काव्य लेखन

ठेवा

Submitted by पॅडी on 15 April, 2024 - 00:07

सोनसळी अक्षरांचा
उदे लोचनात शेला
सांग कुणासाठी असा
जीव वेडापिसा झाला..?

जीव वेडापिसा झाला
नाही चित्त थाऱ्यावर
गोड पैंजणांची साद
छुम छुम वाऱ्यावर

छुम छुम वाऱ्यावर
मन पाखरू ओलेते
वाट पाहुनी थकली
रात्र डोळ्यांना डसते

रात्र डोळ्यांना डसते
शब्द चिंब ओले रान
थोडा उफानला वारा
थोडे किरमिजी क्षण

थोडे किरमिजी क्षण
उर्मी अनावर झाल्या
ठेव जतन करून
गोष्टी तुझ्या-माझ्यातल्या..!
***

सहीच्या सही कविता अर्थात…. काकाक

Submitted by किंकर on 29 July, 2015 - 15:27

सर्व मुळ रचनाकारांची आणि रहस्य कथा कार माननीय ' बाबुराव ' याची माफी मागून ….

तड्क्याचे भडके संपले । वैराग्य धावुनी आले ।
मायबोलीचे my बोली झाले ।
जानुनी ....घ्या हो रोमातील सकळीक ।

कोणीही उठले , काहीही बोलले ।
त्याचे प्रत्यंतर रागात झाले ।
जर आमचे 'बाबुराव ' गन घेवून घोद्या वरून आले ।
स्तेनगन ने ते गझला पाडू लागले ।
आणि नीश्ठेचे फल त्यांना लाभले ।
भंगलेल्या अभंगाचे पेटंट मिळाले ।
तर मग दोष कोनास देनार ।

म्हणून म्हणतो - ' मी कोण कुठला काय करतो ते न सांगता च ओळखावे? '

हे ज्याचे त्याने आणि नाहीतर वेब मास्तरांनी जाणावे
आणि या नव काव्याला पहिल्या पानावर ठेवावे ।

Subscribe to RSS - काव्य लेखन