आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते. असेच काही लहान मुलांचे निरागस किस्से.
पिझ्झा
घराचा दरवाजा वाजला म्हणून आईने दरवाजा उघडला.
शेजारची अंकिता, पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी, पाठीवर दफ्तर घेऊन दारात उभी.
अंकिता : आंटी मम्मी येईपर्यंत तुमच्याकडे बसू का?
आई : ये, आत बस. पण तुझी मम्मी कुठे गेली ?
अंकिता : मम्मी मैत्रिणीकडे गेली, भिशीसाठी.
आई : मग ती परत आली तर तिला कसं कळणार की तू आमच्याकडे आहेस ते?
अंकिता : मम्मीनेच मला तुमच्याकडे थांबायला सांगितले.
आई : पण मला तसं तुझ्या मम्मीने सांगितले नाही.
अंकिता: मी म्हणाले होते मम्मीला त्यांना सांगून येते, तर मम्मी म्हणाली, " काही सांगू नकोस, त्यांना कळलं तर संध्याकाळी मुद्दामून काहीतरी काम काढून बाहेर जातील."
आई : ( हसत ) असं म्हणाली काय तुझी मम्मी? मी आणि दादा खरोखर बाहेर गेलो असतो तर कुठे थांबली असतीस तू?
अंकिता : खाली वॉचमन अंकलकडे बसले असते.
आई : शाळा आणि ट्युशन खूप अभ्यास करावा लागतो ना?
अंकिता : हो ना , मला तर अजिबात आवडत नाही होमवर्क आणि शाळा.
आई : अभ्यास नाही केला तर मग मोठी झाल्यावर तू काय करणार?
अंकिता : मस्तपैकी रोज सकाळी उशिरा उठणार आणि पिझ्झा खाणार.
आई : अगं पण पिझ्झासाठी पैसे कुठून आणशील?
अंकिता : नवरा देईल की मला.
आई : पण नवऱ्यासाठी स्वयंपाक करावाच लागेल ना तुला?
अंकिता : माझी मम्मी कुठे करते रोज स्वयंपाक? कधीतरीच करते. पप्पा तर बाहेरूनच पार्सल मागवतात. पप्पा ऑफिसला गेले की आई बाहेरून पिझ्झा मागवते, आम्ही दोघीच खातो. पप्पांना दिले तर आम्हाला कमी पडेल ना?
डेंजरस मम्मी
दोन टपोरी मुलांनी स्कूटरवरून जाणाऱ्या एका तरुणीची बाईकने साईड काढताना , तिच्याकडे बघून काहीतरी अश्लील शेरेबाजी केली.
तिच्यामागे तिचे छोटे पिल्लू बिलगून बसले होते. त्या तरुणीने पुढच्या सिग्नलवर त्या बाईकवाल्यासमोर आपली स्कूटर आडवी लावली आणि एकाची गच्ची पकडून त्या टपोरी मुलांना समजेल अशा भाषेत चांगलेच फैलावर घेतले,.
" चला पोलिस स्टेशनला, तुमचा सगळा माजच उतरवते." असे म्हणत त्याची गच्ची सोडत, तिने त्याच्या बाईकची चावी काढून घेतली.
xxx नगरसेवकाला फोन लावला तर पोलिस आपल्याला हातही लावणार नाहीत." दात विचकत तुच्छतेने तो बाईकवाला तिच्याकडे बघत म्हणाला.
नगरसेवकाचे नाव ऐकताच, संतापाने ती तरुणी म्हणाली, " बोलावंच , चांगली ओळखते मी त्याला, आणि माझे नावही सांग त्याला. माझे नाव ऐकून तो येणारच नाही तुम्हाला सोडवायला. आणि आलाच तर त्याच्यासमोर तुम्हाला नागडं करून फोडून काढीन.
खरच अंकल! माझी मम्मी डेंजरस आहे. पिल्लूने आपली चड्डी खाली सरकवून आपल्या पार्श्वभागावरील आईने काढलेला QR code दाखवला. त्या दोन टपोरी पोरांनाही हसू दाबता आले नाही. त्यांनी त्या मातेची माफी मागितली आणि पिल्लूशी शेक हॅण्ड करून विषय मिटवून निघून गेले .
हत्यार
अंशूच्या आईने किचन ट्रॉली साफ करायला काढली. ट्रॉलीतील भांडी , डबे, वाट्या आणि चमचे बाहेर काढले. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. तिच्या आईचा फोन होता.
तिने अंशूला हाक मारली आणि त्याला भिंतीला एका लाईनीत भांडी लावायला सांगून ती बेडरूमध्ये गेली. ज्या मुलाला आपली ' शी ' धूता येत नाही त्याला हे काम सांगितले.
अर्ध्या एक तासाने त्याची आई बेडरूम मधून बाहेर आली आणि किचनमध्ये काहीतरी गडबड आहे ह्याची तिला जाणीव झाली. किचनमध्ये डोकावतच तिचा डोळ्यांवर क्षणभर विश्वासच बसला नाही. लेकाने बाथरूम मधून ' अप डाउन ' करून सगळ्या भांडी, वाट्या आणि चमच्यांमध्ये पाणी भरून ठेवले होते.
कामाचा वाढवा झाल्याने संतापून अंशूच्या आईने त्याचा ' करेक्ट ' कार्यक्रम केला.
अंशूचे ओरडणे ऐकून त्याला वाचवायला माझी आई गेली. आईने अंशूच्या आईच्या हातातील काठी हिसकून बाजूला फेकली. त्याच्या आईला समजावले. तरी अंशू रडायचा थांबत नव्हता.
त्याची भेदररेली अवस्था पाहून आईने , " ही आई तुला मारते ना? आता तिला घेऊनच जाते आमच्याकडे." असे गंमतीने म्हणत त्याच्या आईला घेऊन निघाली.
अंशू अचानक रडायचा थांबला. " तिला नका नेऊ, ही काठी घेऊन जा " असे म्हणत माझ्या आईच्या हातात काठी दिली.
कुत्र्यांची फाईट
ए चिऊ ! " बाबा काय करतोय? त्याला आंघोळ करून घ्यायला सांग. " किचनमधून चिऊच्या आईने मोठ्याने आवाज दिला.
" बाबा कुत्र्यांची फाईट बघतोय. " चिऊने उत्तर दिले.
तणतणत चिऊची आई गॅलरीत आली. " अच्छा! ही फाईट बघतोय? तेही लेकीच्या समोर?" संताप आणि लज्जेने त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात तिने विचारले.
" घरात गणपती बसवायला तुला वेळ नाही म्हणत होतास, आता कुत्र्यांच्या फायटी बघायला बरा वेळ आहे तुझ्याकडे? गणपती बसवला असता तर निदान १० दिवस तरी वेळेवर आवरून घरात बसला असतास. "
" आता बस बघत, कुत्र्यांची फाईट The End होईपर्यंत ." असे म्हणत चिऊची आई, आंघोळीसाठी चिऊला खेचत बाथरूमकडे घेऊन गेली.
xमाकxxड
बाबओ कसले किस्से आहेत
बाबओ कसले किस्से आहेत