ठेवा

Submitted by पॅडी on 15 April, 2024 - 00:07

सोनसळी अक्षरांचा
उदे लोचनात शेला
सांग कुणासाठी असा
जीव वेडापिसा झाला..?

जीव वेडापिसा झाला
नाही चित्त थाऱ्यावर
गोड पैंजणांची साद
छुम छुम वाऱ्यावर

छुम छुम वाऱ्यावर
मन पाखरू ओलेते
वाट पाहुनी थकली
रात्र डोळ्यांना डसते

रात्र डोळ्यांना डसते
शब्द चिंब ओले रान
थोडा उफानला वारा
थोडे किरमिजी क्षण

थोडे किरमिजी क्षण
उर्मी अनावर झाल्या
ठेव जतन करून
गोष्टी तुझ्या-माझ्यातल्या..!
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द सा - उदे = उदय होणे, प्रकट होणे या अर्थाने तो शब्दप्रयोग केलाय. बाकी; उडे हा शब्द ही चपलख बसतो .. ! Happy खूप खूप धन्यवाद..

पुरंदरे शशांक - मनःपूर्वक आभार..!!

अ'निरु'द्ध जी - धन्यवाद!!

>>>> शेवटच्या ओळीने सुरवात करायची रचना मस्त वाटली.
स्वान्तसुखाय- हा प्रयोग आपणास आवडला तेव्हा कवितेचे सोने झाले असे म्हणायला हरकत नाही Happy खूप खूप आभार...!!