक मराठीत आहेत. वाचक आहेत तर लिहिणारे देखील आहेत. मराठीत चित्रपट या विषयावर रसरंग, चंदेरी अशा नियतकालीकांद्वारा विपुल लिखाण झाले आहे. पण मराठीतल्या एका वाचकवर्गाची भूक नियतकालीकांमधल्या गावगप्पांपेक्षा अधिक काहीतरी वाचायची आहे. त्यामुळेच असेल पण मराठीत समीक्षा, आस्वादक रसग्रहण, चित्रपट-निर्मिती कथा, स्मरणरंजन अशा अनेक स्वरूपातले लिखाण पुस्तक बद्ध झालेले आढळते.

मोठा नळ, लहान नळ आणि टाकी

Submitted by गजानन on 26 February, 2012 - 07:57

दोन नळांच्या साहाय्याने एक टाकी भरायला सहा तास लागतात. एका वेळी एकच नळ चालू ठेवला तर टाकी भरायला लहान नळाला मोठ्या नळापेक्षा पाच तास जास्त लागतात.

प्रत्येक नळाला स्वतंत्रपणे टाकी भरायला किती तास लागतील?

शब्दखुणा: 

कोडे

Submitted by कल्पी on 22 March, 2011 - 11:31

जीवन कोडी सोडवताना
एक कोडे राहुन गेले
रक्ताला कोड्यात टाकले
आणी कुणी वाहुन गेले

दाटी होते अशीच
रोजच्या पेपरात
चौकोनातले शब्द
अडकले पुन्हा पाशात

गपगार चिवट
अडखळणारी ती वाट
कसं कुठे जुळावे
दुभंगलेले ते घाट

एका एका चौकोणात
चेहरा तुझा बसलेला
कोप-यात निमुटपणे
निटनेटका नटलेला

आता कोरा कोरा
चौकोन चौकोण दिसतो
हाताळणारा तो हात
वर जाऊन हसतो

नाराज झाले सारे
पसरले सोफ़्यात
दाता गेला आमचा
म्हणुन आसवे पूसतात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुटत नाही कोडे

Submitted by किंकर on 15 February, 2011 - 09:36

अशीच एक सायंकाळ,उन्हाने होती करपलेली
चढण होती डोळ्यासमोर, कड्यातून मुडपलेली
उंचीने कातळाच्या, छाती त्याची दडपली
मूर्तिमंत भीतीने, त्याची नस शहारली.

पार करून चढ,गाठता येईल पायवाट
तुडवीत जाता पायवाट,समोर येईल पठार,
मागे टाकता पठार,पुन्हा भेटेल खिंडार
पार करता खिंडार,पुढे लागेल ओढा
ओढ्याच्या ओढीने विसावू वाटेवर
आपली भूक भागवू वाहत्या धारेवर

गाठता येईल मुक्काम आता, मग कशाला रस्ता सोडा.
पकडून रस्ता चालता पुढे,मनी त्याच्या आला विचार

गाठून मुक्काम सापडेल झोपडे
आणि कवाड त्याचे,असेल उघडे
उघड्या कवाडी आतुरतेने असेल तिला केले खडे
कडेवर तिच्या बसले असेल,आपलेच पोर नागडे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तीन तळटीपा

Submitted by slarti on 24 July, 2009 - 06:17

माझ्या एका जर्मन मित्राच्या कवितेचा मी मराठीत अनुवाद केला. मित्राला मराठी येत नाही. अनुवादाखाली मित्राने पुढील तीन तळटीपा दिल्या (अर्थात, त्याही अनुवादित) :
(१) कवितेचा अनुवाद केल्याबद्दल मी स्लार्टीचा ऋणी आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोडे