शालेयआठवणी

चार भिंतींपलीकडची शाळा

Submitted by 'कल्पनेचा कुंचला' ✍️ on 25 July, 2026 - 07:06

कितीतरी वर्षांपासून मी त्याच शाळेसमोरून जातोय — जिथे माझी दहावी झाली, आणि जिथे आमचं जुनिअर कॉलेज भरायचं. आज ती इमारत तशी राहिलेली नाही; सगळं काही बदलून गेलंय. पण आठवणी मात्र अजूनही तिथल्या हवेत विरघळून राहिल्या आहेत.
प्रत्येकाच्या मनात आपली एक हक्काची शाळा जिवंत असते. शाळा म्हटलं की शिक्षक आले, विषय आले, अभ्यास-परीक्षा आणि सोबतीने मार्क्सही आले! त्या मार्क्समुळे कितीतरी रात्री विचारात आणि घरच्यांचा ओरडा खाण्यात गेल्या असतील. पण याच्या पलीकडे जाऊन बघितलं, तर खरी शाळा काही वेगळीच होती.

Subscribe to RSS - शालेयआठवणी