डाग

पांढुरकं प्राक्तन

Submitted by Abuva on 8 March, 2023 - 11:51
अडकलेलं कबुतर (DALL-E)

बेल वाजली.

खिडकीतून मला बाहेर अडकलेलं कबुतर दिसतंय. फडफड करतंय. कालपासून. हो, काल कधीतरी मला जाणवलं की गॅलरीत एक कबुतर आलंय आत आणि अडकलंय. अभिमन्यू चक्रव्यूहमें फस गया है तू... कधीकाळी ऐकलेल्या गाण्याचे सूर माझ्या डोक्यात घुमले. मी झटकन हॉलचा गॅलरीत जाणारा काचेचा दरवाजा बंद करून घेतला होता. माझ्या खिडकीला जाळी आहे. बंद.

पक्कं अडकलंय ते आता.

विषय: 
शब्दखुणा: 

डाग

Submitted by क्षास on 2 April, 2018 - 10:15

रोज कितीतरी वेळा
मी आरशात स्वतःला पाहते.
माझा चेहरा वेगवेगळ्या कोनांतून न्याहाळते.
प्रत्येक डाग ,मुरूम मी बारकाईने बघते.
पुन्हा तीच ती नाराजी, पुन्हा तीच ती हळहळ
पुन्हा तेच ते प्रयोग, पुन्हा क्रीम्स,फेसपॅक,क्लीनअप्स
किती काय थापतो आपण चेहऱ्यावर
किती काय फासतो आपण चेहऱ्यावरच्या डागांवर
एके दिवशी वाटलं,
मनावरच्या चिवट आठवणींचे डाग निरखून बघण्यासाठी
कोणता आरसा असता तर...?
ते ही डाग घालवायला कोणते मलम असते तर...?
दहा दिवसांत लख्ख उजळपणा देणारी क्रीम
मनाचं सावळेपण घेऊन गेली असती.

शब्दखुणा: 

चेहर्यावरील काळे डाग कसे घालवावे ?

Submitted by विवेक नाईक on 4 August, 2013 - 03:39

चेहेर्यावरील वयापरत्वे आलेले काळे डाग कसे घालवावे ?

कुठल्याही आरोग्याच्या तक्रारी शिवाय आलेले हे काळे डाग गालावर चीक बोनच्या वर आहेत. ते कसे घालावे.

Subscribe to RSS - डाग