बालक पालक
आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से.
पिझ्झा
घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला.
शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी.
अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का?
आई : ये, आत बस. पण तुझी मम्मी कुठे गेली ?
अंकिता : मम्मी मैत्रिणीकडे गेली, भिशीसाठी.