पालथा घडा आणि मी
.
(दुपारी जरा लवंडावं म्हटलं, तर इकडंही आले हुडका काढीत. फोटो काढायला, आढ्यावर.)
.
.
(दुपारी जरा लवंडावं म्हटलं, तर इकडंही आले हुडका काढीत. फोटो काढायला, आढ्यावर.)
.
२०१६.. दोन वर्षांपुर्वी मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास केपीला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभर ऑफिस गाजवून नंतर रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या होत्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधर स्वामींची जबाबदारी विनय वर सोपवली आणि मागच्या सीटवर अनिरुद्ध शेजारीच हेडरेस्ट वर मान टाकली..
स्वयंपाकघराच्या लहानश्या गच्चीत जमिनीवर साखरेसारखे पातळ काचेचे स्फटीक विखुरलेले दिसले. एक-दोनदा तिथे फिरकून दुर्लक्षही केले. पण थोड्या वेळात प्रमाण जरा जास्त दिसायला लागले. खाली वाकून, निरखून, तर्क करूनपण ते कशाचे असावेत, हे कळेना. ते कुठून पडले असावेत म्हणून वर उठता उठता छताच्या दिशेला मान वळवली आणि एकदम त-त-प-प झाले.
श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात एक वाक्य होते- आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राक्षसी गुंड राहतोय हे समजलेय. मग आपली मनस्थिती नेमकी काय ठेवायची?
यंदाच्या दिवाळीत परळ येथील आर.एम.भट हायस्कूलच्या 'गुरुदक्षिणा' या माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमाने "टिंबापासून प्रतिबिंबापर्यंत" हे रंगावली प्रदर्शन आयोजीत केले होते. या प्रदर्शानाची ही झलक.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
चार दिवस लागून आलेल्या सुट्यांचा फायदा घेऊन ह्यावेळी चार पाच वर्षांपासून घरात संग्रहीत झालेल्या पणत्या रंगवायला घेतल्या. जुनी गाणी ऐकत ऐकत चार पाच तास सहज निघून गेले. कुठलीच योजना न आखता मनात आले आणि केले म्हणून ह्या गोष्टीनी मला फार आनंद दिला...
२) तुम को पुकारे मेरे मन का पपीहरा ...मीठी मीठी अगनी में, जले मोरा जियरा
खरा मान हा ह्या साध्या पणत्यांच्या असतो.
युरोपमधे आल्यापासूनच प्राग बघायचे आहे हे ठरवलं होतं पण प्लॅन बनत नव्हता. यावर्षी शेवटी प्लॅन जमून आला.
प्राग (चेकमधे प्राहा Praha) ही चेक रिपब्लिकची राजधानी, वाल्टावा (Vlatava) नदीच्या दोन्ही किनार्यावर वसली आहे. प्रागला जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. जवळजवळ ११०० वर्षापूर्वी हे शहर वसवलं गेलं आणि तेव्हापासून हे मध्य युरोपातले सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले. २ रोमन सम्राटांनी इथूनच राज्य केलं होतं. चेकोस्लोवाकियाची राजधानीसुध्दा प्रागच होती आणि त्याच्या विघटनानंतर चेक रिपब्लिकची राजधानी बनली.
हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
कंबोडियामधे जिथे बान्ते सराई आहे तिथे मी हे एक छत पाहिले आणि मला ते फार आवडले. कुठल्या तरी पानांपासून हे छत तयार केलेले आहे. ह्या छताचे एक वैशिष्ट हे की रणरणत्या उन्हात ह्या छताखाली बसलो की ह्या छताची गार गार सावली हवीहवीशी वाटते. इथे मग एसीसी गरज नाही.
ह्या छताची काही छायाचित्रे:
हा छताचा वरचा भागः
या भागात न्यू यॉर्क सिटी आणि आसपास असलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतींची प्रकाशचित्र आहेत.
ओलाना आणि मॉन्टगमरी पॅलेस
सेन्ट पॅट्रिक्स कथेड्रल