अदॄश्य

अदॄश्य!

Submitted by नीधप on 29 April, 2011 - 23:17

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती
---------------------------------------
फुलांच्या पायघड्यांवरून
त्याचा हात धरुन ती जात असते.
त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते.
पावले थिरकायला लागतात,
त्याच्या तालाशी जुळायला लागतात.
ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते
स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते.
कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते
ती अजूनच खूश होते, हसते.
कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते
हादरते, ती अदॄश्यच असते.

अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं.
अगदी आत आत पर्यंत.
'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?'
डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अदॄश्य