दुरावा

अबोला..

Submitted by मन्या ऽ on 22 August, 2019 - 07:11

अबोला..

अबोला होताच मुळी
दोघांचा जीवघेणा छंद
तरी प्रेमज्योत
तेवत होती मंद

तुझ्या आठवणींनी
गर्दीतही एकटी होते
तुझ्या आठवणींनी
एकटी असुनही
एकटी नव्हते

वादातुन साधले
नवे चांगले
प्रेमाच्या रोपाला
फुटले नवे धुमारे

शब्दाशब्दांत झाले
आज प्रेम साजरे
माझ्या-तुझ्या
वादातले प्रेम गहरे

(Dipti Bhagat)

दुरावा

Submitted by मिलिंद खर्चे on 27 April, 2015 - 09:23

तू सोबतीस होता पण भेटला कधी ना
मांडून डाव गेला जो परतला कधी ना
झाला असा मुका की भासे खुजी अबोली
फसवाच हा अबोला तू सोडला कधी ना
संगीत जीवनाचे कोठे कसे विरजले
जो छेडला तराना तू ऐकला कधी ना
लावून प्रीत ज्योती गेलास दूर देशी
सोसू कसा दुरावा जो मानला कधी ना
खोटेच ही ठरावे का वचन तू दिलेले ?
जे शब्द वेचले ते तू पाळले कधी ना
आता सुरात जळते रोजच चिता मनाची
जखमात शोधते मी जो भेटला कधी ना
केली कठोर शिक्षा माझ्याच आठवांनी
केला असा गुन्हा मी जो उमजला कधी ना
....मिलिंद

विषय: 
शब्दखुणा: 

दुरावा

Submitted by amol_koli on 11 September, 2013 - 10:59

शब्दातुनि शब्दाकडे,
शब्दांचे खेळ संपेना.
गुंतले माझे मनं तुझ्यात
हुरहुर त्याची उमलेना.

माझ्यात तु , तुझ्यात मी
आपल्याच जगात तु आणि मी
दुरावा आज आला तरीही
ह्रदयात तुझ्या असेन मी

स्वप्नातील, या जगात मी
डोळे बंद कर दिसेन तुला
जवळ घे , मिठीत मला
जाणवेल माझा जिव्हाळा तुला

हासण्यात तुझ्या ,रुसण्यात तुझ्या
तुझ्याच चंचल मनात
आहे मी इथे ,जवळ तिथे
श्वासाच्या प्रत्येक क्षणात.

मी येणार पुन्हा, भेटणार तुला
प्रेमाची गोडी सांगणार तुला
मिठीत घेउन , कवेत माझ्या
डोळे भरुनी पाहणार तुला

मन सुने , झले माझे
डोळे नकळत पाणावले

नको हरवू ,नको विसरु
दुर मला नको ठेवू

शब्दखुणा: 

न जाणे का ते....(In the memories of our airport meet)

Submitted by monikadhumal on 7 January, 2011 - 06:42

न जाणे का ते ....पण

राहून राहून सारखं तेच आठवतंय
कसा निघून गेलास ना तू त्यादिवशी
जणू काही बंद मुठीतली वाळू पटकन निसटून गेली...
एकदम अलगद...

नुकताच तर घेतला होतास तू
हातात माझा हात थेट..
अन नुकतीच तर झाली होती
तुझी माझी नजरभेट ...

हवाहवासा वाटणारा तुझा सहवास
अन निसटून चाललेली ती वेळ...
शब्द तर सारे अडकून पडलेले
बसत नव्हता कुठेच मेळ....

खूप जड पावलांनी तेव्हा
निरोप तुला दिला होता
लवकर परत येशील असा
वादाही तू केला होता

पण बघ ना हि वेळ.....
इथेच थांबून राहिलेय...
सूर्य आकाशात असूनही
नभ भरून आलंय...

हातावर पडलेल्या थेंबाकडे बघितलं ना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दुरावा