अदॄश्य!

Submitted by नीधप on 29 April, 2011 - 23:17

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती
---------------------------------------
फुलांच्या पायघड्यांवरून
त्याचा हात धरुन ती जात असते.
त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते.
पावले थिरकायला लागतात,
त्याच्या तालाशी जुळायला लागतात.
ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते
स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते.
कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते
ती अजूनच खूश होते, हसते.
कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते
हादरते, ती अदॄश्यच असते.

अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं.
अगदी आत आत पर्यंत.
'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?'
डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते
याच आकाशाने तिला नेहमी हात पसरून ये म्हटलेलं असतं.
आज ते आकाशच तिला दिसत नाहि.
वर पहाता नजरेत न मावणारा तो असतो.
नि तिच्यावर त्याची सावली पडलेली असते.

- नी

गुलमोहर: 

वाह!!

निरजातै, रचना खुप छान आहे...आवड्ली....!..पण शेवट्च्या कडव्यात...

एक भाबडा प्रश्न..

आज ते आकाशच तिला दिसत नाहि.
वर पहाता नजरेत न मावणारा तो असतो.
नि तिच्यावर त्याची सावली पडलेली असते.>>> हे कळले नाही की "ती" चे अस्तित्त्व नाहीय की "तो" चे अस्तित्त्व नाहीय. की...दोघांचे अस्तित्त्व नाहीय.

हादरते, ती अदॄश्यच असते
याच आकाशाने तिला नेहमी हात पसरून ये म्हटलेलं असतं.>> यावरुन मी असे गृहीतले की "ती" चे अस्तित्त्व नाही आहे.

सगळ्यांचे आभार!

चातक,
>>> हे कळले नाही की "ती" चे अस्तित्त्व नाहीय की "तो" चे अस्तित्त्व नाहीय. की...दोघांचे अस्तित्त्व नाहीय.
.>> यावरुन मी असे गृहीतले की "ती" चे अस्तित्त्व नाही आहे. <<<

त्याचे अस्तित्व इतके मोठे झाले की तिच्यावर सावली पडली आणि तिचं आभाळ दिसेनासं झालं तिला. आणि एकुणात ती अदृश्य झाली. असं काहीसं लिहिताना डोक्यात होतं.

त्याचे अस्तित्व इतके मोठे झाले की तिच्यावर सावली पडली आणि तिचं आभाळ दिसेनासं झालं तिला. आणि एकुणात ती अदृश्य झाली. असं काहीसं लिहिताना डोक्यात होतं. >>> ग्रेट कल्पना निरजातै.

छान....