यमन

आठवणी

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 04:29

तुझ्या प्रिती च्या बकुळ फुलांनी गुंफलेल्या आठवणी ।
त्या जिवलग हळुवार क्षणांनी विणलेल्या आठवणी ।।

हिंदोळ्यावर तु उंच झुलावे, माझे मन ही हिंदोळा व्हावे।
आकाशी तू अलगत झेपतांना टिपलेल्या आठवणी।।

जणू हिरवी पैठणी जेव्हा रानांत मोर नाचे श्रावणी।
ती पैठणी तू नेसतांना हृदयांत साठल्या आठवणी।।

तू यमन आळवावा मी सुरांत तुझ्या सूर मिसळावा।
मावळतीच्या यमन रंगांत मिसळलेल्या आठवणी।।

रात्र सारी जागून सरली पहा उगवला शुक्र तारा ।
मादक स्पर्शांनी तुझ्या गंधाळलेल्या आठवणी।।

कधी रे येशील तू...

Submitted by तात्या अभ्यंकर on 20 March, 2012 - 11:01

कधी रे येशील तू... (येथे ऐका)

ओघवती प्रवाही चाल - मुखडा आणि पहिला अंतरा यमन मध्ये..

दुसरा अंतरा - 'शारद शोभा..' केदार मध्ये, परंतु हा अंतरा पूर्ण करताना 'अंतरीचे हेतू..' या शब्दावरून उकारान्ती तान घेऊन पुन्हा यमनमध्ये बेमालूम प्रवेश....

'हेमन्ती तर नुरली हिरवळ,
शिशीर करी या शरीरा दुर्बळ..'

अद्भुत सोहोनी आणि त्यानंतर शिशिरात ठेवलेला कोमल धैवत..!

'पुन्हा वसंती डोलू लागे..' मधून डोकावणारा बसंत..
आणि 'प्रेमांकित केतू..' वरून पुन्हा अगदी सहज पकडलेला यमनचा मुखडा..!

गुलमोहर: 

एकवार पंखावरुनी...

Submitted by तात्या अभ्यंकर on 15 March, 2012 - 12:26

एकवार पंखावरुनी.. (येथे ऐका)

सात्विकता म्हणजे काय, गोडवा म्हणजे काय मन:शांती म्हणजे काय, हे सारं सार या गाण्यातनं कळतं..
हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..

'वने माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही'
...
याला म्हणतात यमन..!

'तुझ्याविना नव्हते कुणी आत अंतरात..!'

ही यमनकल्याणातली भक्ती..!

बाबूजींच्या स्वरातील आर्ततेविषयी, रसाळतेविषयी, गोडवेपणाविषयी मी काय बोलू..?

कुठे गेली आता अशी गाणी..?!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

यमन...

Submitted by चैतन्य दीक्षित on 18 December, 2010 - 06:29

दोन्ही बाजूस दोन तानपुरे... पलिकडे पेटीवर वालावलकरबुवा.. तबल्याला कामत आणि खुद्द स्वरभास्कर गायला!! हे असं दृश्य ज्यांनी म्हणून पाहिलं असेल, त्यांच्या भाग्याचा हेवा करावा तितका कमी आहे. त्यात जर संध्याकाळची वेळ असेल, आणि यमनसारखा राग असेल तर बोलायलाच नको!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - यमन