आता कायप्पा वर एक व्हिडिओ पाहिला. त्याची खातरजमा करूनच हे लिहीत आहे. मोबाईलवर काही एप्स ही ट्रॅकींगसाठी बनवलेली असतात. जसे की एखादया कंपनीला त्यांचे सेल्स एक्झिक्युटिव्ह कुठे कुठे फिरत आहेत हे ट्रॅक करता यावे, लहान मुलांच्या हाती मोबाईल असेल तर त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पालकांना मुलांच्या मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करता याव्यात इत्यादी उपयोग केवळ उदाहरणादाखल म्हणून सांगता येतील. म्हणजे अशी ऍप्स लेजिटीमेट आहेत. स्पायवेअर म्हणता येणार नाही. कारण ते इन्स्टॉल करताना यूजरच्या बऱ्याच परवानग्या वगैरे विचारल्या जातात आणि युजर्सना सेटिंग्जमध्ये जाऊन सुद्धा बरेच ऍक्सेस द्यावे लागतात.
 
  
      
  
  
      
  
  
    स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग - ३
आता या अॅपबद्दल अजून अजून कळू लागले आहे. अर्थातच ज्याने कोणी हे बनवले आहे त्याला चित्रकलेची आणि रेषा, विविध आकारांची जी जाण आहे त्याला मानावेच लागेल. या अॅपमधील ब्रश, पेन्सिल, इरेजर इ. जी साधने दिलेली आहेत ती पहाता या छोट्याशा स्क्रीनवर काय काय गमती जमती करता येतील हे पूर्णपणे आपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारेच आहे. 
जसजशी आपण ही साधने व विविध रंग वापरत जाऊ तेवढी त्यातील गंमत समजत जाऊन या अॅपमधे अगदी लहान मुलासारखे रमायला होते... 
मला स्वतःला पाने-फुले इ.चे रंग, आकार यांचे आकर्षण असल्याने ते काढायचा प्रयत्न केला आहे. 
१]
 
  
      
  
  
      
  
  
    स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग -२
स्केच अॅप वापरताना खूपच मर्यादा (लिमिटेशन्स) येतात हे लक्षात आले होतेच.
यातील मुख्य अडथळे म्हणजे -
१] बोट नेमके कुठे टेकले आहे हे कळत नाही.
२] रेघ/ रेषा मारताना एका बाजूला जरा जाड येते तर दुसर्या बाजूला जरा बारीक
३] रंगांचे मिश्रण करता येत नाही.
४] एकाच रंगाच्या विविध शेड्स निर्माण करता येत नाहीत.
५] एकसारख्या रेषा कधी नीट येतात तर कधी पार गंडतात
तरीही हे अॅप इतके चॅलेन्जिंग वाटते की बस्स..
या अॅपची निर्मिती ज्याने केली त्याच्या मनात नेमके काय असेल असे राहून राहून वाटते ...
 
  
      
  
  
      
  
  
    शीर्षक वाचून संध्यानंद मधील बातमी तर वाचत नाही ना, असा फील आला ना.
पण बातमी खरी आहे, पक्की आहे. जवळच्याच एकाच्या अनुभवातील आहे.
माझ्या घराजवळच राहणारा, माझा ऑफिसमधील मित्र.  गेल्या शनिवारच्या रात्री अचानक घरी आला आणि म्हणाला, "रुनम्या एका दिवसासाठी तुझा फोन मिळेल का?"
फोन ??? मी किंचाळलोच !!
ते सीआयडी मालिकेत नाही का साध्या गणवेषातील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन वगैरे आपली ओळख उघड करतात तेव्हा समोरचे लोक "सीआयडी!!" करत दचकतात. बस्स सेम त्याच टाईपमध्ये.
 
  
      
  
  
      
  
  
    विन्डोज फोन चे अजून तितकेसे वापर कर्ते नसल्याने नवीन घेणार्यांना याबद्दल फार्शी माहिती नसते, सर्वांना माहित व्हावे म्हणून दुसर्या धाग्यावर दिलेया प्रतिसादाचा वेगळा धागा करत आहे.
मी नोकिया ल्युमिया ७२० वापरतेय गेले सहा महिने.
काही छान वाटलेल्या गोष्टी:
- २जी आणि नेहमीचा फोन म्हणून वापर करून सुद्धा बॅटरी २ दिवस चालते.
-मेट्रो लु़क - मला व्यक्तिशः फार आवडला.
-टच आणि एकूण बिल्ड क्वालिटी - अतिशय उत्तम
-कॅमेरा सुद्धा अतिशय छान आहे.
-पुर्वी एफ.एम रेडिओ सुद्धा नव्हता, पण आता अँबर अप्डेटनंतर रेडिओ आहे.
 
  
      
  
  
      
  
  
    मोबाइल विकत घेताना आपल्याला बरेच पर्याय आता उपलब्ध झाले   आहेत . आपले अनुभव लिहिल्यास निवड करणे सोपे जाईल .