हिंदी गाणी

दिल से रे ....

Submitted by rar on 16 February, 2018 - 13:33

व्हेलेंटाइन्स डे चं निमित्त साधून 1kW Creations ने रीलीझ केलेले 'फूल टू फिल्मी' कार्टून पोस्टर ..... Dil say re !

चित्रगीतमाला .. आमचा बिनाका व चित्रपट संगीताचा प्रवास

Submitted by preetam ranjana on 21 July, 2016 - 00:14

मित्रांनो, बिनाका गीतमालेचे बोट धरून हिंदी चित्रपट संगीताचा अभ्यास मी सुरु केला आहे. तो श्राव्य स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा धागा. आपला अभिप्राय आपले प्रश्न माझा हा अभ्यास आणखी परीपूर्ण करतील असा मला विश्वास आहे. हा अभ्यास केवळ बिनाकाच्या यादीपुरता मर्यादित नसून त्या काळातले चित्रपट व संगीत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. बिनाका चे मानांकन हे लोकप्रियतेच्या निकषावर झाले. पण आज जर या यादी कडे पुन्हा पाहिले व त्या वर्षातील चित्रपट संगीताचा विचार केला तर तुम्हाला ही यादी आज बदलावी असे वाटते का? याचाही विचार आम्ही केला आहे.

विषय: 

कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

गुलमोहर: 

म्युझिक असिस्टंट - एक अप्रसिद्ध, दुर्लक्षित कलाकार

Submitted by prashant_the_one on 13 July, 2011 - 14:28

रेडिओवर किंवा घरी सीडी वरती आपल्या आवडीचे गाणे लागते. नकळत आपण गुणगुणू लागतो.. गाण्याबरोबर मन आणि मान दोन्ही डोलायला लागते... बरोबर कुणी गानवेडा किंवा गान वेडी असेल तर त्याच्या बरोबर नकळत गाण्याची तारीफ, चर्चा , गायक, कवी , संगीतकार या पैकी एक किंवा सगळ्यांचे योग्य ते कौतुक होत असते. कधी कधी शब्द अगदी सर्वसाधारण असूनही संगीतकाराने काय कमाल केली आहे वगैरे चर्चा सुरु होते. मग कुठे, काय, आणि कसे वापरले आहे, सतार काय सॉलिड आहे किंवा काय गिटार चा पीस टाकला आहे, अमुक अमुक म्हणजे अफलातून संगीतकार आहे किंवा आहेत अशी जोरदार चर्चा पण होते.....

गुलमोहर: 

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू

Submitted by मंदार-जोशी on 2 September, 2010 - 13:55

मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - हिंदी गाणी